कांदा रोपाचे करा ‘असे’ व्यवस्थापन, तरच होईल ‘मर’ रोगापासून संरक्षण

| Updated on: Nov 09, 2021 | 3:15 PM

कांदा पिकावर या वातावरण बदलाचा परिणाम हा होतोच. या दरम्यान नेमके जमिनीलगतची आर्द्र हवा ही थंड होऊन तापमान गोठणबिंदूच्या खाली गेल्यास धुके निर्माण होते. यावेळी वारा वाहणे बंद झाल्यास किंवा आभाळ निरभ्र राहिल्यास धुक्याच्या प्रभावामुळे कांदा रोपाची पात ही जळून जाते आणि गळून पडते. याच दरम्यान मर रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.

कांदा रोपाचे करा असे व्यवस्थापन, तरच होईल मर रोगापासून संरक्षण
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : सध्या रब्बी हंगामातील (Onion cultivation) कांदा लागवडीची लगबग सुरु आहे. मात्र, नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीलाच मराठवाडा तसेच (Nashik) नाशिक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. शिवाय गेल्या काही दिवसांपासून थंडही वाढली आहे. त्यामुळे कांदा पिकावर या वातावरण बदलाचा परिणाम हा होतोच. या दरम्यान नेमके जमिनी लगतची आर्द्र हवा ही थंड होऊन तापमान गोठणबिंदूच्या खाली गेल्यास धुके निर्माण होते. यावेळी वारा वाहणे बंद झाल्यास किंवा आभाळ निरभ्र राहिल्यास धुक्याच्या प्रभावामुळे कांदा रोपाची पात ही जळून जाते आणि गळून पडते. याच दरम्यान मर (outbreak of disease) रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. या मर रोगापासून कांदा रोपाचे संरक्षण कसे करायचे याबद्दल अधिकची माहिती घेऊ.

नगदी पिक म्हणून राज्यात सर्वत्रच थोड्याभवोत प्रमाणात कांद्याची लागवड ही केलीच जाते. पण वातावरणातील बदलाचा सर्वाधिक परिणामही या पिकावरच होतो. त्यामुळे योग्य वेळी खबरदारी हाच यामधला योग्य पर्याय आहे. बुरशीमुळे वाढणाऱ्या या मर आळीचा बंदोबस्त वेळेत न केल्यास उत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे.

मर रोगाचा प्रादुर्भाव कसा वाढत जातो

रब्बी हंगामात दरम्यान पाऊस झाल्यास किंवा ढगाळ वातावरण असल्यास व रोपवाटिकेत बुरशीमुळे मर रोग होतो. रोप वाढत असतानाही बुरशी जमिनीलगतचा भागातून शिरकाव करते. यामध्ये जमिनीलगतचा रोपांचा भाग मऊ पडतो आणि रोपे गळून जातात, सुकतात व पिवळी पडतात. त्यावर पांढरी बुरशी वाढते. बुरशी जमिनीत सुप्तावस्थेत अनेक वर्षे राहू शकते. या रोगामुळे रोपांचे न भरुन निघणारे नुकसान होते. शिवाय याकडे दुर्लक्ष केले तर याचा प्रादुर्बाव इतर रोपांवरही होतो.

मर रोगावर काय आहे उपाययोजना

कांद्याचे बियाणे निरोगी स्वच्छ व खात्रीचे असावे.
* लागवडीपूर्वी बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी.
* रोपाची लागवड करताना पाण्याचा निचरा लवकर आणि चांगल्या प्रमाणात होणारी जागा निवडावी.
* रोपे गादीवाफ्यावर तयार करावे. कारण त्यावर पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होतो.
* रोपवाटिकेची जागा प्रत्येक वेळी बदलावी.
* रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास दोन रोपांच्या ओळीत ताम्रयुक्त बुरशीनाशक पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात ओतावे.
* पुनर लागवड सरी वरंब्यावर करावी.
* धुके पडणारे वातावरण कीडबुरशीला उपयुक्त ठरत असल्याने कीडनाशके अधिक प्रभावीकाम करीत नाहीत. अशा स्थितीत पुढील प्रतिबंधात्मक उपाय करावेत.
* शेताजवळ, बांधावर पहाटेच्या वेळी मध्यम ओलसर पालापाचोळा, कोरडे तण,सुकलेले लाकूड आधी हवेच्या प्रवाहाच्या उलट दिशेलापेटवून धूर करावा.त्यात दगडी कोळसा टाकून धूर व उष्णता रात्रभर राहील असे पाहावे.
* ज्या दिवशी धुके पडण्याची शक्यता असेल त्या दिवशी पाण्यात विरघळणाऱ्या गंधक पावडरीची 40 ग्रॅम प्रति 15 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
* धुक्याचा प्रभाव कमी करण्यासाठी दरवर्षी शेतात अल्प प्रमाणात वाळू मिसळा.
* धुक्यापासून सर्वाधिक नुकसान नर्सरीत होते. संध्याकाळी रोपांच्या पानांवर पाण्याचा हलका फवारा मारावा.
* नर्सरी रोपे रात्रीच्या वेळेत प्लास्टिक कागदाने झाकवेत. असे केल्याने प्लास्टिक मधील तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढते. पॉलिथिन ऐवजी पेंडा देखील वापरता येतो.
रोपांना सकाळी आणि दुपारी सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी त्यांचा दक्षिण भाग उघडा राहील याची खबरदारी रोपे झाकताना घ्यावी.

संबंधित बातम्या :

सोयाबीन परिषद ; सोयाबीन उत्पादकांची परवड सरकारमुळेच : राजू शेट्टी

सोयाबीनच्या दरावरच ठरतेय आवक, साठवणूक हाच शेतकऱ्यांकडे पर्याय

सामुदायिक शेततळ्याचा लाभ घ्यावयाचा कसा, शेतकऱ्यांची ऐकी विकासाची हमी