सोयाबीनची पुन्हा आवक घटली, पावसाने काढणी रखडली

पुन्हा पावसाने (Return of rain) हजेरी लावलेली आहे. त्यामुळे सोयाबीनची काढणी- मळणी ही रखडलेली आहेत. पावसाचा परिणाम थेट सोयाबीनच्या आवकवर झालेला आहे. गेल्या दोन दिवसांपासून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढलेली होती. मात्र, शनिवारी केवळ 5 हजार क्विंटल आवक झाली होती. तर दरही कमीच मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडलेली आहे.

सोयाबीनची पुन्हा आवक घटली, पावसाने काढणी रखडली
लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती

लातूर : खरीप हंगाम (Kharif Hangam) शेवटच्या टप्प्यात आला असताना देखील पावसाचे संकट हे कायम राहिलेले आहे. मध्यंतरी आठ दिवस पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीनच्या काढणी कामाला वेग आला होता. पण पुन्हा पावसाने (Return of rain) हजेरी लावलेली आहे. त्यामुळे सोयाबीनची काढणी- मळणी ही रखडलेली आहेत. पावसाचा परिणाम थेट सोयाबीनच्या आवकवर झालेला आहे. गेल्या दोन दिवसांपासून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढलेली होती. मात्र, शनिवारी केवळ 5 हजार क्विंटल आवक झाली होती. तर दरही कमीच मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडलेली आहे.

पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीला सुरवात केली होती. पीकामध्ये पावसाचे पाणी साचले असतानीही पीक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड ही सुरुच होती. मात्र, दोन दिवसांपासून उस्मानाबाद, लातूर, परभणी, जालना, सोलापूर जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झालेले आहे. त्यामुळे काढणी कामे रखडलेली आहेत. शिवाय काढणी करुन लावण्यात आलेल्या गंजीचेही पावसामुळे नुकसान होत आहे. खरीपातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनवरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते मात्र, यंदा सर्वकाही पाण्यात असल्याने आगामी रब्बी हंगामाची तयारी तरी करावी कशी असा प्रश्न उपस्थित होते आहे.

उडदाने दिला आधार

दरवर्षी शेतकऱ्यांना सोयाबीन पीकातून भरघोस उत्पन्न पदरी पडत असते. यंदा मात्र, वावरातले पीक अजूनही बाजारपेठेत आलेले नाही. तर उडदाची काढणी ही पावसाला सुरवात होण्यापूर्वीच झालेली होती. त्यामुळे उडदाचा आधार शेतकऱ्यांना मिळालेला आहे. सध्या लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उडदाला 7300 चा दर मिळत आहे. हंगामाच्या सुरवातीपासून उडदाचे दर हे स्थिर राहिलेले आहेत. तर आता आवक कमी झाली असल्याने पुन्हा दरात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दिवसेंदिवस सोयाबीनच्या दरातही घट

आवक वाढली तर दर कमी होणार हे बाजाराचे सुत्र आहे. पण सोयाबीनच्या बाबतीत असे होताना पाहवयास मिळत नाही. सोयाबीनची आवक 3 हजार क्विंटलने घटूनही शनिवारी 100 रुपयांनी दर हे कमी झाले होते. त्यामुळे काढणी-मळणी करूनही शेतकऱ्यांना सोयाबीन हे पचनी पडलेले नाही. शनिवारी सोयाबीनला 5600 चा दर मिळालेला होता.

सोमवारी बाजार बंद

शेतकरी आंदोलन दरम्यान लखीमपूरला येथे शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या हल्याचा निषेध करीत सोमवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही बंद राहणार आहे. त्यामुळे बाजारपेठेतील व्यवहार हे बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दोन दिवस बाजारपेठ बंद राहिल्याने मंगळवारी सोयाबीनची आवक वाढणार का हे पहावे लागणार आहे.

हमीभाव केंद्राचा होणार फायदा

देशातील अनेक राज्यांमध्ये यापूर्वीच मूग आणि उडदाच्या हमीभाव खरेदी सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरीही खरेदी सुरू करण्याची मागणी करत होते. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील या पिकांना योग्य दर मिळत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राची मागणी केली होती त्यानुसार सरकारने मान्यता दिली आहे. राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये मूग आणि उडीद हमीभावापेक्षा कमी दराने विकले जात आहेत. त्यात उडदाला अनेक ठिकाणी चांगला दर मिळत असला तरी हमीभावाने खरेदीची आवश्यकता होती.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. शनिवारी लाल तूर- 6600 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6370 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6300 रुपये क्विंटल, जानकी चना 5001 रुपये क्विंटल, विजय चणा 5100, चना मिल 4850 , सोयाबीन 6351, चमकी मूग 7007 , मिल मूग 6500 तर उडीदाचा दर 7280 एवढा राहिला होता. (Soyabean arrivals fall again, rain affects market)

संबंधित बातम्या :

‘ई-पीक पाहणी’ उरले फक्त 5 दिवस, नाही-नाही म्हणत शेतकऱ्यांनीही घेतले मनावर

(MSP) आणि (APMC) म्हणजे नेमके काय? शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहीती

शेतकऱ्यांना सुवर्णसंधी ; ट्रॅक्टर खरेदीवर 50% अनुदान, शेतीची मशागत आता अधिक सुलभ

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI