पनीर आणि चिकनपेक्षा महाग विकल्या जाणाऱ्या ‘बोहार’ भाजीविषयी तुम्हाला माहिती आहे का?

छत्तीसगडमध्ये बोहार ही भाजी सर्वाधिक लोकप्रिय आहे. Bohar Bhaji expensive vegetable

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:26 PM, 8 Apr 2021
पनीर आणि चिकनपेक्षा महाग विकल्या जाणाऱ्या 'बोहार' भाजीविषयी तुम्हाला माहिती आहे का?
बोहार भाजी

रायपूर: भारताच्या मध्य भागातील राज्य म्हणून ओळखलं जाणार राज्य म्हणून छत्तीसगडची ओळख आहे. छत्तीसगडमध्ये वनसंपदा मोठ्या प्रमाणात आहे. येथील लोक मोठ्या प्रमाणात भाज्या खातात. तिथल्या भाज्या आणि त्याची चव या विशेष गोष्टी आहेत. साधारणपणं त्या त्या प्रदेशात उपलब्ध होणाऱ्या भाज्यांवर तेथील शेतकऱ्यांचं उत्पन्न अवलंबून असतं. छत्तीसगडमध्ये बोहार ही भाजी सर्वाधिक लोकप्रिय आहे. वर्षातील काही महिन्यांमध्येच ही भाजी उपलब्ध असते.( Bohar Bhaji expensive vegetable in Chhattisgarh why it is so costly)

बोहार भाजीला विशेष मागणी

छत्तीसगडमध्ये बोहार भाजी लोकप्रिय आहे. बोहार भाजीची चव चांगली असल्यानं लोक मोठ्या प्रमाणात याची मागणी करतात. चव चांगली असल्यानं बोहार भाजी महाग असली तरी लोकांकडून ही भाजी खरेदी केली जाते. बोहारच्या भाजीचा दर 400 रुपये प्रतिकिलो आहे. पनीर आणि चिकनपेक्षाही भाजी महाग आहे.

बोहार भाजी तोडण्यासाठी अनुभव आवश्यक

छत्तीसगडमध्ये बोहार भाजी मार्च ते मे महिन्यात उपलब्ध होते. ही झाडांवर येणारी भादी आहे, फुल बनण्यापूर्वी ती तोडली जाते. ही भाजी तोडण्यासाठी अनुभवाची गरज असते.

दुसऱ्या राज्यांमध्येही मिळते

बोहार भाजी फक्त छत्तीसगडमध्येच मिळते असं नाही इतर राज्यांमध्येही ही भाजी मिळते. लासोडा, गुंदा, भोकर या नावानं या भाजीची ओळख आहे. बोहार भाजीचं जीवशास्त्रीय नाव कोर्डिया डाईकोटोमा हे आहे.

चिंच बनवून भाजी बनवतात

भारतात काही ठिकाणी बोहार भाजीचं लोणचं बनवलं जातं. मात्र, बोहार भाजी फक्त छत्तीसगडमध्ये जेवणात वापरली जाते. चिंच टाकून बोहारची भाजी बनवली जाते.

संबंधित बातम्या:

Corona Cases and Lockdown News LIVE : माझी एकच मागणी आहे की आम्हाला आठवड्याला 40 लाख लसी हव्या आहेत : राजेश टोपे

गुजरातची लोकसंख्या आपल्यापेक्षा निम्मी, तरी त्यांना जास्त लसींचा साठा, संयमी राजेश टोपे कडाडले

Cucumber Farming । एक लाख रुपयात सुरु करा काकडीची शेती, सरकारी मदतीने होईल 8 लाख रुपयांची कमाई

Bohar Bhaji expensive vegetable in Chhattisgarh why it is so costly