Marathwada : पैसेवारीचे महत्व काय असते ? शेतकऱ्यांचा फायदा अन् तोटा वाचा सविस्तर

प्रशासनाकडून जाहीर होणाऱ्या पैसेवारीवरच शेतकऱ्यांना मिळणारी मदत अवलंबून असते. यंदा अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसलेला आहे. यातच आता 7 जिल्ह्यातील पैसेवारी ही 50 पैशांच्या आतमध्ये आल्याने शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गतमहिन्यात विदर्भातील अनेक जिल्ह्यातील पैसेवारी ही जाहीर करण्यात आली होती.

Marathwada : पैसेवारीचे महत्व काय असते ? शेतकऱ्यांचा फायदा अन् तोटा वाचा सविस्तर
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 17, 2021 | 12:46 PM

लातूर : प्रशासनाकडून जाहीर होणाऱ्या पैसेवारीवरच ( farmers) शेतकऱ्यांना मिळणारी मदत अवलंबून असते. यंदा अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका  (Marathwada) मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसलेला आहे. यातच आता 8 जिल्ह्यातील ( crop productivity) पैसेवारी ही 50 पैशांच्या आतमध्ये आल्याने शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गतमहिन्यात विदर्भातील अनेक जिल्ह्यातील पैसेवारी ही जाहीर करण्यात आली होती. मात्र, ही पैसेवारी 50 पैसेपेक्षा जास्त असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. पण मराठवाड्यातील गत 10 वर्षातील उत्पादनाच्या तुलनेत यंदा अधिकचे नुकसान झाले आहे. त्यामुळे 15 डिसेंबर रोजी अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली असून शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

50 पैशांपेक्षा आणेवारी कमी आल्यास ?

पैसेवारी म्हणजेच आणेवारी यावरच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीचे गणित अवलंबून असते. समजा जिल्ह्याची पैसेवारी ही 50 पैशांपेक्षा कमी आली तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा वायदा हा माफ केला जातो. कर्जवसुली थांबवली जाते. म्हणजेच सक्तीची वसुली न करता त्यांना सवलत दिली जाते. एवढेच नाही विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ केली जाते. पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना विमा मिळण्यास शासन स्तरावर मदत होते. यावरच ओला किंवा कोरडा दुष्काळ ठरला जातो.

कशी काढली जाते आणेवारी?

आणेवारी काढण्याची महसूल विभागाची पध्दत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक मंडळातील एका गावाची निवड केली जाते. या गावातील एका शेतामध्ये 10 बाय 10 मीटर आकाराचे प्लॅाट तयार केले जातात. या प्लॅाटमधले पीक कापणी करुन त्याचे उत्पन्न काढले जाते. मंडळानिहाय तालुका स्तरावर सर्व डाटा संकलन केले जाते. उत्पादकतेच्या तुलनेत उत्पन्न हे जर 50 टक्केपेक्षा कमी असले तर पैसेवारी ही 50 पैशांपेक्षा कमी असल्याचे ग्राह्य धरले जाते. खरीप हंगामातील गेल्या 10 वर्षातील उत्पादकता ही डोळ्यासमोर ठेऊन पैसेवारी ही काढली जाते. उत्पादकतेच्या तुलनेत यंदा किती उत्पादन कमी झाले आहे त्यानुसार महसूल विभागाचे अधिकारी पैसेवारी ठरवतात.

मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ

यंदा अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा मराठवाड्यातील खऱीप हंगामाला बसलेला होता. उभी पिके ही काही दिवसांमध्येच आडवी झाली होती. शिवाय त्यानंतर अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे उत्पादकतेमध्ये घट होणार हे निश्चित होते. मात्र, 8 ही जिल्ह्यातील पैसेवारी ही 50 पैसे पेक्षा कमी आली आहे हे विशेष. आता शेतकऱ्यांना विमा अन् शासकीय मदतीचा मार्ग हा मोकळा झाला आहे. आगोदरच नुकसानीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. यातच विमा वाटपात अनियमितता झाली असल्याने किमान पैसेवारी कमी आल्याने शेतऱ्यांना दिलासा मिळालेला आहे.

संबंधित बातम्या :

Rabi Season | शेतकऱ्यांनो स्पर्धेत भाग घ्या अन् हजारोंची बक्षीसे मिळवा, जाणून घ्या सर्वकाही

Positve News | रब्बीवरील संकटाची मालिका संपुष्टात, थंडीच्या कडाक्यात बहरतोय हरभरा

Pik Vima : विमा कंपन्यांचे पहिले पाढे सुरु ; मनमानी कारभारामुळेच शेतकऱ्यांमध्ये संभ्रम कायम

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.