सामुदायिक शेततळ्याचा लाभ घ्यावयाचा कसा, शेतकऱ्यांची ऐकी विकासाची हमी

सामुदायिक शेततळ्याचा लाभ घ्यावयाचा कसा, शेतकऱ्यांची ऐकी विकासाची हमी
संग्रहीत छायाचित्र

सिंचनाची सोय व्हावी म्हणून केंद्र आणि राज्य सरकारच्यावतीने वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. त्यामुळे उत्पादनात तर वाढ होतच आहे पण शेतकरी हा देखील प्रगतशील बागायतदार होत आहे. त्याअनुशंगानेच राष्ट्रिय फलोत्पादन अभियान अंतर्गत सामुदायिक शेततळे ही योजना राबवण्यात येत आहे

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: राजेंद्र खराडे

Nov 09, 2021 | 1:29 PM

लातूर : शेती व्यवसायात सिंचन हा मोठा भाग आहे. यावरच शेतीचे उत्पादन आणि कोणते पिकाचे उत्पादन घ्यावयाचे हे ठरते. अनेक वेळा केवळ पाण्याची सोय नसल्याने शेतजमिन ही पडिक राहते तर शेतकऱ्यांच्या उत्पादनावरही याचा परिणाम होतो. क्षेत्र (irrigation facilities) सिंचनखाली आल्यावर शेती व्यवसयात अमूलाग्र बदल होतो हे (Farm ponds) शेततळ्याच्या माध्यमातून समोर आले आहे. सिंचनाची सोय व्हावी म्हणून केंद्र आणि राज्य सरकारच्यावतीने वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. त्यामुळे उत्पादनात तर वाढ होतच आहे पण शेतकरी हा देखील प्रगतशील बागायतदार होत आहे. त्याअनुशंगानेच (National Fruit Harvesting Campaign) राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत सामुदायिक शेततळे ही योजना राबवण्यात येत आहे.

शेततळ्यांचे जाळे उभारण्यासाठी मागेल त्याला शेततळे, सामुदायिक शेततळे अशा एक ना अनेक योजना सरकारने सुरु केलेल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागातील शेतकरी आजही केवळ पाठपुरवा करीत नसल्याने याचा लाभ घेऊ शकत नाही. त्यामुळे आज राष्ट्रिय फलोत्पादन अभियान अंतर्गत सामुदायिक शेततळ्याचा लाभ घ्यावयाचा कसा याची माहीती घेणार आहोत. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन उत्पादन वाढीच्यादृष्टीने प्रयत्न करावेत शिवाय सामुहिक शेततळे केले तर आर्थिकदृष्ट्याही ते सोईस्कर राहणार असल्याने ही योजना सुरु करण्यात आलेली आहे.

योजनेत कोण सहभागी होऊ शकते

लाभ हा वैयक्तिक नाही तर शेतकरी समूहाला दिला जातो. यामध्ये लाभार्थी हे एकाच कुटुंबातील नसावेत, एवढेच नाही तर जमिन धारणेबाबतचे खाते उतारे स्वतंत्र असावेत. सामुदायिक शेततळे कमीत कमी 2 किंवा त्यापेक्षा अधिक लाभार्थ्याने करणे आवश्यक आहे. जेवढे क्षेत्र लाभार्थी समूहाकडे असेल तेवढ्या क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या क्षमतेचे शेततळे घेता येईल. शिवाय शेततळ्याती पाणी वापराबद्दल आणि शेततळ्यासाठी लागणाऱ्या जमिनीबद्दल लाभार्थींमध्ये सामंजस्याचा करार असायला हवा. केवळ कोरडवाहू क्षेत्रासाठी नाही तर फलोत्पादन पिके असणे आवश्यक आहे.

अर्ज व आवश्यक कागदपत्रे

ज्या शेतकरी समूहाला अर्ज करायचा आहे त्यांनी https//hortnet.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. यामध्ये 7/12, 8 अ, आधार कार्ड, आधार संलग्न राष्ट्रीयीकृत बैंक खाते पासबूक च्या प्रथम पानाची झेरॅाक्स, विहित नमुन्यातील हमिपत्र, संवर्ग प्रमाणपत्र ऑनलाईन नोंदणी करतानाच ही कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. तरच पुढची प्रक्रिया लवकर पार पडणार आहे.

पुर्वसंमती व करावयाची कामे

* पुर्वसंमती शिवाय पुढची प्रक्रिया होतच नाही. याकरिता तालुका कृषी अधिकारी यांचे कडून पुर्व संमती प्राप्त झाल्यानंतर 10 दिवसाचे आत कागदपत्रांसह प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावा लागणार आहे. * पुर्वसंमती मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आत काम सुरु करुन 4 महिन्याच्या आत पुर्ण करावे लागते. * शेततळे खोदाई, अस्तरिकरण, आणि कुंपन करणे इ. कामे झाल्यानंतर संबंधीत कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी यांना त्याची माहिती द्यावी. पुर्वसंमती मिळाल्यानंतर शेतकरी हे बॅंकेचे कर्ज घेऊ शकतात. यामध्ये काही अडचण निर्माण झाली तर मात्र, तालुका कृषी अधिकारी हे शेतकरी यांचे संमतीने अनुदानाची रक्कम बँक कर्ज खात्यात जमा करण्याची हमी तालुका कृषी अधिकारी देतात.

अनुदान वितरण जमा होण्याची काय आहे प्रक्रिया

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी स्तरावरुन देय अनुदान pfms प्रणाली द्वारे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. शेततळ्याचे खोदकाम, अस्तरिकरण व तार कुंपन ही कामे पूर्ण झाल्यानंतरच योग्य तो अहवाल तालुका कृषी कार्यालयाकडून सादर झाल्यावरच एकाच टप्प्यात अनुदान देण्यात येते. जर मंजूरीपेक्षा मोठे शेततळे करायचे असेल तर अधिकचा खर्च हा शेतकऱ्यांनाच मिळून करावा लागणार आहे.

संबंधित बातम्या :

सब्र का फल मीठा होता है..! कापूस उत्पादकांच्याच हातामध्ये कापसाचे दर

विनापरवाना कारखाना सुरु, ‘स्वाभिमानी’चे कारखान्यातच आंदोलन

…म्हणून गव्हाच्या पेऱ्यात घट, शेतकऱ्यांनी निवडला वेगळा पर्याय

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें