Onion Crop: नगदी म्हणून ओळख असलेला कांदा वावरातच सडला, शेतकऱ्यांनी असा का निर्णय घेतला?

यंदा हंगामाच्या सुरवातीला 30 ते 35 रुपये किलो असा दर कांद्याला होता. लाल कांद्याची आवक सुरु असताना हे दर टिकून होते. पण उन्हाळी कांद्याची आवक सुरु होताच दरात घसरण झाली आहे. गेल्या महिन्याभरापासून ही घसरण सुरुच आहे. त्यामुळे उन्हाळी कांद्याने शेतकऱ्यांचा वांदाच केल्याचे चित्र राज्यात आहे.

Onion Crop: नगदी म्हणून ओळख असलेला कांदा वावरातच सडला, शेतकऱ्यांनी असा का निर्णय घेतला?
उन्हाळी हंगामातील कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 11:26 AM

बुलडाणा : उसापाठोपाठ कांदा हे सर्वात मोठे (Cash Crop) नगदी पीक म्हणून ओळखला जात आहे.असे असले तरी हाच कांदा आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. (Onion Rate) दराच्या लहरीपणामुळे कांदा ओळखला जातो पण याचा फटका हा उत्पादक शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतो. दीड महिन्यापूर्वी कांद्याला विक्रमी दर मिळाला होता. यानंतर मात्र, (Summer Crop) उन्हाळी कांद्याची आवक वाढताच चित्र बदलले आहे. बुलडाणा बाजारपेठे तर कांद्याचा कचराच झाला आहे. 2 ते 3 रुपये किलो असा दर मिळत आहे. त्यामुळे वाहतूक आणि काढणीचाही खर्च यामधून निघत नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा वावरातच ठेवला आहे. पावसाळी कांद्यातून उत्पादन मिळाले पण उन्हाळी कांद्यातून मात्र, शेतकऱ्यांचा वांदा झाला आहे.

खर्च लाखोंमध्ये उत्पादन हजारोंमध्ये

हंगामी पिकातून उत्पादनवाढीसाठी शेतकरी एक ना अनेक प्रयत्न करतो. शिवाय कांदा हे नगदी पीक असल्याने या पिकाच्या क्षेत्रात वाढ होत आहे. मात्र, दरातील अनियमिततेमुळे काही शेतकऱ्यांना फायदा तर काहींचे नुकसान हे ठरलेलेच आहे. यंदा हंगामाच्या सुरवातीला 30 ते 35 रुपये किलो असा दर कांद्याला होता. लाल कांद्याची आवक सुरु असताना हे दर टिकून होते. पण उन्हाळी कांद्याची आवक सुरु होताच दरात घसरण झाली आहे. गेल्या महिन्याभरापासून ही घसरण सुरुच आहे. त्यामुळे उन्हाळी कांद्याने शेतकऱ्यांचा वांदाच केल्याचे चित्र राज्यात आहे.

मागणीच घटल्याने निर्माण झाली स्थिती

आवक वाढूनही मध्यंतरी लाल कांद्याचे दर हे टिकून होते. हंगामाच्या सुरवातीला कांद्याला विक्रमी दर मिळाला होता. त्यामुळे उन्हाळी हंगामातील कांद्याला किमान 20 रुपये किलो असा दर मिळेल ही अपेक्षा शेतकऱ्यांना होती पण दरात मोठी घसरण झाली आहे. दर्जात्मक कांदा असतानाही मागणीच नसल्याने ही परस्थिती ओढावली आहे. राज्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या लासलगाव, सोलापूर या बाजारपेठेतही अशी अवस्था आहे.

कांदा वावरात अन् मशागतीची कामे

कांद्याचे दर एवढे घसरले आहेत की, आता वावरातला कांदा काढणेही मुश्किल होत आहे. कांद्याची छाटणी, तोडणी आणि वाहतूक करुन बाजारपेठ जवळ करणे हा सर्व खर्चही यामधून निघेल अशी स्थिती नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा न काढताच आता शेतीमशागतीची कामे सुरु केली आहेत. किमान आगामी पिकातून का होईना उत्पन्न पदरी पडेल असा आशावाद शेतकऱ्यांना आहे.

Non Stop LIVE Update
सगळे रक्तालाही चटावलेले,सरकारला आरोपी करा; पुणे अपघातावर सामनातून टीका
सगळे रक्तालाही चटावलेले,सरकारला आरोपी करा; पुणे अपघातावर सामनातून टीका.
हंडाभर पाण्यासाठी जीवाच रान, विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढाओढ
हंडाभर पाण्यासाठी जीवाच रान, विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढाओढ.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, सुपारी मिळाली की... कुणाची टीका?
अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, सुपारी मिळाली की... कुणाची टीका?.
राहुलबाबा को ये क्या हुआ...भाषण सुरू अन् स्वतःच्या डोक्यावरच ओतलं पाणी
राहुलबाबा को ये क्या हुआ...भाषण सुरू अन् स्वतःच्या डोक्यावरच ओतलं पाणी.
पैसे घ्या, पण... ; बिल्डरपुत्रानं पोर्शे कार अपघातानंतर काय म्हटलं
पैसे घ्या, पण... ; बिल्डरपुत्रानं पोर्शे कार अपघातानंतर काय म्हटलं.
BIG Breaking : आता सातबाऱ्यावर आईचंही नाव लागणार, कुणासाठी होणार नियम
BIG Breaking : आता सातबाऱ्यावर आईचंही नाव लागणार, कुणासाठी होणार नियम.
पॅन-आधार लिंक केलंय? नसेल केलं तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची
पॅन-आधार लिंक केलंय? नसेल केलं तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची.
पुणे अपघात अन् आरोप थेट अजितदादांपर्यंत, नार्को टेस्टची होतेय मागणी
पुणे अपघात अन् आरोप थेट अजितदादांपर्यंत, नार्को टेस्टची होतेय मागणी.
लोकसभेत पाठिंबा पण त्याबदल्यात आता मदत नाही? या निवडणुकीत मनसे vs भाजप
लोकसभेत पाठिंबा पण त्याबदल्यात आता मदत नाही? या निवडणुकीत मनसे vs भाजप.
राज्यात 40 पार कोण? महायुती की मविआ? काय म्हणताय राजकीय विश्लेषक?
राज्यात 40 पार कोण? महायुती की मविआ? काय म्हणताय राजकीय विश्लेषक?.