Bhandara : सततच्या पावसामुळे साठवलेल्या धान्यालाही फुटले कोंब, उभ्या पिकाचे सोडा आहे त्याची सुरक्षितता महत्वाची

आतापर्यंत पावसामुळे पिकांचे तर नुकसान झालेच होते पण या नुकसानीच्या झळा थेट साठवलेल्या धान्यापर्यंत येऊन ठेपल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाचे सातत्य राहिले आहे. त्यामुळे पिके तर पाण्यात आहेतच पण ज्या शेतकऱ्यांनी अन्नधान्याचा साठा करुन ठेवला आहे. त्यांचेही नुकसान होऊ लागले आहे.

Bhandara : सततच्या पावसामुळे साठवलेल्या धान्यालाही फुटले कोंब, उभ्या पिकाचे सोडा आहे त्याची सुरक्षितता महत्वाची
अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान
Follow us
| Updated on: Aug 13, 2022 | 3:33 PM

भंडारा :  (The vagaries of nature) निसर्गाचा लहरीपणा काय असतो याचा प्रत्यय विदर्भातील शेतकऱ्यांना दिवसागणीस येत आहे. आतापर्यंत पावसामुळे (Crop Damage) उभ्या पिकांना धोका होता. शेत शिवरात पाणी साचल्याने वाढ तर खुंटली होतीच पण शेत जमिनही खरडून गेल्या आहेत. हे कमी म्हणून की काय शेतकऱ्यांनी ज्या (Stock of food grains) अन्नधान्याचा साठा केला होता त्यालाही कोंब फुटले आहेत. सामान्यत: प्रत्येक कुटुंब वर्षभर आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी अन्न धान्य साठवून ठेवतो. मात्र, अतिवृष्टिने या साठवून ठेवलेल्या अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तांदूळ,गहू,डाळ रोजच्या उपयोगी वस्तूचे पाण्यामुळे नुकसान झाले आहेत. त्यामुळे जगावे कसे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

100 कुटुंबामध्ये अन्नधान्याचा प्रश्न

आतापर्यंत पावसामुळे पिकांचे तर नुकसान झालेच होते पण या नुकसानीच्या झळा थेट साठवलेल्या धान्यापर्यंत येऊन ठेपल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाचे सातत्य राहिले आहे. त्यामुळे पिके तर पाण्यात आहेतच पण ज्या शेतकऱ्यांनी अन्नधान्याचा साठा करुन ठेवला आहे. त्यांचेही नुकसान होऊ लागले आहे. गव्हाला थेट कोंब फुटु लागले आहेत. त्यामुळे आता साठवलेल्या धान्यातून उत्पन्न तर सोडाच पण वर्षभर उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटतो की नाही अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे.

सडलेले धान्य थेट जनावरांपुढे

अतिवृष्टि ने या साठवून ठेवलेल्या अन्न धान्याची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. तांदूळ, गहू, डाळ रोजच्या उपयोगी वस्तूचे पाण्यामुळे नुकसान झाले आहेत. सतत पाण्यात राहल्याने अन्न धान्याला कोंब निघाले आहेत. आता हे सडलेले अन्नधान्य खाण्यायोग्य नसल्याने केवळ जनावराच्या उपयोगी येत आहे. हा प्रकार एका- दुसऱ्या घरात घडला नसून मोहाडी तुमसर तालुक्यातील 100 च्या वर कुटुंबावर हे संकट आले आहे. अनेक लोंकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. आता मायबाप सरकार ने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

मोहाडी तालुक्यात सर्वाधिक फटका

यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला असला तरी सर्वत्र समप्रमाणात पाऊस झाला असे नाही. भंडारा जिल्ह्यामध्येही मोठी तफावत आढळून येत आहे. दोन दिवसांपूर्वी अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. या पावसामध्ये धान पिकाचे तर नुकसान झालेच पण शेतजमिनही खरडून गेली आहे. संपूर्ण शेती ही रेतीमय झाली आहे. तब्बल 100 एकर शेती पुराचा गाळ आल्याने पीके गाळाली खाली आली आहे. कधी नव्हे ते हंगामाच्या सुरवातीलाच असे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.