Cotton Crop : केंद्रीय कापूस संस्थेच्या प्रयोगामुळे कापूस उत्पादनात होणार वाढ, नेमका खरिपात बदल काय?

महाराष्ट्रासाठी विकसित करण्यात आलेल्या वाणामध्ये सुरक्षा आणि वैदही या दोन वाणाचा समावेश आहे. सुरक्षा हे वाण नॉन बिटी असून याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या धाग्याची लांबी ही 32 मिमी आहे. 160 दिवसांमध्ये हे वाण परिपक्व होते. एवढेच नाही तर यामधून हेक्टरी 20 ते 23 क्विंटल उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहे. तर संशोधन संस्थेने दक्षिण भागासाठी वैदही-1 हे रंगीत कापसाचे वाण विकसित केले आहे.

Cotton Crop : केंद्रीय कापूस संस्थेच्या प्रयोगामुळे कापूस उत्पादनात होणार वाढ, नेमका खरिपात बदल काय?
कापसाचे बियाणे
राजेंद्र खराडे

|

Jun 25, 2022 | 6:54 AM

नागपूर : शेती उत्पादन वाढवण्यासाठी ( Nurturing environment) पोषक वातावरण आणि मुबलक पाणी एवढेच पुरेसे नाही तर जमिनीत गाढले जाणारे बियाणेही तेवढेच महत्वाचे आहे. त्यामुळेच राज्यात 4 कृषी विद्यापीठे आणि वेगवेगळ्या संस्था परीश्रमध घेत आहेत. गतवर्षी (Cotton Rate) कापसाला विक्रमी दर मिळाल्यामुळे उत्पादन घटूनही शेतकऱ्यांना अधिकचा फायदा झाला होता. आता यामध्ये आणखीन वाढ होणार आहे. कारण केंद्रीय कापूस संस्थेच्या माध्यमातून एक नव्हे..दोन नव्हे तर नवे चार वाण उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. विशेष भौगोलिक स्थितीनुसार हे वाण विकसीत करण्यात आले आहेत. ज्यामुळे (Cotton Production) कापसाचे उत्पादन तर वाढेलच पण लांब धाग्यामुळे याला विशेष महत्व राहणार आहे. यापैकी दोन वाणाला केंद्रानेही मंजुरी दिली असून यंदाच्या खरिपात त्याचा उपयोग होणार आहे.

हे आहेत सुधारित वाण

महाराष्ट्रासाठी विकसित करण्यात आलेल्या वाणामध्ये सुरक्षा आणि वैदही या दोन वाणाचा समावेश आहे. सुरक्षा हे वाण नॉन बिटी असून याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या धाग्याची लांबी ही 32 मिमी आहे. 160 दिवसांमध्ये हे वाण परिपक्व होते. एवढेच नाही तर यामधून हेक्टरी 20 ते 23 क्विंटल उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहे. तर संशोधन संस्थेने दक्षिण भागासाठी वैदही-1 हे रंगीत कापसाचे वाण विकसित केले आहे. यामुळे बाजारपेठेत मागणी असलेला गर्द तपकिरी रंगाच्या कापसाचे उत्पादन शक्य होणार आहे. शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय असेल तर मात्र, हेक्टरी 20 क्विंटल तर कोरडवाहूला 15 क्विंटल उत्पादन शेतकऱ्यांना मिळणार आहे.

नव्या वाणाचे वेगळेपण काय?

सध्या ज्या पिकातून अधिकचे उत्पन्न तेच पीक वावरामध्ये अशी शेतकऱ्यांची धारणा झाली आहे. शिवाय शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग राबवले जात आहेत. त्याच अनुशंगाने केंद्रीय कापूस संस्थेने कापसाच्या रंगीत वाणाचे संशोधन केले आहे. या नैसर्गिकरित्या गर्द तपकिरी रंगाचा कापूस या वाणातून मिळणार आहे. शिवाय कमी कालावधीत अधिकचे उत्पादन आणि सिंचनाची सोय असल्यास उत्पादनात भर हे याचे वेगळेपण आहे.

हे सुद्धा वाचा

दोन वाणाच्या प्रसारासाठी मान्यता

नागपूर येथील केंद्रीय कापूस संस्थेने या वाणाचा शोध लावला असून 4 पैकी 2 वाणाच्या प्रसारासाठी मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये सुरक्षा आणि वैदही-1 चा समावेश आहे. राज्यातील दक्षिण आणि मध्य भागासाठी हे वाण असणार आहे. यामध्ये रंगीत कापसाचा देखील समावेश आहे. नॉनबिटी वाणाच्या प्रसारासाठी मान्यता मिळाल्याचे कापसू संशोधन संस्थेचे डॉ.वाय. जी. प्रसाद यांनी सांगितले आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें