अवकाळीचा फटका त्यात महावितरणची ‘अवकृपा’, जळगाव जिल्ह्यात 25 हजार कृषिपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत

| Updated on: Dec 02, 2021 | 6:43 PM

राज्यासह जळगाव जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली असून यामुळे शेतकर्‍यांच्या कांदा, मका, गहू, हरभरा या रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे कमी म्हणून की काय जिल्ह्यातील 25 हजार कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

अवकाळीचा फटका त्यात महावितरणची अवकृपा, जळगाव जिल्ह्यात 25 हजार कृषिपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

जळगाव : नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेले आहे. खरीप हंगाामात झालेल्या नुकसानाची भर रब्बी हंगामात काढण्याच्या तयारीत शेतकरी असतांना अवकाळ पावसाने दाणादाण उडविली आहे. राज्यासह जळगाव जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली असून यामुळे शेतकर्‍यांच्या कांदा, मका, गहू, हरभरा या रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे कमी म्हणून की काय जिल्ह्यातील 25 हजार कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व बाजूने कोंडी होत आहे. आता रब्बी हंगामातील पिकांची कुठे उगवण झाली होती. मात्र, अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पिकाचे नुकसान होत आहे. तर महावितरण कंपनीनेही शेतकऱ्यांच्या अडचणीत भर टाकली आहे.

उर्वरीत कापसाचेही नुकसानच

कापूस, मका कांदा इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. खरीप हंगामात झालेल्या नुकसानाची शेतकर्‍यांना तुटपूंजी मदत मिळाली. आता पुन्हा बँकाचे कर्ज काढून रब्बी हंगामाला सुरुवात शेतकऱ्यांनी केली होती. लागणीला आलेली रोपांसह कांदा, मका, गहू, हरभरा या रब्बी हंगामातील पिकांवरही अवकाळी पावसाने पाणी फिरविले. त्यामुळे आता शेती करायची कशी? असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. जिल्ह्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पण कापासाची तोडणी सुरु असतनाच झालेले नुकसान न भरुन निघण्यासारखे आहे.

कृषीपंपाचा विद्युत पुरवठाही खंडीत

जळगाव जिल्ह्यातील 25 हजार कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. जळगाव, जामनेर, चोपडा, यावल, पाचोरा, रावेर, भुसावळ आदी भागांत ही कारवाई करण्यात आली आहे. चोपडा येथे शेतकऱ्यांनी याविरोधात आंदोलन केले. पण प्रशासन शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात न घेता आपली मनमानी सुरु ठेवली आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघात जळगाव, धरणगाव तालुक्यांतही शेतकरी त्रस्त आहेत, पण ना प्रशासन लक्ष देतेय ना येथील लोकप्रतिनीधी. शेतकरी मात्र, नैसर्गिक आणि सुलतानी संकटाचा सामना करीत आहे.

संबंधित बातम्या :

वैद्यनाथ सुरु मग पनेगश्वर शुगर मिल्सकडे मुंडे कुटुंबियांचे दुर्लक्ष का ? पगारासाठी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

रब्बीतील मुख्य पिकालाच शेतकऱ्यांनी निवडला नवा पर्याय, का घटतेय ज्वारीचे क्षेत्र ?

शेतकऱ्यांना दिलासा : सोयाबीन दरातील चढ-उतारानंतर काय आहे बाजारातील चित्र?