
देशातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. भाजपप्रणित मोदी सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी वर्षाला 6000 रुपयांची मदत केली जाते. आता शेतकऱ्यांना या योजनेच्या 20 व्या हप्त्याची प्रतीक्षा लागला आहे. हा हप्ता कधी येणार याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पंतप्रधान मोदी यांनी 24 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांच्या बिहार दौऱ्यात पंतप्रधान किसान योजनेचा 19 वा हप्ता जारी केला होता. या हप्त्याला आता 4 महिने होत आले आहेत. त्यामुळे आता देशभरातील कोट्यवधी शेतकरी पंतप्रधान किसान योजनेच्या 20 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.
20 वा हप्ता कधी मिळणार?
समोर आलेल्या माहितीनुसार पंतप्रधान किसान योजनेचा 20 वा हप्ता शुक्रवारी 20 जून रोजी जारी केला जाण्याची शक्यता आहे. मात्र याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. 20 वा हप्ता जारी करण्यापूर्वी या हप्त्याची तारीख जाहीर केली जाणार आहेत आणि त्यानंतर हप्ता जमा होणार आहे.
पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत किती पैसे मिळतात?
केंद्र सरकार देशातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत देते. हे पैसे शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2-2 हजार रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे 19 हप्ते जारी करण्यात आले आहेत. आता आगामी काळात 20 हप्ताही जारी केला जाणार आहे
eKYC नसेल तर पैसे मिळणार नाहीत
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा केले जातात. मात्र या योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी ओटीपी आधारित ईकेवायसी करणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी ईकेवायसी केलेली नसेल त्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत.
पीएम किसान यादीत लाभार्थ्याचे नाव कसे तपासायचे?