Winter Season: थंडीमध्ये जनावरांना 5 आजारांचा धोका, काय आहे उपाययोजना?

| Updated on: Jan 11, 2022 | 8:00 AM

हिवाळ्यात जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. कारण वाढत्या थंडीमध्ये लाळ्या, खुरकूत, न्यूमोनिया, अतिसार यासारख्या आजारांचा धोका असतो. यासराख्या आजारांपासून जनावरांचे रक्षण करायचे असेल तर सर्व प्रथम थंडीपासून त्यांचा बचाव करणे महत्वाचे आहे. याकरीता वेगवेगळ्या उपाययोजनांचा अवलंब करावा लागणार आहे.

Winter Season: थंडीमध्ये जनावरांना 5 आजारांचा धोका, काय आहे उपाययोजना?
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

मुंबई : (Winter) हिवाळ्यात जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. कारण वाढत्या (cold risk to animals) थंडीमध्ये लाळ्या, खुरकूत, न्यूमोनिया, अतिसार यासारख्या आजारांचा धोका असतो. यासराख्या आजारांपासून जनावरांचे रक्षण करायचे असेल तर सर्व प्रथम थंडीपासून त्यांचा बचाव करणे महत्वाचे आहे. याकरीता वेगवेगळ्या उपाययोजनांचा अवलंब करावा लागणार आहे. केवळ सुरक्षाच नाही तर थंडीमध्ये त्यांच्या आहारावर विशेष लक्ष केंद्रीत करणे महत्वाचे आहे. थंडीच्या मोसमात जनावरांची विशेष काळजी घ्यावीच लागते पण आपल्या देशातील शेतकऱ्यांकडून नेमके ह्याच गोष्टीकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत प्राध्यापक डॉ. सतवीर शर्मा यांनी व्यक्त केली आहे.

थंडीमध्ये महत्वाचा आहे तो संतुलीत आहार

थंडीत आणि पावसाळ्यात जनावरांची योग्य ती काळजी घ्यावीच लागणार आहे. त्यामुळे थंडीला सुरवात होताच जनावरांना मोकळ्या जागेत न बांधता गोठ्यात बांधालयला हवे. तशी व्यवस्था शेतकऱ्यांकडून नाही झाली तर किमान त्यांच्या अंगावर ऊबदार ब्लॅंकेट, कपडा किंवा पोते टाकायला पाहिजेत. रात्रीच्या वेळी जनावरांना फरशी बांधणार असताल त्याखाली गवत टाकणे गरजेचे आहे. जेणेकरुन ऊबदारपणा निर्माण होईल. थंडीपासून वाचवण्यासाठी संतुलित आहार देणे अत्यंत गरजेचे आहे जेणेकरून जनावरांना ऊर्जा मिळू शकेल. शरीर जितके तंदरुस्त असेल, तेवढे थंडी कमी वाटते. त्याचबरोबर जनावरांची प्रतिकार शक्तीही वाढते आणि रोगाशी लढण्याची क्षमता विकसित होत असल्याचे तज्ञ डॉ. सतवीर शर्मा यांनी सांगितले आहे.

वेळेवर लसीकरण आवश्यक

जनावरांच्या संतुलित आहारात हिरवा चारा, खनिज मिश्रण यांसारख्या गोष्टींचा समावेश असायला हवा. पशुवैद्यक संतुलित आहार तसेच तेल पाजण्याची शिफारस करतात. तथापि, आपण फक्त अधिक दुधाळ प्राण्यांना तेल देऊ शकता. लाळ्या- खुरकूत आलेल्या जनावरांना तेल देणे हे धोक्याचे आहे.त्यामुळे इतर आजारांमध्ये वाढ होणार आहे. याचा सामना करण्यासाठी प्राण्यांना वेळेवर लस दिली पाहिजे. न्यूमोनिया टाळण्यासाठी जनावराचे थंड हवेपासून संरक्षण करणे हाच योग्य पर्याय आहे. दिवसभर ऊन आणि सकाळ-संध्याकाळ थंड वातावरण असेल तर मग अशावेळी त्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. अतिसारासाठी जनावरांना हिमालयातील बतिसा पावडर ही जनावरांच्या खाद्यामध्ये दिली तरी चालणार आहे. यामुळे त्याची पचनसंस्था मजबूत राहते.

संबंधित बातम्या :

Video | गायीकडून दूध जास्त मिळावं म्हणून या शेतकऱ्यांनं केलेला जुगाड ‘सुपर से भी ऊपर’ आहे!

Corona : कल्याण एपीएमसी चा मोठा निर्णय, अगोदर नियमावली आता थेट बाजारच बंद

Onion : सोलापूरच्या बाजारपेठेत कांद्याची विक्रमी आवक अन् दरात घसरण, नेमके कशामुळे बिघडले भावाचे गणित?