रब्बी हंगामात मुख्य पिकांमध्येच होतोय बदल, शेतकऱ्यांचा कशावर आहे भर ?

| Updated on: Dec 11, 2021 | 4:47 PM

वातावरणातील बदल आणि बाजारपेठेतील मागणी यावरच कोणत्या पिकाचे उत्पादन घ्यावयाचे हे ठरवले जात आहे. शेतकरीही आता व्यवहारिक झाला असून ज्यातून अधिकचे पैसे मिळतील त्याच पिकाला महत्व देत आहे. म्हणूनच गहू, ज्वारी यासारख्या पिकांची जागा आता कडधान्य घेऊ लागली आहेत. थंड हवामानात गव्हाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जात होते. पण आता शेतकरी बदल करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे.

रब्बी हंगामात मुख्य पिकांमध्येच होतोय बदल, शेतकऱ्यांचा कशावर आहे भर ?
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

मुंबई : वातावरणातील बदल आणि बाजारपेठेतील मागणी यावरच कोणत्या पिकाचे उत्पादन घ्यावयाचे हे ठरवले जात आहे. (farmers) शेतकरीही आता व्यवहारिक झाला असून ज्यातून अधिकचे पैसे मिळतील त्याच पिकाला महत्व देत आहे. म्हणूनच ( rabbi season) रब्बी हंगामात गहू, ज्वारी यासारख्या पिकांची जागा आता (Pulses) कडधान्य घेऊ लागली आहेत. थंड हवामानात गव्हाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जात होते. पण आता शेतकरी बदल करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. सध्या देशात सरासरी क्षेत्राच्या 82 टक्के रब्बी पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत (decline in wheat sector) गव्हाच्या एकरात 2 टक्क्यांनी घट झाली आहे. तर तेलबियांचा पेऱ्यात 16 लाख हेक्टरपेक्षा जास्त वाढ झाली आहे. कृषी तज्ञ (oilseeds) तेलबिया एकरातील वाढीचे श्रेय सरकारी धोरणांना आणि यावेळी तेलबिया पिकांच्या जोरदार किंमतींना देत आहेत.

यामुळे होतोय बदल

गेल्या वर्षभरात मोहरीच्या तेलाच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामध्येच मोहरीच्या तेलाच्या दरात काही फरक तर पडला नाहीच शिवाय मोहरीमध्येही वाढच झालेली आहे. यावेळी काही बाजारपेठेत दर हे 9 हजार 500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले होते. हमीभावात मोहरीला 4 हजार 650 रुपये दर होतात तर बाजारात 9 हजार 500 रुपये. दुपटीने अधिकचा दर असल्याने हमीभाव केंद्राची गरजच लागली नाही. आता सरकारने मोहरीच्या हमीभावात प्रतिक्विंटल 400 रुपयांची वाढ केली आहे. हमीभावात आणि सरकारचे तेलबियांणा घेऊन असलेल्या धोरणांमुळे मोहरीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

तेलबियांच्या क्षेत्रात 16 लाख हेक्टराने वाढ

राजस्थान हा भारतातील मोहरीचा प्रमुख उत्पादक राज्य आहे. यावेळी शेतकऱ्यांनी हरभरा आणि गव्हाऐवजी मोहरीवरच भर दिलेला आहे. या राज्यात सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर मोहरीचा पेरा झाला आहे. यामध्ये अणखीन वाढ होईल असा अंदाज आहे. देशातील तेलबिया क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत 16 लाख 37 हजार लाख हेक्टराने वाढले आहे. गेल्या वर्षी 10 डिसेंबरपर्यंत देशातील ७२ लाख 13 हजार हेक्टर क्षेत्रात तेलबिया पिके घेतली गेली होती. यावेळी याच काळात 88 लाख 5 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून अनेक राज्यांमध्ये अजूनही पेरणी सुरू आहे.

असा आहे गव्हाचा पेरा

गहू हे रब्बी हंगामातील मुख्य पिक आहे. यंदा गव्हाच्या पेऱ्यात 2 टक्क्यांनी घट झाली असली तरी क्षेत्र गव्हाचेच अधिक आहे. गतवर्षीच्या तुलनेत ते कमी जाले आहे. 10 डिसेंबरपर्यंत देशात सुमारे 2 कोटी 48 लाख 67 हजार हेक्टरावर गव्हाची पेरणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी काळात 2 कोटी 54 लाख 7 हजार हेक्टर क्षेत्रात गव्हाची पेरणी पूर्ण झाली होती. या वेळी आतापर्यंत 6 लाख हेक्टर पेरणी ही कमी झाली आहे.

संबंधित बातम्या :

Rabbi Season : महिन्याभराने लांबला रब्बीचा पेरा, काय होणार उत्पादनावर परिणाम ?

तीन दिवसाच्या घसरणीनंतर काय आहेत सोयाबीनचे दर ? नव्या तुरीचीही बाजारात आवक सुरु

अतिवृष्टीत जोपासली पण अवकाळीनंतर बुडापासूनच वाळले तुरीचे पीक, कसे करावे व्यवस्थापन?