वैद्यनाथ सुरु मग पनेगश्वर शुगर मिल्सकडे मुंडे कुटुंबियांचे दुर्लक्ष का ? पगारासाठी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

दोन दिवसांपूर्वीच परळी येथील पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याचे गाळप सुरु झाले आहे. असे असताना मात्र, पंकजा मुंडे यांच्या कुटुंबियांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या लातूर जिल्ह्यातील पनेगश्वर मिल्सच्या कारभाराकडे दुर्लक्ष होत आहे. आता पर्यंत शेतकऱ्यांच्या रोषामुळे कारखाने बंद असल्याचे पाहिले होते पण ही शुगर मिल कर्मचाऱ्यांचेच वेतन थकीत असल्यामुळे अडचणीत आहे.

वैद्यनाथ सुरु मग पनेगश्वर शुगर मिल्सकडे मुंडे कुटुंबियांचे दुर्लक्ष का ? पगारासाठी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
लातूर जिल्ह्यातील पानगाव येथील पनेगश्वर कारखान्यासमोर वेतन मागणीसाठी कर्मचाऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन सुरु आहे.
Follow us
| Updated on: Dec 02, 2021 | 6:46 PM

लातूर : दोन दिवसांपूर्वीच परळी येथील पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ ( Sugar Factory) साखर कारखान्याचे गाळप सुरु झाले आहे. असे असताना मात्र, पंकजा मुंडे यांच्या कुटुंबियांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या (Latur) लातूर जिल्ह्यातील पनेगश्वर मिल्सच्या कारभाराकडे दुर्लक्ष होत आहे. आता पर्यंत शेतकऱ्यांच्या रोषामुळे कारखाने बंद असल्याचे पाहिले होते पण ही शुगर मिल कर्मचाऱ्यांचेच वेतन थकीत असल्यामुळे अडचणीत आहे. गेल्या 31 महिन्यांचा पगारच येथील कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे अगोदर पगार आणि मगच कारखाना सुरु करा अशी भूमिकाच कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे प्रशासन काय तोडगा काढतंय हे पहावे लागणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या काय आहेत अडचणी

लातूर जिल्ह्यातील पानगावर येथे पनेगश्वर साखर कारखाना आहे जो पंकजा मुंडे यांच्या कुटुंबियांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असतो. मात्र, या कारखान्यात कामाला असलेल्या तब्बल 450 कर्मचाऱ्यांचा पगार गेल्या 32 महिन्यांपासून झालेला नाही. अनेक वेळा मागणी करुनही पगार पदरी न पडल्याने आता ऐन गाळपाच्या प्रसंगी संचालकाची कोंडी करण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे. जोपर्यंत थकीत पगार मिळणार नाही तोपर्यंत कारखान्याचे कामकाज केले जाणार नाही असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतलेला आहे. तिकडे परळी येथील वैद्यनाथ साखर कारखान्याचे गाळप सुरु झाले आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांच्याही पगारी करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.

सात दिवसांपासून अर्धनग्न अंदोलन

तब्बल 450 कर्मचाऱ्यांचे 31 महिन्याचे वेतन या पनेगश्वर साखर कारखान्याकडे थकीत आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा सवाल आता कर्मचारी विचारीत आहेत? गेल्या सात दिवसांपासून कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. त्यामुळे आता गाळप सुरु होण्याच्या तोंडावर तरी हा प्रश्न मार्गी लागणार का हे पहावे लागणार आहे. पगार बेरोबर भविष्य निर्वाह निधी भरून घ्यावा, अश्या अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.

गाळप हंगाम मध्यावर तरीही अडचणी कायम

ऊसाचा गाळप हंगाम सुरु होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटलेला आहे. आता पर्यंत थकीत एफआरपी मुळे साखर कारखाना बंद असल्याचे निदर्शनास आले होते. पण कर्मचाऱ्यांमुळेच साखर कारखाना सुरु होण्यास अडसर निर्माण होणार ही पहिलीच वेळ असेल. पण अडीच वर्ष पगार झाला नसल्याने कर्मचाऱ्यांवर ही आंदोलनाची वेळ आलेली आहे. तब्बल 450 कर्मचारी आंदोलनात सहभागी झालेले आहेत.

संबंधित बातम्या :

रब्बीतील मुख्य पिकालाच शेतकऱ्यांनी निवडला नवा पर्याय, का घटतेय ज्वारीचे क्षेत्र ?

शेतकऱ्यांना दिलासा : सोयाबीन दरातील चढ-उतारानंतर काय आहे बाजारातील चित्र?

कृषिमंत्र्यांचे विमा कंपन्यांना ‘अल्टीमेटम’ : आठवड्याभरात शेतकऱ्यांनी केलेले दावे निकाली काढा

Non Stop LIVE Update
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.