AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आयसीएआर’कडून तांदळाच्या दोन नवीन जातींचा विकास, पाणी कमी लागणार, उत्पादन वाढणार

कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी वजा-पाच अधिक दहाचा एक नवीन फॉर्म्युला सांगितला. या सूत्रात भात लागवडीचे क्षेत्र ५० लाख हेक्टरने कमी करणे आणि उत्पादन १ कोटी टनांनी वाढवणे समाविष्ट आहे.

'आयसीएआर'कडून तांदळाच्या दोन नवीन जातींचा विकास, पाणी कमी लागणार, उत्पादन वाढणार
'आयसीएआर'कडून तांदळाच्या दोन नवीन जाती
| Updated on: May 05, 2025 | 12:43 PM
Share

भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) तांदळाच्या दोन सुधारित जाती विकसित केल्या आहेत. पहिल्या जीनोम-संपादित तांदळाच्या या जातींचे औपचारिक अनावरण केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले. नवीन विकसित केलेल्या तांदळाच्या जातींना डीआरआर धान १०० (कमला) आणि पुसा डीएसटी तांदूळ १ असे नाव देण्यात आले आहे. या जातींचे उत्पादन पारंपारिक जातींपेक्षा २०-३०% जास्त असणार आहे. तसेच त्याला पाणी कमी लागणार आहे, असे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले.

कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, तांदळाच्या या उच्च उत्पादन देणाऱ्या जाती देशातील दुसऱ्या हरित क्रांतीचा मार्ग मोकळा करतील. यामुळे धान्याचे उत्पादन वाढणार आहे. कमी पाण्यात पिके वाढतील आणि खर्चही कमी होईल. तसेच बदलत्या हवामानातही या जाती चांगले उत्पादन देतील. डीआरआर धान १०० (कमला) त्याच्या मूळ जातीपेक्षा सुमारे २० दिवस आधी तयार होणार आहे. त्याचा पेरणीपासून उत्पादन निघण्यापर्यंतचा कालावधी १३० दिवसांचे असले. चांगले उत्पादन, ताण सहनशीलता आणि हवामान अनुकूलता यासाठी हे संशोधन आणि विकसित केले गेले.

महाराष्ट्रासाठी या जातीची शिफारस

आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगाल यासारख्या प्रमुख धान उत्पादक राज्यांसाठी आयसीएआरने या धानाच्या जातींची शिफारस केली आहे. चीन आणि जपानसारख्या देशांमध्ये जीनोम-संपादित तांदळाच्या जाती यापूर्वी विकसित केल्या गेल्या आहेत. परंतु त्यापैकी अनेकाचे संशोधन पूर्ण झाले नाही. फक्त काहीच व्यापारीकरणाच्या टप्प्यावर पोहोचल्या आहेत. आयसीएआरने २०१८ मध्ये भाताच्या जीनोम-संपादन संशोधन प्रकल्प सुरू केला होता.

भारताची बासमती तांदूळची निर्यात ४८,००० कोटी रुपयांची आहे. कृषीमंत्र्यांनी सांगितले की, भविष्यासाठी आपल्याला चांगल्या दर्जाची खात्री करावी लागेल. ही जबाबदारी आपल्या कृषी शास्त्रज्ञांच्या खांद्यावर आहे. यावेळी कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी वजा-पाच अधिक दहाचा एक नवीन फॉर्म्युला सांगितला. या सूत्रात भात लागवडीचे क्षेत्र ५० लाख हेक्टरने कमी करणे आणि उत्पादन १ कोटी टनांनी वाढवणे समाविष्ट आहे.

कृषी सचिव देवेश चौधरी यांनी सांगितले की, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन तांदळाच्या या जातींचा विकास करण्यात आला आहे. या दोन्ही जाती उत्पादन अधिक देणार आहे. तसेच गुणवत्तेमध्येही त्या दर्जेदार असणार आहे. या जाती आता सार्वजनिक आणि खासगी समुदायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.