शेतकऱ्यांना सुवर्णसंधी ; ट्रॅक्टर खरेदीवर 50% अनुदान, शेतीची मशागत आता अधिक सुलभ

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि याकरिता त्यांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने पीएम किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50 टक्के रकमेची मदत होणार आहे. पंतप्रधान किसान यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाते. शेतकऱ्यांना लागवडीसाठी विविध प्रकारच्या यंत्रांचीही गरज आहे. त्याअनुशंगानेच केंद्र सरकार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान देत आहे.

शेतकऱ्यांना सुवर्णसंधी ; ट्रॅक्टर खरेदीवर 50% अनुदान, शेतीची मशागत आता अधिक सुलभ
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 09, 2021 | 12:00 PM

मुंबई : शेतकऱ्यांचे हीत जोपासत केंद्र सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी योग्य ती आखणीही करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि याकरिता त्यांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने पीएम किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50 टक्के रकमेची मदत होणार आहे. पंतप्रधान किसान यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाते. शेतकऱ्यांना लागवडीसाठी विविध प्रकारच्या यंत्रांचीही गरज आहे. त्याअनुशंगानेच केंद्र सरकार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान देत आहे. पीएम किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत (PM Kisan Tractor Yojna) अनुदान दिले जात आहे. कसा घतो येतो योजनेचा लाभ ते आपण पाहणार आहोत..

यांत्रिकीकरण ही काळाची गरज

शेती व्यवसयामध्ये अमूलाग्र बदल होत आहेत. ते बदल स्विकारले तरच शेतकऱ्यांची प्रगती होणार आहे. आजही ग्रमीण भागात पारंपारिक पध्दतीने शेती मशागत केली जाते. मात्र, हीच मशागत आता शेतकऱ्यांना यंत्राच्या सहायाने करता येणार आहे. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे शेतकरी हे ट्रॅक्टर घेऊ शकत नाहीत. अशा कठीण परिस्थितीत त्यांना ट्रॅक्टर भाड्याने घ्यावा लागतो किंवा बैलांचा वापर करावा लागतो. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने ही योजना पुढे केली आहे. पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत (पीएम किसान ट्रॅक्टर योजना लाभ) शेतकऱ्यांना निम्म्या किंमतीत ट्रॅक्टर प्रदान करतील.

50% अनुदान दिले जाईल

अवजारे खरेदी करून शेतीमधील उत्पादन वाढवणे ही काळाची गरज आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी अनुदान (PM Kisan Tractor Yojna) पुरवते. या अंतर्गत शेतकरी कोणत्याही कंपनीचे ट्रॅक्टर निम्म्या किंमतीत खरेदी करू शकतात. उर्वरित पैसे सरकार अनुदान म्हणून देते. याशिवाय अनेक राज्य सरकारे ट्रॅक्टरवर 20 ते 50% पर्यंत अनुदान ही आपापल्या पातळीवर शेतकऱ्यांना देतात. त्यामुळे शेती व्यवसयात प्रगती हे सरकारचे धोरण असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घेणे आवश्यक आहे.

या योजनेचा फायदा कसा घ्यायचा?

PM Kisan Tractor Yojna योजनेअंतर्गत केवळ एका ट्रक्टरकरिता अनुदान हे दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांकडे त्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रे गरजेची आहेत. यामध्ये आधार कार्ड, जमिनीचे 7/12, 8 अ, बँक खाते क्रमांक, पासपोर्ट साइज फोटो असावा. या योजनेअंतर्गत शेतकरी जवळच्या कोणत्याही सीएससी केंद्राला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अन्यथा कृषी कार्यालयातील कृषी सहायकाची मदत शेतकऱ्यांना घेता येणार आहे. (Central Government schemes benefit farmers, 50% subsidy on tractors)

संबंधित बातम्या :

यशोगाथा ! दुध विक्रितून लाखोंची कमाई, पुरुषांनाही महिला भारी

तयारी रब्बी हंगामाची : हरभरा या मुख्य पीकावर भर, जाणून घ्या पेरणी ते काढणीपर्यंतची प्रक्रिया

नोकरीची चिंता सोडा आणि ‘हा’ व्यवसाय सुरु करा; सरकारकडून अनुदान, महिन्याला दोन लाखांचे उत्पन्न

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.