Soybean : हंगाम अंतिम टप्प्यात तरीही सोयाबीन थप्पीलाच, शेतकरी कशाची पाहतोय वाट?

सोयाबीन हंगाम सुरु होऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी अपेक्षित आवक झालेली नाही. केवळ शेतकरीच नाही तर व्यापाऱ्यांनीही सोयाबीनची साठवणूक केलेली आहे. गतवर्षीच्या तुलनेत 14 लाख क्विंटल सोयाबीनची आवक कमी झालेली आहे. तर सोयापेंड निर्मिती आणि निर्यातीवरही याचा परिणाम झालेला आहे. सध्या रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात असून प्रशासकीय स्तरावर खरिपाची तयारी सुरु झाली आहे. असे असताना शेतकऱ्यांना वाढीव दराची अपेक्षा ही कायम आहे.

Soybean : हंगाम अंतिम टप्प्यात तरीही सोयाबीन थप्पीलाच, शेतकरी कशाची पाहतोय वाट?
सोयाबीनच्या दरात घट झाली आहे तर शेतीमालाची आवकही घटलेलीच आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 5:18 AM

लातूर : (Soybean Season) सोयाबीन हंगाम सुरु होऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी अपेक्षित आवक झालेली नाही. केवळ शेतकरीच नाही तर व्यापाऱ्यांनीही (Soybean Storage) सोयाबीनची साठवणूक केलेली आहे. गतवर्षीच्या तुलनेत 14 लाख क्विंटल (Soybean Arrival) सोयाबीनची आवक कमी झालेली आहे. तर सोयापेंड निर्मिती आणि निर्यातीवरही याचा परिणाम झालेला आहे. सध्या रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात असून प्रशासकीय स्तरावर खरिपाची तयारी सुरु झाली आहे. असे असताना शेतकऱ्यांना वाढीव दराची अपेक्षा ही कायम आहे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडे अजूनही 67 लाख टन सोयाबीन शिल्लक असल्याचा दावा सोपा अर्थात सोयाबीन प्रोसेसर्स असो.ऑफ इंडियाने केला आहे. ऑक्टोंबर ते मार्च दरम्यानच्या काळात सोयाबीनची अपेक्षित आवकच झालेली नाही.

शेतकऱ्यांच्या मनात काय ?

अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे सोयाबीन उत्पादनात घट झाली होती. त्यामुळे सोयाबीनला विक्रमी दर मिळेल असा आशावाद शेतकऱ्यांना आहे. हंगामाच्या सुरवातीला 4 हजार 500 वर असलेले सोयाबीन आज 7 हजार 300 वर येऊन ठेपले आहे. तर 7 हजार 600 हा सर्वाधिक दर यंदाच्या हंगामात मिळालेला आहे. गतवर्षीही उत्पादनात घट मे महिन्यामध्ये सोयाबीन 10 हजार रुपये क्विंटलवर पोहचले होते. यंदाही अशीच परस्थिती निर्माण होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. पण आता उन्हाळी सोयाबीनची आवक सुरु झाल्यावर नेमके काय होणार हे देखील पहावे लागणार आहे.

प्रक्रिया उद्योगावरही परिणाम

सोयाबीनच्या घटत्या आवकचा परिणाम हा इतर प्रक्रिया उद्योगावरही झाला आहे. मार्चपर्यंत देशात 40 लाख 50 टन सोयाबीनचे गाळप झाले. तर गतवर्षी याच काळामध्ये 62 लाख 50 हजार टन सोयाबीनवर प्रक्रिया झाली होती. केवळ शेतकऱ्यांनीच साठवणूक केली असे नाही तर व्यापाऱ्यांनीही स्टॉकवरच भर दिला आहे. यामुळे सोयापेंडची निर्मितीही घटलेली आहे. गेल्या सहा महिन्यात केवळ 32 लाख 33 हजार टन सोयापेंडची निर्मिती प्रक्रिया उद्योगांनी केलेली आहे. तर गतवर्षी 50 लाख टनावर निर्मिती झाली होती. यंदा सोयाबीनचे उत्पादन घटले असले तरी शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या भूमिकेचाही परिणाम पाहवयास मिळत आहे.

सोयापेंडच्या निर्यातीवर मोठा परिणाम

दिवाळीपासून सोयाबीनच्या दरात वाढ होत गेली आहे. त्यामुळे वाढीव दराने सोयाबीन खरेदी करुन त्याच्यावर प्रक्रिया करण्याची नामुष्की उद्योजकांवर ओढावली आहे. वाढीव दराने खरेदी आणि प्रक्रिया करुन सोयापेंडची निर्यात ही परवडत नाही. त्यामुळे सोयापेंडची निर्यातच घटलेली आहे. गतवर्षी हंगामाच्या सुरवातीच्या सहा महिन्यात 16 लाख 31 हजार टन सोयापेंडची निर्यात झाली होती तर यंदा यामध्ये 71 टक्क्यांची घट झाली आहे. मार्चपर्यंत केवळ 4 लाख 72 टन सोयापेंडची निर्यात झाली आहे.

संबंधित बातम्या :

Sharad Pawar: ‘आळशी माणसांचा भर उसावर’ एका वाक्यात शरद पवारांनी सांगितले अतिरिक्त उसाचे कारण अन् शेतकऱ्यांना मोलाचा सल्लाही..!

State Government: राज्य सरकारचा मोठा निर्णय, गावापासून 200 मीटर जमिनीला आता नाही N.A ची गरज

Central Government : कापूस तेजीतच..झुकेगा नहीं..! आयतशुल्क माफीनंतर दरावर परिणाम काय?

Non Stop LIVE Update
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.