रब्बीतील मुख्य पिकालाच शेतकऱ्यांनी निवडला नवा पर्याय, का घटतेय ज्वारीचे क्षेत्र ?

खरीप हंगामाता कापूस आणि रब्बीत ज्वारीचे उत्पादन ठरलेलेच. मात्र, काळाच्या ओघात पिक पध्दतीमध्ये अमूलाग्र बदल होत आहे. शेतकऱ्यांचा नगदी पिकांवर भर आहे. तर वातावरणातील बदलानुसार बदल करावा लागत आहे. रब्बी हंगामात ज्वारी हे मुख्य पिक होते पण आता या पिकाच्या क्षेत्रात कमालीची घट झाली आहे.

रब्बीतील मुख्य पिकालाच शेतकऱ्यांनी निवडला नवा पर्याय, का घटतेय ज्वारीचे क्षेत्र ?
संग्रहीत छायाचित्र

अहमदनगर : खरीप हंगामाता कापूस आणि रब्बीत ज्वारीचे उत्पादन ठरलेलेच. मात्र, काळाच्या ओघात पिक पध्दतीमध्ये अमूलाग्र बदल होत आहे. शेतकऱ्यांचा नगदी पिकांवर भर आहे. तर वातावरणातील बदलानुसार बदल करावा लागत आहे. रब्बी हंगामात ज्वारी हे मुख्य पिक होते पण आता या पिकाच्या क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. विशेषत: दक्षिण महाराष्ट्रामध्ये क्षेत्र घटले असून शेतकरी कांदा किंवा ऊस लागवडीवरच भर देत आहेत. मात्र, ज्वारीसारखे पौष्टीक उत्पादनात मोठी घट होत आहे.

मराठवाड्यातील उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्येच ज्वारीचा अधिकचा पेरा झालेला आहे. रब्बी हंगामातील पेरणी आता अंतिम टप्प्यात आहे. मात्र, मुबलक पाणीसाठा आणि उत्पन्नाच्या दृष्टीने कांदा आणि ऊस लागवडीवरच शेतकऱ्यांचा भर आहे.

शेतीव्यवसयात यांत्रिकीकरणाचा वाढता वापर

कमी खर्चात अधिकचे उत्पादन यासाठी यांत्रिरकीकरणाचा वापर करावा लागला तरी शेतकऱ्यांची तयारी आहे. ज्वारीचे उत्पादन घेण्यासाठी पेरणीपासून काढणीपर्यंत केवळ परीश्रमच आहेत. केवळ जनावरांना कडब्याचा चारा होईल म्हणून ज्वारी या पिकावर भर दिला जात होता. पण आता हिरवा चारा वाढलेला आहे. कडब्याला अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे शेतकरी ज्वारीकडे पाठ फिरवत आहे. शिवाय काढणी प्रसंगी मजूरांची टंचाई हा दरवर्षीचा प्रश्न झाला आहे. शिवाय चार महिने राबूनही ज्वारीला 1हजार 500 ते 2 हजाराचा दर असतो त्यामुळे क्षेत्र रिकामे राहिले तरी चालेल पण ज्वारीचे उत्पादन नको अशी मानसिकता शेतकऱ्यांची झाली आहे.

ज्वारीच्या ऐवजी या पिकांना शेतकऱ्यांची पसंती

यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे अनेक पर्याय खुले आहेत. उत्पन्न वाढीच्या अनुशंगानेच शेतकरी हे ऊस आणि कांदा या नगदी पिकावरच भर देत आहे. शिवाय ऊसाचे क्षेत्र राज्यभर वाढत असून भविष्यातही ऊसालाच अधिकची मागणी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ऊस, कांदा आणि जनावरांना चारा म्हणून मका य् पिकाचे उत्पादन शेतकरी घेत आहेत.

बदलत्या वातावरणामुळे पारंपारिक पिकांनाच महत्व

गेल्या वर्षभरात वातारवरणात कमालीचा बदल झाला आहे. त्यामुळे सर्वाधिक फटका हा शेती व्यवसायाला बसलेला आहे. ज्या पिकांचे व्यवस्थापन सोपे आहे किंवा नुकसान होऊनही अधिकचा आर्थिक फटका बसणार नाही अशाच पिकांना भविष्यात महत्व येणार आहे. कारण नगदी पिकांचे नुकसान हे न परवडणारे आहे. त्यामुळे पुन्हा शेतकरी हा पारंपारिक पिकांकडे वळणार आहे. मात्र, सध्या पोषक वातावरण असल्याने अनेक शेतकऱ्यांनी नगदी पिकाचे धाडस केले आहे. पण दर 15 दिवसांनी वातावरणात होणाऱ्या बदलाला सामोरे जावेच लागणार आहे.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांना दिलासा : सोयाबीन दरातील चढ-उतारानंतर काय आहे बाजारातील चित्र?

कृषिमंत्र्यांचे विमा कंपन्यांना ‘अल्टीमेटम’ : आठवड्याभरात शेतकऱ्यांनी केलेले दावे निकाली काढा

Letter War : सोयापेंड आयातीवरुन पुन्हा राजकारण तापले, नेत्यांचाही आयातीला विरोध

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI