शेतकऱ्यांनो सोयाबीनच्या घसरत्या दरातही ‘हाच’ निर्णय घ्या अन्यथा अधिकचे नुकसान….

पावसाने पीकाचे नुकसान झाले तरी चांगला दर मिळाला तर सर्वकाही भरुन निघेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये आता शेतकरी हे सोयाबीन साठवणूकीवर भर देत आहेत. पण हे अधिकचे धोक्याचे होऊ शकते त्यामुळे आजचा कृषीतज्ञांचा सल्ला सर्वच सोयाबीन उत्पादकांसाठी महत्वाचा राहणार आहे

शेतकऱ्यांनो सोयाबीनच्या घसरत्या दरातही 'हाच' निर्णय घ्या अन्यथा अधिकचे नुकसान....
संग्रहीत छायाचित्र

लातूर : सोयाबीनचे दर हे दिवसेंदिवस घसरत आहेत. सोयाबीन (Soyabean) काढणीपेक्षा बाजारपेठेत (Market) दर काय राहिले आहेत यावरच शेतकऱ्यांचे लक्ष आहे. सोयाबीन हे खरीपातील (Kharif Season) महत्वाचे पीक असून यंदा सर्वकाही रामभरोसे अशीच शेतकऱ्यांची अवस्था झालेली आहे. हंगामाच्या सुरवातीचे दर आणि आताचे दर यामध्ये निम्म्याने फरक पडलेला आहे. पावसाने पीकाचे नुकसान झाले तरी चांगला दर मिळाला तर सर्वकाही भरुन निघेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये आता शेतकरी हे सोयाबीन साठवणूकीवर भर देत आहेत. पण हे अधिकचे धोक्याचे होऊ शकते त्यामुळे आजचा कृषीतज्ञांचा सल्ला सर्वच सोयाबीन उत्पादकांसाठी महत्वाचा राहणार आहे…

सध्या काय स्थिती आहे मार्केटची

खाद्यतेलाचे दर कमी करण्याच्या अनुशंगाने त्यावरील आयातशुल्क हे कमी करण्यात आले आहे. तर दुसरीकडे तेलबियांच्या साठ्यावर केंद्र सरकारने मर्यादा घालून दिल्या आहेत. त्यामुळे सोयाबीनच्या दरात घसरण ही सुरुच आहे. हंगामाच्या सुरवातीला 11 हजार रुपये क्विंटल असलेले सोयाबीन आज 5 हजारावर येऊन ठेपले आहे. शिवाय मार्केटमध्ये आवकही वाढली आहे. लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसाकाठी 15 हजार क्विंटलची आवक सुरु आहे. त्यामुळे सोयाबीनचे घसरत असून ही शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे..

शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री करावी की साठवणूक

सोयाबीनची काढणी कामे आता अंतिम टप्प्यात आहेत. शिवाय पावसामुळे सोयाबीनच्या दर्जावरही परिणाम झालेला आहे. अशा परस्थितीमध्ये चांगला दर मिळेपर्यंत सोयाबीनची साठवणूक करावी का लागलीच विक्री करावी याबाबत शेतकऱ्यांच्या मनात द्वीधा स्थिती आहे. मात्र, याबाबत कृषीतज्ञ आणि व्यापारी अशोक आग्रवाल यांच्याशी संवाद साधला असता सोयाबीनची विक्रीच शेतकऱ्यांच्या फायद्याची राहणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

कारण भविष्यात यापेक्षा अधिकची आवक तर होणारच आहे पण सोयापेंड आणि दिवसेंदिवस खाद्यतेलावरील कमी केले जात असलेले आयातशुल्क यामुळे भविष्यात यापेक्षा दर कमी होतील असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 5 हजाराचा दर मिळत असून याच दरात विक्री केली तर भविष्यातील संकट टळणार आहे.

सोयाबीन साठवून न ठेवता विक्री महत्वाची

आवक वाढली की दर कमी होणार हे बाजाराचे सुत्रच आहे. त्यामुळे अनेक शेतकरी हे सोयाबीन साठवणूकीवर भर देण्याचा विचार करीच असतील पण साठवणूक केल्याने अधिकचे नुकसानच होणार आहे. कारण पावसाने सोयाबीन हे भिजलेले आहे. अशा परस्थितामध्ये त्याची साठवणूक केली तर सोयाबीन सडण्याचा जास्त धोका असतो. त्यामुळे त्याची मिळेल त्या दरात विक्री करणे गरजेचे आहे. शिवाय साठवणूकीसाठी शेतकऱ्यांकडे जागाही उपलब्ध नाही त्यामुळे भविष्याच पाऊस झाला तर काढणी केलेल्या सोयाबीनचे नुकसान होणार आहे. (Expert advice to farmers whether soyabean should be stored or sold)

संबंधित बातम्या :

मनसेचा ‘काळा दसरा’ ; शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन

पावसाळी कांदा पिवळा पडलायं ? मग अशी करा उपाययोजना

शेतातच ‘लाल चिखल’ होत असलेला टोमॅटो आज दरात ‘टॅाप’वर

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI