Sugar Factory : आम्ही जातो..आमच्या गावा..! हंगाम अंतिम टप्प्यावर अन् उसतोड कामगार परतीच्या मार्गावर

| Updated on: May 08, 2022 | 10:10 AM

यापूर्वी उसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीडची ओळख होती. पण आता मुकादम हे गानस्तरावर ऊसतोडीची टोळी बनवत आहेत. त्यामुळे गाळप हंगाम सुरु झाली की सहा महिने संसार हा उसाच्या फडात आणि उर्वरीत काळात आपल्या गावी असेच काहीशे जीवन या कामगारांचे आहे. शिवाय यंदा तर हंगाम वाढला होता. त्यामुळे कामगारांचा कारखान्यांवरील मुक्काम वाढला होता. एप्रिल अखेरपर्यंत सर्व कारखान्यांचे गाळप पूर्ण होईल असा अंदाज आहे.

Sugar Factory : आम्ही जातो..आमच्या गावा..! हंगाम अंतिम टप्प्यावर अन् उसतोड कामगार परतीच्या मार्गावर
ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने ऊसतोड कामगार आहे आता परतीच्या वाटेवर आहेत.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

पुणे :राज्यात यंदा विक्रमी उसाचे गाळप झाले असले तरी यामध्ये (Sugarcane Sludge) उसतोड कामगारांचीही महत्वाची भूमिका आहे. 6 महिने संसार (Sugarcane) उसाच्या फडात अन् 6 आपल्या गावात लेकराबाळात असेच काहीसे जीवन आहे उसतोड कामगारांचे. मात्र, यंदाच्या हंगाम अनेक कारणांनी चर्चेत राहिलेला आहे. विक्रमी गाळप हे अभिमानाची बाब असली तर (Surplus Sugarcane) अतिरिक्त ऊस आणि ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांची होत असलेली अडवणूक हे दोन मुद्दे चर्चेत राहिलेले आहेत. यामुळे काही ठिकाणी उसतोड कामगारांबद्दल नाराजी व्यक्त केली जात असली तरी दुसरीकडे कामगारांनीच रात्रीचा दिवस केल्याने गाळप पूर्ण झाल्याचे म्हणत कळंब तालुक्यात कामगारांचा भर पोशाख आहेर आणि नारळ देऊन केलेला सत्कार कसा विसरता येईल. त्यामुळे अशा विविध अंगाने चर्चेत राहिलेला गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात असून उत्तर पुणे जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांपैकी भीमाशंकर,घोडगंगा,पराग आणि व्यंकटेश या चार साखर कारखान्यांवरील कामगारांनी आता परतीची वाट धरली आहे.

यंत्राची कमी तिथे कामगारांचा कोयता

यंदाच्या ऊस तोडणीमध्ये यंत्राचा वापर हा परिणामकारक ठरणारा होता. त्यामुळे वेळीची बचत आणि अधिकची तोड असा दुहेरी उद्देश साध्य होणार होता. पण अनेक भागात अवकाळी पाऊस झाल्याने यंत्राच्या सहायाने उसतोड शक्यच झाली नाही. त्यावेळी कामगारांचा कोयताच कामी आला आहे. यंदा विक्रमी गाळप होण्यामागे या उसतोड कामगारांचे योगदानही महत्वाचे आहे.

असा हा संसार..

यापूर्वी उसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीडची ओळख होती. पण आता मुकादम हे गानस्तरावर ऊसतोडीची टोळी बनवत आहेत. त्यामुळे गाळप हंगाम सुरु झाली की सहा महिने संसार हा उसाच्या फडात आणि उर्वरीत काळात आपल्या गावी असेच काहीशे जीवन या कामगारांचे आहे. शिवाय यंदा तर हंगाम वाढला होता. त्यामुळे कामगारांचा कारखान्यांवरील मुक्काम वाढला होता. एप्रिल अखेरपर्यंत सर्व कारखान्यांचे गाळप पूर्ण होईल असा अंदाज आहे. मात्र, उत्तर पुणे जिल्ह्यातील कारखान्याचे गाळप पूर्ण झाल्याने कामगरांनी परतीची वाट धरली आहे.

हे सुद्धा वाचा

संसारासोबत हा असतो बारदाणा

ऊस तोडणीसाठी केवळ कामगाराच ऊसाच्या फडात वास्तव्यास येत नाही तर त्यांच्या बरोबर ट्रॅक्टर, बैलजोडी, शेळ्या-मेंढ्या यांच्यासह संसारउपयोगी साहित्य असते. शिवाय या सहा महिन्यात किमान 20 ते 30 वेळा त्यांना इतर ठिकाणी वास्तव्य करावे लागते. आता हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने कामगार हे परतीच्या वाटेवर आहेत.