वातावरणातील बदलाने रब्बी हंगामाच धोक्यात, योग्य व्यवस्थापन केले तरच पिके पदरात, अन्यथा…

खरीप अंतिम टप्प्यात असताना झालेल्या अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट झाली होती. मात्र, कमी असेना उत्पादन शेतकऱ्यांना मिळाले होते पण आता रब्बीत काही पदरात पडते की नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे. कारण दर पंधरा दिवसांनी वातावरणात बदल होऊन एक वेगळेच संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहत आहे.

वातावरणातील बदलाने रब्बी हंगामाच धोक्यात, योग्य व्यवस्थापन केले तरच पिके पदरात, अन्यथा...
संग्रहीत छायाचित्र

लातूर : खरीप अंतिम टप्प्यात असताना झालेल्या अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट झाली होती. मात्र, कमी असेना उत्पादन शेतकऱ्यांना मिळाले होते पण आता रब्बीत काही पदरात पडते की नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे. कारण दर पंधरा दिवसांनी (Change in environment) वातावरणात बदल होऊन एक वेगळेच संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहत आहे. आता कुठे ( rabbi season) रब्बी हंगामातील पिकांची उगवण झाली होती. पण ढगाळ वातावरण आणि अवकाळीमुळे उगवणीबरोबरच पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होत आहे. तर बुरशीचेही प्रमाणात वाढत आहे. हंगामाच्या सुरवातीला सर्वकाही पोषक असल्याचे चित्र होते पण आता या बदलामुळे अनेकांना दुबार पेरणी तर करावीच लागली आहे. शिवाय उगवण झालेल्या पिकांची जोपासना करणेही अवघड झाले आहे.

निसर्गातील लहरीपणाचा थेट परिणाम आता रब्बी, फळबागा आणि उर्वरीत खरिपातील कापूस आणि तुरीवर होत आहे. उत्पादन कमी आणि पिक जोपासण्यासाठीच अधिकचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

असे करा पिकांचे व्यवस्थापन

ढगाळ वातावरणामुळे सकाळच्या प्रहरी धुई पडत आहे. वातावरणातील बदलामुळे किडीचा प्रादुर्भाव हा वावरात उभ्या असलेल्या पिकावर होत आहे. त्यामुळे अळी नाशकात फिनॅाफॅास हे किटकनाशक आहे तर प्रोफ्रेनाफॅस साफरमेथ्रीन किंवा कोरॅझिन हे प्रभावी किटकनाशक आहे. बाजारात वेगवेगळ्या प्रकारची किटकनाशके उपलब्ध असून वेळीच त्याची फवारणी करणे आवश्यक झाले आहे. कारण रब्बी हंगामातील पिकांची उगवण ही नुकतीच झाली आहे. यावर किडीचा प्रादुर्भाव अधिक काळ राहिल्यास पिकांच्या वाढीवर आणि परिणामी उत्पादनावर परिणाम होणार आहे. त्यामुळे वेळीच किडीचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

तर उत्पादनावरही होईल परिणाम

यापूर्वीच अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे नुकसान झाले होते. त्यावेळी मात्र, शेतकरी हतबल होते. आता रब्बी हंगामातील पिकांवर उगवताच किडीचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. मात्र, वेळीच किटकनाशकांची फवारणी केली तर पिकांची वाढ भविष्यात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकचा वेळ खर्ची न करता फवारणी कामे उरकती घेणे आवश्यक असल्याचे कृषीतज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे. पिके उगवताच किडीचा प्रादुर्भाव झाला तर मात्र, वाढीवर त्याचा परिणाम होतो. आणि भविष्यात उत्पादकताही घटते. वातावरणातील बदलामुळे फवारणीवरील शेतकऱ्यांचा खर्च तर वाढत आहे पण उत्पादनात मोठी घट होत आहे.

या पिकांना अन् फळबागांवर होणार परिणाम

वातावरणातील बदलाचा परिणाम केवळ रब्बी हंगामातील पिकांवरच नाही तर फळबागा आणि खरिपातील तूर, कापसावरही होत आहे. आंब्याला आता मोहर लागला आहे. यावर बुरशी वाढत असल्याने त्याचे नियंत्रण करणे गरजेचे झाले आहे. द्राक्षामध्ये मनीगळ सुरु झाली आहे. तर मर रोगाचाही प्रादुर्भाव वाढत आहे. थंडी आणि दमट वातावरणामुळे हरभरा, ज्वारी, फळबागामध्ये द्राक्ष यावर दावणी रोग हा वाढत आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांबरोबर आंबा, द्राक्ष या फळबागांवर देखील किटकनाशक आणि रोगनाशक हे एकत्रित मिसळून फवारणी केली तरच उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहे.

संबंधित बातम्या :

Rahul gandhi : चर्चेशिवाय कृषीकायदे मागे कसे घेतले? सरकार चर्चेला घाबरतंय, राहुल गांधींचा निशाणा

महाराष्ट्रातील शेतकरी ‘लई भारी’, राष्ट्रीय कृषी बाजार योजनेत 12 लाख शेतकऱ्यांचा सहभाग

पीक उगवण्यापूर्वीच करा तणनियंत्रण, उत्पादनात वाढ अन् जोमात बहरतील पिके

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI