‘अन्नत्याग’ नंतर आता लातूरात भाजपच्याच आमदाराची शेतकऱ्यांसाठी ‘पदयात्रा’

माजी मंत्री आ. संभाजी पाटील-निलंगेकर यांनी लातूर येथील छत्रपती शिवाजी महराज चौकात 72 तास अन्नत्याग आंदोलन केले होते. आता औसा मतदार संघाचे आमदार हे औसा ते तुळजापूर अशी पदयात्रा करणार आहेत. विरोधी पक्षातील लोकप्रतिनीधींकडून शेतकऱ्यांसाठी आंदोलन हे सर्वकाही ठिक असले तरी आ. संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या आंदोलनानंतर आता आ. अभिमन्यू पवार यांच्या पदयात्रेची चर्चा जरा वेगळ्याच अर्थाने सुरु आहे.

'अन्नत्याग' नंतर आता लातूरात भाजपच्याच आमदाराची शेतकऱ्यांसाठी 'पदयात्रा'
संग्रहीत छायाचित्र

लातूर : अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीनंतर (State Government) राज्य सरकारने मदतही जाहीर केली आहे. असे असतानाही लातूरात (Latur) मात्र, शेतकऱ्यांप्रती आंदोलनाचा धडाका सुरु आहे. दोन दिवसांपूर्वीच माजी मंत्री आ. संभाजी पाटील-निलंगेकर यांनी लातूर येथील छत्रपती शिवाजी महराज चौकात 72 तास अन्नत्याग आंदोलन केले होते. आता औसा मतदार संघाचे आमदार हे औसा ते तुळजापूर अशी पदयात्रा करणार आहेत. विरोधी पक्षातील लोकप्रतिनीधींकडून (Farmer) शेतकऱ्यांसाठी आंदोलन हे सर्वकाही ठिक असले तरी आ. संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या आंदोलनानंतर आता आ. अभिमन्यू पवार यांच्या पदयात्रेची चर्चा जरा वेगळ्याच अर्थाने सुरु आहे. कारण आ. संभाजी पाटील-निलंगेकर आणि आ. अभिमन्यू पवार यांच्यातील अंतर्गत मतभेद हे जगजाहीर आहेत.

पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. यातच लातूर जिल्ह्यातून प्रवाहित होणाऱ्या नद्यांनी प्रवाहच सोडल्याने अधिकचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना नुकसानीचे दावे करण्यासाठी 72 तासाची मुदत देण्यात आली होती. त्यानुसारच मदतही 72 तासात द्यावी ही मागणी करीत आ. संभाजी पाटील-निलंगेकर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन केले होते.

शिवाय मुंडन आंदोलनही यावेळी पार पडले होते. आता शनिवारी औसा मतदार संघाचे आ. अभिमन्यू पवार हे शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन औसा ते तुळजापूर अशी 55 किमी पदयात्रा काढणार आहेत. शनिवारी सकाळी 7 वाजता या पदयात्रेला सुरवात होणार आहे.

पदयात्रेतून शेतकऱ्यांचे प्रश्न

अतिवृष्टीने हजारो हेक्टरवरील जमिन खरडून गेलेला शेतकरी पुरता उध्वस्त झाला आहे.आशा परिस्थितीत राज्य सरकारने तुटपुंजी मदतीची घोषणा करून शेतकर्‍यांची चेष्टाच केली आहे. ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना तातडीने भरीव निधी उपलब्ध ठाकरे सरकार करून देईल असे अपेक्षित असताना या सरकारने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे सरकारने असंवेदनशीलतेचा कळस गाठला आहे. या असंवेदनशील आघाडी सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि आघाडी सरकारला खडबडून जागं करण्यासाठी औसा ते तुळजापूर पदयात्रा काढली जाणार असल्याचे आ. अभिमन्यू पवार यांनी सांगितले आहे.

यामुळे पदयात्रेला महत्व

अभिमन्यू पवार हे औसा मतदार संघाचे भाजपाचे आमदार आहेत. शिवाय ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात. शिवाय पक्षातीलच आ. संभाजी पाटील-निलंगेकर आणि आ. अभिमन्यू पवार यांच्यातील अंतर्गत मतभेद काही आता लपून राहिलेले नाहीत. त्यामुळे आ. संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या आंदोलनाला दोन दिवस उलटले नसतानाच आ. अभिमन्यू पवार यांची पदयात्रा ही थोडी वेगळ्या अर्थाने घेतली जात आहे. त्यामुळे या पदयात्रेला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Bjp MLA’s kisan question padyatra in Latur after food sacrifice agitation)

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांनो सोयाबीनच्या घसरत्या दरातही ‘हाच’ निर्णय घ्या अन्यथा अधिकचे नुकसान….

मनसेचा ‘काळा दसरा’ ; शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन

पावसाळी कांदा पिवळा पडलायं ? मग अशी करा उपाययोजना

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI