Video | भररस्त्यात रेड्यांची टक्कर ! मग काय बघ्यांची गर्दी अन् वाहतूकीचे तीन तेरा

| Updated on: Nov 30, 2021 | 12:40 PM

रेड्यांच्या टकरीवरुन खूप सारे मदभेद आहेत. शासन स्तरावर निर्णय अद्यापही झालेला नाही मात्र, निर्णय काहीही होऊ द्या पण अचानक दोन रेड्यांची टक्कर सुरु झाल्यास काय होते याचा प्रत्यय बीडकरांनी चांगलाच घेतला आहे. शहरातील गजबजलेल्या शाहूनगर भागात ऐन चौकात दोन रेड्यांमध्ये जुंपली. तब्बल अर्धा तास ही झुंज सुरु होती.

Video | भररस्त्यात रेड्यांची टक्कर ! मग काय बघ्यांची गर्दी अन् वाहतूकीचे तीन तेरा
बीड येथील बसस्थानक परिसरात रेड्यांची चक्कर पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती. तर अनेकांना आपला जीव मूठीत घेऊन पळ काढावा लागला
Follow us on

 

बीड : रेड्यांच्या टकरीवरुन खूप सारे मदभेद आहेत. शासन स्तरावर निर्णय अद्यापही झालेला नाही मात्र, निर्णय काहीही होऊ द्या पण अचानक दोन रेड्यांची टक्कर सुरु झाल्यास काय होते ? याचा प्रत्यय (Bead) बीडकरांनी चांगलाच घेतला आहे. शहरातील गजबजलेल्या शाहूनगर भागात ऐन चौकात दोन (buffalo collision) रेड्यांमध्ये जुंपली. तब्बल अर्धा तास ही झुंज सुरु होती. त्यामुळे वाहतूक तर ठप्प झालीच, पण टक्कर बघण्यासाठी बघ्यांचीही मोठी गर्दी झाली. अखेर दोन्ही रेड्यांच्या पायाला दोर बांधून त्यांना दोन वेगवेगळ्या दिशेला नेले तेव्हा ही टक्कर थांबली. मात्र, अर्धा तास सुरु असलेली झुंज बीडकरांनी चांगलीच अनुभवली.

शहरातील बसस्थानकामागील चौकात खासगी व्यक्तींच्या मालकीचे दोन रेडे समोरासमोर आले. सकाळच्या प्रहरी या परीसरातून जनावरांची ये-जा सुरुच असते. मात्र, समोरासमोर येताच या रेड्यांमध्ये टक्कर सुरु झाली. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहने खोळंबली. भररस्त्यात त्यांची ही झुंज सुरु असल्याने बघ्यांची गर्दीही वाढतच गेली. मात्र, रेड्यांचा आक्रमकपणा एवढा होता की बघ्यांनीही सोडविण्याचा साधा प्रयत्नही केला नाही. त्यामुळे पादचाऱ्यांसह दुचाकीस्वारांना रस्त्यात अडकून पडावे लागले. काही जणांनी मोबाइलमध्ये चित्रीकरण करुन मनोरंजनही केले.

पोलीसांचाही नाईलाज

बसस्थानकाच्या पाठीमागील मुख्य रस्त्यावरच हा प्रकार सुरु असल्याने शिवाजीनगप ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पण त्यांना देखील बघ्यांच्याच भुमिकेत रहावे लागले. इतर वेळी दोन्ही गटांमध्ये भांडण झाल्यास शांत करणारे पोलीस रेड्यांच्या टकरीमध्ये काहीच करु शकले नाहीत. अखेर रेड्यांच्या आक्रमकपणा पाहून त्यांनाही तेथून निघून जावे लागले.

दुकाने बंद अन् दुचाकीही कोसळल्या

तब्बल अर्धा ते पाऊन तास रेड्यांची टक्कर ही सुरु होती. या दरम्यानच्या काळात एक रेडा नालीत कोसळला मात्र, त्याने वर येऊन समोरच्या रेड्यावर शिंगाने हल्ला केला. हा सर्व प्रकार पाहून काही व्यापाऱ्यांनी भितीपोटी दुकानेही बंद केली. तर रस्त्यावर पार्किंग केलेल्या दुचाकीही कोसळल्या.
दुचाकी कोसळल्या

अखेर पायात दोर टाकून मिळवले नियंत्रण

अर्धा ते पाऊन तास टक्कर सुरु राहिल्याने शिंगे लागल्याने दोन्ही रेडे हे जखमी झाले होते. असे असतानाही त्यांना काठीने मारुनही नियंत्रण मिळवणे अवघड झाले होते. अखेर दोन्ही रेड्यांच्या पायांना दोरीने बांधून त्यांना एकमेकांपासून वेगळे केले. त्यावेळी रेड्यांच्या मालकांचा जीव भांड्याच पडला आणि बघ्यांची गर्दी पांगली.

संबंधित बातम्या :

खरीप-रब्बी बेभरवश्याचीच, आता शाश्वत शेतीसाठी ‘हाच’ शेतकऱ्यांकडे पर्याय…!

मागणी एकाची, मदत दुसऱ्यालाच, भूमिहीन नागरिकाच्या खात्यावर अतिवृष्टीचे 825 रुपये अनुदान, काय आहे नेमका प्रकार?

वातावरणातील बदलाने रब्बी हंगामाच धोक्यात, योग्य व्यवस्थापन केले तरच पिके पदरात, अन्यथा…