AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parbhani : भुईमूगाच्या शेंगालाही मिळाले मार्केट, बाजार समितीमध्ये जाहीर लिलाव

परभणी बाजारसमितीच्या कार्यक्षेत्रात यंदा मोठ्या प्रमाणात भुईमूगाची लागवड झाली आहे. शिवाय पोषक वातावरणामुळे हे उन्हाळी पीकही बहरात होते. अंतिम टप्प्यात मात्र, वाढत्या उन्हामुळे शेंगा पोसल्या नसल्या तरी हंगाम अंतिम टप्प्यात आहे. मार्केट यार्डावर जाहीर लिलावाद्वारे भुईमूग शेंगाची खरेदी करण्याची व्यापाऱ्यांची इच्छा होती. त्यानुसार आडत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मोतीलाल जैन यांनी याबाबत बाजार समिती प्रशासनाला माहिती दिली.

Parbhani : भुईमूगाच्या शेंगालाही मिळाले मार्केट, बाजार समितीमध्ये जाहीर लिलाव
उन्हाळी हंगामातील भुईमूगाची काढणी कामे सुरु आहेत.
Reporter Najir Khan
Reporter Najir Khan | Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: May 16, 2022 | 3:34 PM
Share

परभणी :  (Summer Crop) उन्हाळी भुईमूगाची काढणी कामे जोमात सुरु आहेत. मराठवाड्यात (Groundnut) भुईमूगाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, शेंगदाण्याप्रमाणेच शेंगालाही (Parbhani Market) मार्केट मिळणे गरजेचे होते. त्यानुसार परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाहिर लिलावाच्या माध्यमातून भुईमूगांच्या शेंगाची खरेदीला सुरवात झाली आहे. सोमवारपासून या अनोख्या उपक्रमाला सुरवात झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनाही चांगला दर मिळेल आणि ग्राहकांनाही आता वणवण न फिरता थेट मार्केटमध्ये जाऊन शेंगाची खरेदी करता येणार आहे. शेतकऱ्यांनी भुईमूग विक्रीसाठी आणण्याचे आवाहन बाजार समितीचे सभापती समशेर वरपुडकर यांनी केले आहे.

व्यापाऱ्यांमुळे अनोख्या उपक्रमाला सुरवात

परभणी बाजारसमितीच्या कार्यक्षेत्रात यंदा मोठ्या प्रमाणात भुईमूगाची लागवड झाली आहे. शिवाय पोषक वातावरणामुळे हे उन्हाळी पीकही बहरात होते. अंतिम टप्प्यात मात्र, वाढत्या उन्हामुळे शेंगा पोसल्या नसल्या तरी हंगाम अंतिम टप्प्यात आहे. मार्केट यार्डावर जाहीर लिलावाद्वारे भुईमूग शेंगाची खरेदी करण्याची व्यापाऱ्यांची इच्छा होती. त्यानुसार आडत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मोतीलाल जैन यांनी याबाबत बाजार समिती प्रशासनाला माहिती दिली. त्यानुसार सोमवारपासून लिलावास सुरवात झाली आहे.

शेतकऱ्यांना मिळणार चांगला दर

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला अधिकाअधिक दर मिळावा हाच बाजार समित्यांचा उद्देश आहे. त्यानुसार हा अभिनव उपक्रम असून याला देखील शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळणार आहे. शिवाय यंदा परभणी जिल्ह्यात लागवड क्षेत्र वाढले असल्याने शेतकऱ्यांनाही चांगले मार्केट मिळालंय. सोमवारपासून जाहिर लिलावात भुईमूगाच्या शेंगाची खरेदी होणार असून शेतकऱ्यांनी स्वच्छ शेंगा बाजारात आणल्या तर त्यानुसार चांगला दर मिळणार आहे. सोमवार हा सौद्यांचा पहिला दिवस असल्याने आवक कमी झाली पण शेंगाला समाधानकारक दर मिळाला आहे.

वाढत्या उन्हामुळे उत्पादनात घट

सबंध हंगामात उन्हाळी पिकांसाठी पोषक वातावरण राहिले असले तरी अंतिम टप्प्यात वाढत्या उन्हामुळे पिकांवर परिणाम झाला आहे. भुईमूगाच्या शेंगा तर पोसल्याच गेल्या नाहीत. त्यामुळे मार्केटमध्ये शेंगा दाखल करण्यापूर्वी त्या स्वच्छ धुऊन आणणे गरजेचे आहे. लिलावाच्या पहिल्याच दिवशी कमी आवक झाली असली तरी भुईमूगाच्या शेंगाला सरासरी एवढा दर मिळाला आहे. मात्र, पुढच्या वर्षीदेखील मार्केट यार्डात हळद या शेतीमालची खरेदी विक्रीचा व्यवहार करण्याचा मानस आहे.

Follow Us
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं विधान चर्चेत
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर AI कॅमेऱ्यांची नजर; 275 CCTV कॅमेरे तैनात
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC...
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC केंद्राबाहेर मोठा गोंधळ
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
Pune-Mumbai : द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद