शेतकऱ्यांना दिलासा : सोयाबीन दरातील चढ-उतारानंतर काय आहे बाजारातील चित्र?

चार दिवसांपूर्वी दरात घट झाली होती तर दोन दिवसांपासून दर हे स्थिर होते त्यामुळे सोयाबीनच्या दराबाबत शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाले होते. मात्र, गुरुवारी सोयाबीनच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. दरात मोठी घसरण होती का अशी भिती निर्माण झाली होती. पण सोयाबीनचे दर हे सावरले आहेत.

शेतकऱ्यांना दिलासा : सोयाबीन दरातील चढ-उतारानंतर काय आहे बाजारातील चित्र?
संग्रहीत छायाचित्र

लातूर : गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दराला घेऊन शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे ढग होते. चार दिवसांपूर्वी दरात घट झाली होती तर दोन दिवसांपासून दर हे स्थिर होते त्यामुळे सोयाबीनच्या दराबाबत शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाले होते. मात्र, गुरुवारी सोयाबीनच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. दरात मोठी घसरण होती का अशी भिती निर्माण झाली होती. पण सोयाबीनचे दर हे सावरले आहेत. त्यामुळे आता शेतकरी हे विक्रीवर करणार की अणखीन साठवणूकीवरच भर देणार हे पहावे लागणार आहे.

हंगामाच्या सुरवातीपासून सोयाबीनच्या दरामध्ये चढ-उतार होत आहेत. मात्र, दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात वाढ झाली होती. वाढती मागणी आणि आवक कमी यामुळे सोयाबीनचे दर हे 6 हजार 600 वर गेले होते. पण पुन्हा सोयापेंड आयातीचा मुद्दा समोर येताच दरात घसरण सुरु झाली होती.

सोयाबीनची आवक वाढली

सोयाबीनचे दर वाढूनही शेतकऱ्यांनी साठवणूकीवर भर दिला होता. गतवर्षीप्रमाणेच सोयाबीनला विक्रमी दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. परंतू हे दर कायम राहणार नाहीत. मागणी वाढल्याने दर वाढलेले आहेत. भविष्यात पुन्हा सोयापेंड आयातीचा निर्णय झाला तर मात्र, दरात मोठी घसरण होणार आहे. त्यामुळे सध्याचे दर हे सोयाबीनच्या ढासळलेल्या दर्जानुसार चांगले आहेत. शेतकऱ्यांनी हळुहळु का होईना सोयाबीन विक्रीसाठा काढणे गरजेचे आहे. गुरुवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 10 हजार पोत्यांची आवक झाली होती. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत ही आवक चांगली होती. आता पावसाने उघडीप दिल्यावर अणखीन आवक वाढेल असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील निर्णायाचाही दरावर परिणाम

सोयापेंडच्या आयातीची मागणी पुन्हा डोके वर काढू लागली आहे. केंद्रीय पशूसंवर्धन मंत्री यांनीच सोयापेंड आयातीबाबत थेट विदेश व्यापार महासंचालक यांनाच पत्र लिहून सोयापेंड आयातीसाठी मुदतवाढीची मागणी केली आहे. त्यामुळे याचा परिणाम गेल्या दोन दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरावर जाणवला होता. दर हे 400 रुपयांनी कमी झाले होते. मात्र, या मागणीचे पुढे काही झाले नसून राज्यातील खासदार यांच्याकडूनही सोयापेंडच्या आयातीला विरोध होत आहे. शिवाय राज्य सरकारनेही सोयापेंड आयात केली जाणार नसल्याचे स्पष्ट केल्याने दर पुन्हा वाढतील असे चित्र झाले आहे.

काय आहेत सध्याचे पिकांचे दर?

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. गुरुवारी लाल तूर- 6100 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6000 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6000 रुपये क्विंटल, जानकी चना 4945 रुपये क्विंटल, विजय चणा 4900, चना मिल 4800, सोयाबीन 6850, चमकी मूग 7000, मिल मूग 6250 तर उडीदाचा दर 7401 एवढा राहिला होता.

संबंधित बातम्या :

कृषिमंत्र्यांचे विमा कंपन्यांना ‘अल्टीमेटम’ : आठवड्याभरात शेतकऱ्यांनी केलेले दावे निकाली काढा

Letter War : सोयापेंड आयातीवरुन पुन्हा राजकारण तापले, नेत्यांचाही आयातीला विरोध

ह्रदय पिळवटून टाकणारं चित्रं, महाराष्ट्रातला गारठा मुक्या प्राण्यांच्या जीवावर, कोकरांच्याही शेवटच्या घटका

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI