AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crop Damage : पावसाने खरिपातील 9 लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान, मदतीचे निकष काय?

पिकांच्या नुकसानीची दाहकता पाहता पावसाने उघडीप देताच कृषी अन् महसूल विभाग कामाला लागला आहे. पीक पाहणी करुन पंचनामे करण्याची प्रक्रिया करण्यास सुरवात झाली आहे. पंचनाम्याचे अहवाल लागलीच महसूल आणि कृषी विभागाकडे सपूर्द केले जाणार आहेत. त्यानुसार मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पावसामुळे राज्यात सर्वाधिक नुकसान हे विदर्भ आणि मराठवाड्यात झाले आहे.

Crop Damage : पावसाने खरिपातील 9 लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान, मदतीचे निकष काय?
पावसाने राज्यातील 9 लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पंचनाम्यास सुरवात झाली आहे.
| Updated on: Jul 25, 2022 | 9:17 AM
Share

मुंबई : राज्यात पाऊस ओसरला असला तरी गेल्या 20 दिवसांमध्ये घातलेल्या थैमानाचे चित्र आता समोर येऊ लागले आहे. सध्या (Agricultural Department) कृषी विभागाकडून पिकांची पाहणी आणि पंचनामे ही कामे सुरु आहेत. त्यामुळे (Kharif Season) खरिपातील किती (Crop Damage) पिकांचे नुकसान झाले याची आकडेवारी दिवसागणिस समोर येत आहे तर यामध्ये वाढही होत आहे. दोन दिवसांपूर्वी राज्यात 7 लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाल्याचा आढावा कृषी विभागाचा होता. तर आता 9 लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका हा काही नवीन नाही पण यंदा खरिपातील पेरणी होताच अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सध्या शेतशिवरात कृषी आणि महसूल विभागाकडून पंचनामे सुरु आहेत. मात्र, पंचनाम्यानंतर शेतकऱ्यांना मदत मिळणार तरी किती हे देखील तेवढेच महत्वाचे आहे.

हेक्टरी 6 हजार 800 रुपयांची बोळवण

पावसामुळे खरिपातील सोयाबीन, तूर, उडीद, मूग, कापूस या पिकांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. असे असले तरी नुकसानभरपाईच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न हा सरकारचा राहिलेला आहे. यंदा मदतीचे निकष बदलले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात 2015 सालच्या निकषानुसारच शेतकऱ्यांना हेक्टरी 6 हजार 800 एवढीच रक्कम मिळणार आहे. शेती मशागतीपासून पेरणी आणि खत-बियाणांचा खर्च पाहता ही मदत तोडकी राहणार आहे. त्यामुळे उत्पादनाच्या तुलनेत तर याची बरोबर होऊच शकत नाही पण तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकार करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे.

राज्यात पंचनाम्याला सुरवात

पिकांच्या नुकसानीची दाहकता पाहता पावसाने उघडीप देताच कृषी अन् महसूल विभाग कामाला लागला आहे. पीक पाहणी करुन पंचनामे करण्याची प्रक्रिया करण्यास सुरवात झाली आहे. पंचनाम्याचे अहवाल लागलीच महसूल आणि कृषी विभागाकडे सपूर्द केले जाणार आहेत. त्यानुसार मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पावसामुळे राज्यात सर्वाधिक नुकसान हे विदर्भ आणि मराठवाड्यात झाले आहे. शिवाय यंदा सोयाबीनची पेरणी सर्वाधिक क्षेत्रावर झाली होती. त्यामुळे याच पिकाचेही नुकसान झाल्याचे समोर येत आहे. नुकसानभरपाईबाबत कोणतेही निकष बदलले गेले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना जुन्हा नियमावलीप्रमाणेच भरपाई मिळणार.

सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यामध्ये

मान्सूनचे आगमन कोकणात झाले असले तरी निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका हा मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याला बसलेला आहे. जिल्ह्यातील 2 लाख 97 हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथिमक अंदाज आहे. यामध्ये वाढही होऊ शकते असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. सध्या पंचनामे होत असले तरी मदतीबाबतचे निकष बदलून रकमेत वाढ करावी अशी मागणी होत आहे.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.