Photo Gallery : अवकाळीच्या नुकसान खुणा, चिकूची बाग उध्वस्त, फळगळतीने स्वप्नांचा चकणाचूर

लासलगाव : अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या मुळावरच उठलेला आहे. गेल्या वर्षभरापासून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. सर्वाधिक नुकसान हे अवकाळी पावसामुळे झालेले आहे. आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान झाले होते. हंगामाच्या सुरवातीपासून ते तोडणीपर्यंत झालेल्या नुकसानीमुळे उत्पादनावरील खर्चही पदरी पडणार की नाही अशी अवस्था झाली आहे. यातच दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस आणि वाऱ्यामुळे येवला तालुक्यातील निमगाव मढ येथील चिकू बाग उध्वस्त झाली आहे. येथील शेतकरी कालीम पठाण यांचे 3 एकर चिकूची बाग पूर्णपणे वाकली असून फळगळती झाली आहे. बाग तर हिरवीगार मात्र, फळगळतीने कच्च्या चिकूचा सडाच पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे न भरुन निघणारे नुकसान त्यांचे झाले आहे.

Mar 16, 2022 | 10:50 AM
उमेश पारीक

| Edited By: राजेंद्र खराडे

Mar 16, 2022 | 10:50 AM

स्वप्नांचा चुराडा : यंदा चिकूमधून अधिकचे उत्पादन मिळेल असा आशावाद पठाण यांना होता. शिवाय फळही तसेच होते. वर्षभरापासून तीन एकरातील बाग त्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासली होती. शिवाय उत्पादन वाढीची आशा त्यांना लागली असतानाच अवकाळीने त्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला आहे.

1 / 4
3 एकरावर चिकूची बाग: येवला तालुक्यातील निमगाव मढ येथील शेतकरी कालीम पठाण यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करुन द्राक्षाला पर्याय म्हणून चिकूची लागवड केली होती. शिवाय आतापर्यंत सर्वकाही सुरळीत होते. चिकूही परिपक्व होण्यासाठी केवळ महिन्याभराचा आवधी होता. मात्र, त्यापूर्वीच पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अवघ्या दोन तासांमध्ये होत्याचे नव्हतं झाल आहे.

2 / 4
नुकसान भरपाईची मागणी : गेल्या वर्षभरापासून केवळ नुकसान आणि नुकसानच. एकही पीक शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले नाही. निसर्गाचा लहरीपणा कायम राहिल्याने ही अवस्था ओढावली आहे. फळबागायत शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली असून शासनाने आता मदतीचा हात देणे गरजेचे असल्याचे पठाण यांनी सांगितले आहे.

3 / 4
न भरुन निघणारे नुकसान : चिकू परिपक्व होण्यापूर्वीच वादळी वाऱ्यामुळे त्याची पडझड झाली आहे. आतापर्यंत द्राक्ष बागांचे  नुकसान झाले होते पण या भागातील द्राक्ष तोडणी अंतिम टप्प्यात असून आता उर्वरीत पिकांना अवकाळीचा फटका बसलेला आहे. त्यामुळे उत्पादनात घट ही निश्चित मानली जात आहे.

4 / 4

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें