सोयाबीनच्या दरावरच ठरतेय आवक, साठवणूक हाच शेतकऱ्यांकडे पर्याय

सोयाबीनच्या दरामध्ये घट झाल्याचा परिणाम मंगळवारच्या आवक झाला आहे. मंगळवारी 9 हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली तर दर हा 5 हजार रुपयेच मिळाला आहे. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशी आवक वाढली तर दर घसरले आणि आज आवक घटूनही दर कायम राहिल्याने नेमके काय करावे या संभ्रम अवस्थेत शेतकरी आहेत.

सोयाबीनच्या दरावरच ठरतेय आवक, साठवणूक हाच शेतकऱ्यांकडे पर्याय
लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती
Follow us
| Updated on: Nov 09, 2021 | 1:44 PM

लातूर : दिवाळी नंतर सोयाबीनच्या (Soybean Rate) दरात सुधारणा होईल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, पूर्ण हंगामच आता अंतिम टप्प्यात असतानाही सोयाबीनच्या दराचा मेळ ना शेतकऱ्यांना लागतोय ना व्यापाऱ्यांना. दिवाळीनंतर बाजारपेठा सुरु होताच पहिल्या दिवशी (Latur Market) लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 10 हजार क्विंटल सोयाबीनची (soybean arrivals reduced) आवक झाली होती तर दर 5 हजाराचा मिळाला होता. दरामध्ये घट झाल्याचा परिणाम मंगळवारच्या आवक झाला आहे. मंगळवारी 9 हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली तर दर हा 5 हजार रुपयेच मिळाला आहे. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशी आवक वाढली तर दर घसरले आणि आज आवक घटूनही दर कायम राहिल्याने नेमके काय करावे या संभ्रम अवस्थेत शेतकरी आहेत.

खरीपातील मुख्य पिक असलेल्या सोयाबीनचे यंदा ना उत्पादन वाढले ना दर. मात्र, याच पिकावर मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. यंदा मात्र, उत्पादनाबरोबरच दरामध्येही शेतकऱ्यांची निराशाच झालेली आहे. दिवाळीनंतर मागणी वाढेल अशी आशा होती. पण दोन दिवसानंतरही बाजारपेठेत काही उलाढाल होत नसल्याने नेमके सोयाबीनची साठवणूक करावी की विक्री हा मोठा प्रश्न आहे. दुसरीकडे उडदाचे दर हे टिकून आहेत. शिवाय गतवर्षीपेक्षा चांगला दर हा टिकून राहिल्याने उडदातून शेतकऱ्यांना चार पैसे मिळालेले आहेत.

दिवाळीनंतरही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

दिवाळीनंतर सोयाबीनला चांगला दर मिळेल या आशेने सोयाबीनची साठवणूक करण्यात आली होती. शिवाय आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याने सोयाबीनचे वाळवण करुन साठवले होते. दिवाळीनंतर दर वाढतील असे अंदाज वर्तवण्यात आले होते. मात्र, पूर्वीसारखीच सोयाबीनच्या मार्केटची स्थिती आजही कायम आहे. मंगळावारी दर टिकून होते पण पहिल्याच दिवशी दरात घसरण झाल्याने मंगळावारी आवक कमी झाली होती. त्यामुळे सोयाबीनची नेमका साठवणूक करावी की विक्री हा प्रश्न कायम आहे.

उडदाची शेतकऱ्यांना साथ

खरीप हंगामातील केवळ उडीदाचे दर हे हंगामाच्या सुरवातीपासून टिकून राहिलेले आहेत. यामध्ये घट तर झालीच नाही पण वेळोवेळी उडदाच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. पण आता काही निवडक शेतकऱ्यांनी उडदाची साठवणूक केलेली आहे. अनेकांनी उडदाची विक्री केलेली आहे. आता सोयाबीनशिवाय शेतकऱ्यांकडे पर्यायच उरलेला नाही. उलट उडदाची आवक कमी होत असताना पुन्हा दर वाढत आहेत.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. मंगळवारी लाल तूर- 6150 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6090 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6000 रुपये क्विंटल, जानकी चना 4935 रुपये क्विंटल, विजय चणा 4900, चना मिल 4800, सोयाबीन 5360, चमकी मूग 7200, मिल मूग 6300 तर उडीदाचा दर 7400 एवढा राहिला होता.

संबंधित बातमी :

सामुदायिक शेततळ्याचा लाभ घ्यावयाचा कसा, शेतकऱ्यांची ऐकी विकासाची हमी

सब्र का फल मीठा होता है..! कापूस उत्पादकांच्याच हातामध्ये कापसाचे दर

विनापरवाना कारखाना सुरु, ‘स्वाभिमानी’चे कारखान्यातच आंदोलन

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.