Sugarcane sludge: क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप, तरीही ऊस फडातच, नेमकी चूक कारखान्यांची की शेतकऱ्यांची..!

| Updated on: Mar 16, 2022 | 11:27 AM

यंदा ऊस गाळपाचा हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे. ऊस शिल्लक म्हणले की साखर कारखान्यांच्या कारभारावरच बोट ठेवले जाते. यंदाच्या हंगामात मराठवाडा विभागात तब्बल 2 कोटी टन ऊसाचे गाळप झाले आहे. असे असतानाही मराठवाड्यातील लातूर, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त ऊसाचा प्रश्न चांगलाच पेटलेला आहे. याला सर्वस्वी कारखानेच जबाबदार आहेत असे नाही तर गेल्या दोन वर्षात ऊसाच्या क्षेत्रात झालेली वाढही महत्वाची आहे.

Sugarcane sludge: क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप, तरीही ऊस फडातच, नेमकी चूक कारखान्यांची की शेतकऱ्यांची..!
यंदा ऊसाचे गाळप विक्रमी झाले असून सर्वाधिक साखरेचे उत्पादनही महाराष्ट्रातून होत आहे.
Follow us on

औरंगाबाद : यंदा (Sugarcane Sludge) ऊस गाळपाचा हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे. ऊस शिल्लक म्हणले की साखर कारखान्यांच्या कारभारावरच बोट ठेवले जाते. यंदाच्या हंगामात (Marathwada) मराठवाडा विभागात तब्बल 2 कोटी टन ऊसाचे गाळप झाले आहे. असे असतानाही मराठवाड्यातील लातूर, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त ऊसाचा प्रश्न चांगलाच पेटलेला आहे. याला सर्वस्वी (Sugar Factory) कारखानेच जबाबदार आहेत असे नाही तर गेल्या दोन वर्षात ऊसाच्या क्षेत्रात झालेली वाढही महत्वाची आहे. मराठवाड्यातील तब्बल 36 साखर कारखान्यांनी क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप केले आहे. असे असतानाही ऊस फडातच असून आता उत्पादनात घट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यंदाच्या हंगामात मराठावाड्यातील 59 साखर कारखान्यांनी सहभाग नोंदवला होता.

गाळप हंगाम सुरु होऊन 5 महिन्याचा कालावधी

15 ऑक्टोंबर रोजी राज्यातील साखर कारखान्यांची धुराडी ही पेटलेली होती. गेल्या पाच महिन्याच्या कालावधीमध्ये साखरेची विक्रमी उत्पादन झाले आहे. शिवाय अनेत साखर कारखान्यांवर कारवाईची टांगती तलवार असल्यामुळे गाळप होऊ शकलेले नाही. यंदा ऊसाचे उत्पादन आणि क्षेत्र वाढीचाही परिणाम गाळपावर झालेला आहे. शिवाय अवकाळी आणि बदलत्या वातावरणामुळे ऊसतोडणीमध्ये खंडही निर्माण झाला होता. गेल्या 5 महिन्यापासून ऊसाचे गाळप हे सुरु असून मे अखेरपर्यंत सुरुच राहणार असल्याचा अंदाज आहे.

मराठवाड्याचेही योगदान

आतापर्यंत ऊस म्हणले की पश्चिम महाराष्ट्रच समोर येत होता. यंदा मात्र, मराठवाडा विभागात ऊसाचे गाळपही वाढले आणि साखरेचे उत्पादनही. हंगाम सुरु झाल्यापासून मराठवाड्यातील 59 साखर कारखान्यांच्या माध्यमातून 2 कोटी टन ऊसाचे गाळप झाले आहे तर यातून 2 कोटी 43 लाख क्विंटलचे उत्पादन झाल्याचे समोर आले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक 13 आणि त्यानंतर लातूर जिल्ह्यातील 10 साखर कारखान्याच्या माध्यमातून अधिकचे गाळप आणि साखरेचे उत्पादन मिळालेले आहे.

क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप

मराठवाड्यातील 59 साखर कारखान्यांपैकी जवळपास 36 कारखाने हे दैनंदिन गाळप क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप करीत आहेत. असे असतानाही ऊस फडातच आहे तो केवळ सरासरीपेक्षा कित्येक पटीने ऊसाचे क्षेत्र वाढले आहे त्यामुळे. उस्मानाबाद जिल्ह्यातील 8 तर औरंगाबाद, नांदेड, बीड, जालना या जिल्ह्यातील प्रत्येकी 3 कारखान्यांनी अधिकचे गाळप केले आहे. शेतकऱ्यांचा ऊस फडात हे खरे असले तरी लागवडीदरम्यान आवश्यक असलेली नोंदणी शेतकऱ्यांनीही केली नसल्याचे समोर येत आहे.

संबंधित बातम्या :

Photo Gallery : अवकाळीच्या नुकसान खुणा, चिकूची बाग उध्वस्त, फळगळतीने स्वप्नांचा चकणाचूर

Milk Price : दूध उत्पादकांना ‘अच्छे दिन’, गायी दुधाच्या दरात लिटरमागे 3 रुपयांची वाढ, दूध संघाचा निर्णय काय?

बोगस रासायनिक खतांमुळे द्राक्षांचे घड जळाले, माढा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये घबराहट; कृषी खात्याची कारवाई