करनालमध्ये भाजप विरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको; पोलिसांच्या लाठीचार्जमुळे शेतकरी रक्तबंबाळ

पोलिसांनी केलेल्या लाठीमारात अनेक शेतकरी रक्तबंबाळ झाल्याचं दिसून आलं. कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाचे नेते आणि भारतीय किसान यूनियनचे राकेश टिकैत यांनी लाठीमारावर नाराजी व्यक्त केली आहे.

करनालमध्ये भाजप विरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको;  पोलिसांच्या लाठीचार्जमुळे शेतकरी रक्तबंबाळ
शेतकऱ्यांवर लाठीचार्ज

नवी दिल्ली: हरियाणा करनालमध्ये भाजपच्या बैठकीचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. पोलिसांनी केलेल्या लाठीमारात अनेक शेतकरी रक्तबंबाळ झाल्याचं दिसून आलं. कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाचे नेते आणि भारतीय किसान यूनियनचे राकेश टिकैत यांनी लाठीमारावर नाराजी व्यक्त केली आहे. हरियाणातील बसताडा टोलनाक्यावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार ही दुर्दैवी घटना असल्याचं म्हटलं आहे. तर, 5 सप्टेंबरला मुजफ्फरनगरमध्ये होणाऱ्या महापंचायतीवरुन लक्ष विचलित करण्यासाठी सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप राकेश टिकैत यांनी केला आहे.

नेमकं काय घडलं?

हरियाणामधील स्थानिक आणि पंचायतीच्या निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपच्यावतीन करनालमध्ये राज्य पातळीवरील बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि इतर भाजप नेते उपस्थित होते. शेतकऱ्यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत याचा विरोध करण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आक्रमक शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग 44 वर बसतांडा टोल नाक्यावर नाकाबंदी केली होती. दुपारी पोलीस शेतकऱ्यांची समजूत काढायला गेले तेव्हा तणावाचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला.

काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका

काँग्रेस नेते आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास यांनी शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जवरुन केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि हरियाणा सरकारचा निषेध केला आहे. मारा मारा शेतकरी आहेत, यांचं धाडस कसं झालं उद्योगपती सरकारकडून आपला हक्का झाला? छातीवर हात ठेऊन हा जय जवान आणि जय किसानच्या घोषणा देणारा भारत राहिलाय का? असा सवाल श्रीनिवास यांनी केला आहे.

लाठीमारानंतर शेतकरी आक्रमक

बसताडा टोलनाक्यावर शेतकऱ्यांवर लाठीचार्ज झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भारतीय किसान यूनियनचे गुरनाम सिंह चढूनी यांनी पोलिसांनी करनालमध्ये शेतकऱ्यांना प्रवेश बंद केला होता. बसताडा टोलनाक्यावर लाठीचार्ज करुन शेतकऱ्यांना जखमी केलं आहे, हे चुकीचं आहे. शेतकऱ्यांनी त्यांना जिथ शक्य असेल तिथं रास्ता रोको करावा, असं चढूनी यांनी म्हटलं आहे.

इतर बातम्या:

अतिशहाण्याला कायद्याचा लगाम गरजेचा होता, तो मुख्यमंत्र्यांनी घातला, राणेंच्या अटकेवर सेनेची पहिली प्रतिक्रिया

दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षांच्या तारखा जाहीर, ‘या’ दिवशी परीक्षेला सुरुवात, वर्षा गायकवाड यांची माहिती

Haryana Karnal police did lathi charge on farmers who protest on Bastada Toll Plaza

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI