AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crop Insurance : ‘बीड पॅटर्न’ला शेतकऱ्यांची पसंती, 4 दिवसांमध्ये 40 हजार शेतकऱ्यांचे अर्ज

'बीड पॅटर्न' मुळे शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होणार आहे. कारण यासाठी आता शासकीय विमा कंपनीच विमा काढणार आहे. यापूर्वी राज्यात वेगवेगळ्या 10 खासगी विमा कंपन्या कार्यरत होत्या. शिवाय त्या केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली काम करीत होत्या. कृषी विभागाने किंवा राज्य कृषिमंत्रि यांनी केलेला हस्तक्षेप देखाील या कंपन्यांना मान्य नव्हता.

Crop Insurance : 'बीड पॅटर्न'ला शेतकऱ्यांची पसंती, 4 दिवसांमध्ये 40 हजार शेतकऱ्यांचे अर्ज
पीक विमा
| Updated on: Jul 07, 2022 | 2:48 PM
Share

लातूर : (State Government) राज्य सरकराने घेतलेला एक निर्णयामुळे पीक विमा योजनेचे स्वरुप बदलले आहे. आता राज्यात (Beed Pattern) ‘बीड पॅटर्न’ (Crop Insurance) पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे. राज्याच्या या निर्णयाचे स्वागत शेतकऱ्यांनीही केले असल्याचे पाहवयास मिळत आहे. कारण 1 जुलै रोजी सुरु झालेल्या या योजनेत पहिल्या 4 दिवसांमध्येच 40 हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. यापूर्वी मुदत संपत येत असताना शेतकऱ्यांचा कल वाढायचा यंदा सुरवातीपासूनच शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यास सुरवात केली आहे. ग्राहक सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी होत असून शेतकऱ्यांनीही हा केलेला बदल स्वीकारले असल्याचे चित्र आहे. शिवाय योजनेत बदल करुनही कोणत्याही अडचणीशिवाय योजनेला सुरवात झाली असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. शेतकऱ्यांचा असाच प्रतिसाद राहिला तर सहभागी शेतकऱ्यांची संख्याही यंदा वाढणार आहे.

बीड पॅटर्नमुळे नेमका फायदा काय ?

‘बीड पॅटर्न’ मुळे शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होणार आहे. कारण यासाठी आता शासकीय विमा कंपनीच विमा काढणार आहे. यापूर्वी राज्यात वेगवेगळ्या 10 खासगी विमा कंपन्या कार्यरत होत्या. शिवाय त्या केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली काम करीत होत्या. कृषी विभागाने किंवा राज्य कृषिमंत्रि यांनी केलेला हस्तक्षेप देखाील या कंपन्यांना मान्य नव्हता. बीड पॅटर्नमध्ये विमा हप्त्याचे दायित्व हे 80:110 असे असणार आहे.विमा कंपनीला द्यावी लागणारी नुकसान भरपाई 110 टक्के पेक्षा अधिक असेल तर वरची रक्कम राज्य सरकार देईल आणि सदर नुकसान भरपाई ही 80 टक्के पेक्षा कमी असेल तर कंपनीला खर्चापोटी 20 टक्के रक्कम देऊन उर्वरित रक्कम राज्य सरकार घेणार होते.

31 जुलै मुदत, अशा साधावा संपर्क

यंदाच्या खरिपातील पिकांचा विमा भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत आहे. शिवाय शेतकऱ्यांनी सुरवात होताच चांगला प्रतिसाद दिला आहे. शेतकऱ्यांना माहिती करुन घेण्यासाठी जिल्हा बॅंकेची शाखा, राष्ट्रीयकृत बॅंक, विविध कार्यकारी सेवा सोसायटी तसेच कृषी विभागाचे कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, उपविभागीय अधिकारी एवढेच नाही तर सीएससी केंद्रावरुन माहिती घेणे गरजेचे आहे. शिवाय स्थानिक पातळीवर अडचणी आल्यास सीएससी केंद्रावरुन देखील माहिती घेता येणार आहे.

विमा हप्त्याची रक्कम कुठे भरायची

शेतकऱ्यांनी त्यांचं खातं असलेल्या बँकेच्या शाखा, प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, पीक विमा पोर्टल आणि आपले सरकार सुविधा केंद्र या ठिकाणी पीक विम्याचा हप्ता भरु शकतात. यासाठी सातबारा उतारा, आधार कार्ड, 8 अ, बॅंक पासबुक झेरॉक्स, पीक पेरणीची नोंद ही कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत.

शेतकऱ्यांचा भर सोयाबीन, कापसावर

सोयाबीन खरिपातील मुख्य पीक आहे. तर गतवर्षी विक्रमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी यंदा कापसालाही काही प्रमाणात पसंती दिली आहे. सध्या अधिकतर सोयाबीन, कापूस, धान पीक, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, तूर आणि मका या पिकांचा विमा काढण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.