AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vegetable Market: इंधन दरवाढीमुळे भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले, वाढत्या उन्हामुळे लिंबाचं मार्केट वाढलं

उन्हाच्या वाढत्या झळाबरोबर सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्याही झळा सहन कराव्या लागत आहेत. रोजच्या जीवनात लागणाऱ्या सर्वच वस्तूंचे दर वाढत आहेत. मात्र ,गेल्या 13 दिवसातील इंधन दरवाढीचा सर्वाधिक परिणाम हा भाजीपाल्याच्या दरावर झालेला आहे. अनेक भागात केवळ शेतामालाच्या वाहतूकीचा खर्च वाढला आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना नाही तर विक्रेत्यांना होताना पाहवयास मिळत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्याचा सर्वाधिक परिणाम मिरची आणि लिंबावर दिसून येत आहे. गुजरातमध्ये एका लिंबाची किंमत ही चक्क 18 ते 20 रुपयांपर्यंत पोहचलेली आहे.

Vegetable Market: इंधन दरवाढीमुळे भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले, वाढत्या उन्हामुळे लिंबाचं मार्केट वाढलं
यंदा वाढत्या मागणीमुळे लिंबाच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Apr 12, 2022 | 5:15 AM
Share

मुंबई : उन्हाच्या वाढत्या झळाबरोबर सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्याही झळा सहन कराव्या लागत आहेत. रोजच्या जीवनात लागणाऱ्या सर्वच वस्तूंचे दर वाढत आहेत. मात्र ,गेल्या 13 दिवसातील (Fuel Rate) इंधन दरवाढीचा सर्वाधिक परिणाम हा (Vegetable Rate) भाजीपाल्याच्या दरावर झालेला आहे. अनेक भागात केवळ (Agricultural Goods) शेतामालाच्या वाहतूकीचा खर्च वाढला आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना नाही तर विक्रेत्यांना होताना पाहवयास मिळत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्याचा सर्वाधिक परिणाम मिरची आणि लिंबावर दिसून येत आहे. गुजरातमध्ये एका लिंबाची किंमत ही चक्क 18 ते 20 रुपयांपर्यंत पोहचलेली आहे. ठोक बाजारात 300 रुपये किलोने विक्री होत आहे तर यापेक्षा अधिक किंमतीमध्ये जोधपूर, वस्त्रापूर येथे विक्री होत आहे. याच तुलनेत महाराष्ट्रातील मुख्य बाजारपेठेत लिंबू 150 ते 200 रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे. वाढत्या इंधनाबरोबरच उन्हाच्या झळामुळे लिंबाच्या मागणीत झालेली वाढ आहे. देशाच्या राजधानीत मात्र, लिंबाचे दर हे 300 ते 350 रुपये किलो असे आहेत. म्हणजेच एक लिंबू घेण्यासाठी 10 रुपये मोजावे लागत आहेत.

लिंबाच्या मागणीत वाढ, उत्पादनात झाली घट

गुजरात, दिल्ली, हैदराबाद, कर्नाटकाच्या तुलेनेत महाराष्ट्रात भाजीपाल्याचे दर हे नियंत्रणात आहे. शेतकरी ते बाजारपेठेच्या अंतरावरुनही भाजीपाल्याचे दर ठरत आहेत. उत्पादकता कमी-जास्त यावर भाजीपाल्याचे दर नाहीत तर गेल्या 13 दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे दर गगणाला भिडले आहेत. गुजरातमध्ये एक लिबू 18 ते 25 रुपयाला तर दिल्लीत तेच लिंबू 10 ते 12 रुपयाला आहे. उन्हाळ्यात लिंबाच्या मागणीत वाढ झाली तरी महाराष्ट्रीतील मुख्य बाजारपेठेत 8 ते 10 रुपयाला एक लिंबू पडत आहे. मात्र, इंधन दरवाढीचा अधिकचा परिणाम होत आहे.

हैदराबादमध्ये पाच पटीने वाढले लिंबाचे दर

हैदराबादमध्ये लिंबाच्या दराबरोबर मिरची दराचाही ठसका उडलेला आहे. एएनआयच्या वृत्तानुसार गेल्या काही दिवसांपूर्वी येथे लिंबाचे कॅरेट हे 700 रुपयांना होते तर तेच आता 3 हजार 500 रुपयांवर पोहचलेले आहे. तब्बल सातपटीने दर वाढले आहेत. एकतर लिंबाच्या उत्पादनात घट झाली आहे. असे असतानाच मागणी वाढली तर दुसरीकडे डिझेलच्या वाढत्या दरामुळे वाहतूकीचा खर्च वाढला आहे. या सर्व बाबींचा परिणाम थेट भाजीपाल्याच्या दरावर जाणवू लागला आहे.लिंबाप्रमाणेच हिरव्या मिरचीचेही दर गगनाला भिडलेले आहेत.

महाराष्ट्रातील भाजीपाल्याचे काय आहेत दर?

यंदा प्रथमच लिंबाला विक्रमी दर मिळालेला आहे. आवक घटल्याने लिंबाचे दर थेट 250 रुपयांवर गेले आहे. तर पुणे मार्केट कमिटीमध्ये 15 किलोची एक गोणी ही 250 ते 500 पर्यंत विकली जात आहे. तर आवक ही केवळ 700 ते 800 गोण्यांची होत आहे. ही लिंबाची अवस्था असली तरी महाराष्ट्रातील मुख्य बाजारपेठेत कांदा 7 ते 10 रुपये किलो, बटाटा 12 ते 16 रुपये किलो, हिरवी मिरची 60 ते 70 रुपये किलो, कारले 20 ते 22 रुपये किलो, वांगी 15 ते 30 रुपये किलो, ढोबळी मिरची 25 ते 30 रुपये किलो असे ठोक बाजारातले दर आहेत. इतर राज्याच्या तुलनेत हे दर नियंत्रणात आहे.

यामुळे दरात होत आहे दरात वाढ

गेल्या काही दिवसांपासून शेतीमाल वाहतूकीचे दर वाढले आहेत. त्यामुळे भाजीपाला खरेदीच्या किंमतीमध्ये देखील वाढ होत आहे. तर दुसरीकडे वाढत्या किंमतीमुळे पाहिजे त्या प्रमाणात भाजीपाल्याची विक्री होत नाही. २२ मार्चपासून पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरात वाढ झाल्याचा हा परिणाम आहे. हे कमी म्हणून की काय वातावरणातील बदलामुळे लिंबाच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत. उत्पादन घटल्यामुळे लिंबाच्या दरात वाढ झाली आहे. दक्षिण भारतात गेल्या दीड महिन्यात हिरव्या मिरचीचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे मिरचीचेही दर वाढत आहेत.

संबंधित बातम्या :

Jalna : खरीप बियाणांची चिंता नाही, रासायनिक खतांचे काय ? जिल्हा प्रशासन लागले कामाला

Rabi Season अंतिम टप्प्यात, शेतीमालाची साठवणूक करायची कशी? शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला

Watermelon : उत्पादन वाढीसाठी कायपण!, हनुमंतगाव शिवारात कलिंगड शेतातच भव्य मेळावा

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.