AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वसंतराव नाईक यांनी खेडयापाड्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं, त्यांच्यामुळं महाराष्ट्रात कृषी क्रांती : छगन भुजबळ

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांनी खेड्यापाड्यात जावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान देत कृषी क्रांती घडविली आहे.

वसंतराव नाईक यांनी खेडयापाड्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं, त्यांच्यामुळं महाराष्ट्रात कृषी क्रांती : छगन भुजबळ
Chhagan Bhujbal
| Edited By: | Updated on: Jul 01, 2021 | 3:34 PM
Share

नाशिक: माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांनी खेड्यापाड्यात जावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान देत कृषी क्रांती घडविली आहे. त्यामुळे आज आपला देश जगभरात शेतमालाची निर्यात करणारा महत्वपूर्ण देश बनला आहे.  वसंतराव नाईक यांचा वारसा पुढे सुरु ठेवून जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर लोकप्रतिनिधींनी भरीव योगदान देणे महत्वाचे आहे. तसेच जिल्ह्यात अतिशय सुंदर क्रीडा संकुल उभे राहत असून यामुळे जिल्ह्याच्या विकासात भर पडणार आहे, असे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. (Chhagan Bhujbal said Vasantrao Naik Contribution in important in Indian Agriculture development)

देवळाली विधानसभा मतदारसंघातील सैय्यद पिंप्री येथे आयोजित विविध विकास कामांच्या उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते व राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी आमदार सरोज आहिरे, आमदार दिलीप बनकर, आमदार नितीन पवार, माजी खासदार देविदास पिंगळे, जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधूने, प्रदेश पदाधिकारी अर्जुन टिळे,महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्ष अनिता भामरे, जिल्हा परिषद सदस्य यशवंत ढिकले,पंचायत समिती सभापती कांडेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रात कृषी क्रांती घडवली

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त आज कृषी दिन साजरा करण्यात येत आहे. राज्याच्या कृषी धोरणात बदल करून कृषी क्रांती घडविली. त्याचप्रमाणे देशात खासदार शरद पवार यांनी देशात कृषी क्रांती घडवून आणली आहे. त्यामुळे आज आपला देश जगभरात शेतमालाची निर्यात करणारा महत्वपूर्ण देश बनला असल्याचे त्यानी यावेळी सांगितले.

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी वेळोवेळी धोरणात्मक निर्णय घेतले. त्यांनी शेतकऱ्यांना संकरीत बियाणे वापरण्यासाठी प्रोत्साहन देवून शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचाच वारसा घेवून शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळावा व त्यांची फसवणूक होणार नाही यादृष्टिने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शासन स्तरावर विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी असून त्यांना न्याय देण्यासाठी सदैव कटीबद्ध आहे, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

नागरिकांनी नियमांचं पालन करावं

अतिशय सुंदर क्रीडा संकुल उभे राहत असून जिल्हा पुढे न्यायचे असेल तर शैक्षणिक, क्रीडा रस्त्यांची कामे मार्गी लावली पाहिजे. तसेच कोरोना अद्याप संपलेला नाही. दुसरी लाट अद्याप गेलेली नसतांना पुन्हा एकदा तिसरी लाट येऊन उभी राहिली आहे. डेल्टा प्लस सारखा नवीन विषाणू पसरत आहे. यापासून संरक्षण करण्यासाठी नियमावलीचे पालन करण्यात यावे असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केले.

संबंधित बातम्या:

Maharashtra Krishi Diwas 2021: काँग्रेसचे असे मुख्यमंत्री, ज्यांनी शिवसेनेच्या वाघाला बळ दिलं, जे ‘स्वावलंबनासाठी’ फाशी जाईन म्हणाले!

आधी गाडीवर हल्ला, आता गोपीचंद पडळकरांवर गुन्हा, पडळकर म्हणतात, अजित पवारांना का सोडलं?

(Chhagan Bhujbal said Vasantrao Naik Contribution in important in Indian Agriculture development)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.