‘पांढऱ्या’ सोन्याची साठवणूक करा ; यंदा कापसाच्या दराच तेजी कायम राहणार

| Updated on: Oct 09, 2021 | 4:09 PM

राज्यात 85 लाख गाठी कापसाच्या उत्पादनाचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पावसानंतर बदलल्या परिस्थितीमुळे हे लक्ष्य कमी करुन 75 लाखावर आलेले आहे. त्यामुळे दरात वाढ होत आहे. सध्या कापसाला 7000 रुपये क्विंटल भाव मिळत आहे. तर हमीभाव हा 6025 ठरवून देण्यात आलेला आहे.

पांढऱ्या सोन्याची साठवणूक करा ; यंदा कापसाच्या दराच तेजी कायम राहणार
संग्रहित
Follow us on

लातूर : यंदा अतिरीक्त पावसामुळे खरीपातील (Kharif) उत्पादनाची गणितेच बिघडलेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. पण उत्पादन घटल्याने दरही वाढणार आहेत. सोयाबीनच्या बाबतीत हे होत नसले तरी कापसाचे (Cotton) मात्र, दर वाढत आहेत. राज्यात 85 लाख गाठी कापसाच्या उत्पादनाचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पावसानंतर बदलल्या परिस्थितीमुळे हे लक्ष्य कमी करुन 75 लाखावर आलेले आहे. त्यामुळे दरात वाढ होत आहे. सध्या कापसाला 7000 रुपये क्विंटल भाव मिळत आहे. तर हमीभाव हा 6025 ठरवून देण्यात आलेला आहे.

हमीभावापेक्षा जास्तीचा दर मिळत असून भविष्यातही दर वाढणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी कापसाची तोडणी केली आहे. त्यांनी साठवणूकीवर भर दिला तर अधिकचा फायदा होणार आहे. सुरुवातीला राज्यभरात 85 लाख गाठीचे उत्पादन होईल, असा अंदाज होता. आता 75 लाखावर तो आला आहे.

नोव्हेंबरमध्ये उघडणार केंद्र

कॉटन फेडरेशन आणि सीसीआय दोन्ही एजंसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते कापूस खरेदी करण्यासाठी तयार आहे. परंतु मार्केटमध्ये नोव्हेंबपर्यंत कापूस येण्याची शक्यता आहे. कॉटन फेडरेशनने संपूर्ण राज्यात 70 केंद्र उघडण्यासाठी निविदाही काढल्या आहे. तर सीसीआय विदर्भात 40 केंद्र सुरू करणार आहे. दोन्ही एजंसीची पूर्ण तयारी झाली आहे. बाजारात कापूस येण्याची प्रतीक्षा आहे.

15 लाख गाठीची केली होती खरेदी

गतवर्षी कॉटन फेडरेशनने राज्यात 7.44 लाख गाठ कापसाची खरेदी केली होती. यावर्षीही जवळपास याप्रमाणातच खरेदी केली जाणार आहे. जर शेतकरी केंद्रांवर कापूस घेऊन आले तर अधिकाधिक खरेदी करण्यात येईल. याप्रमाणेच सीसीआयने गतवर्षी 7.50 लाख बेल्स कापसाची खरेदी विदर्भात आणि 10 लाख बेल्सची खरेदी मराठवाड्यात केली होती. त्यावेळी कोरोनाचा प्रादूर्भाव सुरू असल्याने शेतकरी दोन्ही एजन्सीकडे मोठ्या संख्येत पोहोचले होते.

हमीबभावापेक्षा बाजारात अधिकचा दर

कापसाचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणात घटलेले आहे. त्यामुळे बाजारपेठेत याचा परिणाम झाला असून कापसाचे दर हे वाढलेले आहेत. सध्या कापसाला 7000 रुपये क्विंटलचा दर मिळत आहे. दुसरीकडे खरेदी केंद्रावर मात्र, 6025 दर ठरवून देण्यात आला आहे. त्यामुळे साहजिकच शेतकरी हे हमीभाव केंद्राकडे पाठ फिरवणार आहेत. मात्र, नोव्हेंबर नंतरच कापसाची आवक होणार असून शेतकऱ्यांनी योग्यरित्या साठवणूक करून ठेवली तर अधिकचा फायदा होणार आहे. (Increase in cotton prices, more benefit storing farmers)

संबंधित बातम्या :

सोयाबीनची पुन्हा आवक घटली, पावसाने काढणी रखडली

‘ई-पीक पाहणी’ उरले फक्त 5 दिवस, नाही-नाही म्हणत शेतकऱ्यांनीही घेतले मनावर

(MSP) आणि (APMC) म्हणजे नेमके काय? शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहीती