Success Story: दोन युवा शेतकऱ्यांची प्रेरणादायी कहाणी, माळरानावर बहरली स्ट्रॉबेरी

| Updated on: Feb 06, 2022 | 1:06 PM

'स्ट्रॉबेरी' म्हणलं की आपल्यासमोर येतो तो थंड हवेचा उत्तर भारतामधील भाग. कारण मराठवाडा अन् स्ट्रॉबेरीचा दूरदूरपर्यंत संबंध नाही अशीच ती काय झालेली आपली भावना. मात्र, मराठवाड्यातील माळरानावर देखील स्ट्रॉबेरी या फळपिकाची बाग बहरू शकते हे उस्मानाबाद तालुक्यातील तोरंबा गावातील युवा शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे.

Success Story: दोन युवा शेतकऱ्यांची प्रेरणादायी कहाणी, माळरानावर बहरली स्ट्रॉबेरी
उस्मानाबाद तालुक्यातील तोरंबा गावाच्या शिवारात दोन शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी फुलवली आहे.
Follow us on

उस्मानबाद : (Strawberry) ‘स्ट्रॉबेरी’ म्हणलं की आपल्यासमोर येतो तो थंड हवेचा उत्तर भारतामधील भाग. कारण मराठवाडा अन् स्ट्रॉबेरीचा दूरदूरपर्यंत संबंध नाही अशीच ती काय झालेली आपली भावना. मात्र, (Marathwada) मराठवाड्यातील माळरानावर देखील स्ट्रॉबेरी या फळपिकाची बाग बहरू शकते हे उस्मानाबाद तालुक्यातील तोरंबा गावातील युवा शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळेच गावचा तोरा आता वाढलेला आहे. काळाच्या ओघात आवश्यक ते बदल करुन इतर भागातही (Nutritious environment) पोषक वातावरण तयार करुन उत्पादन घेतले जात आहे. त्यामुळे पीक पध्दतीमध्ये तर बदल घडत आहेच पण उत्पादनात वाढ होण्याच्या अनुशंगानेही शेतकरी प्रयत्न करीत आहेत. केवळ प्रयत्नच नाही तर या गावातील दोघांनी या बागेतून लाखोंचे उत्पन्नही घेतले आहे. त्यामुळे फळबागांसाठी विशिष्ट वातावरणच आवश्यक आहे हा समज सचिन सुर्यवंशी आणि वैभव सुर्यवंशी यांनी मोडीत काढला आहे.

लागवड गुंठ्यामध्ये उत्पन्न लाखांत

सुरवातीच्या काळात अधिकचा आर्थिक फटका नको म्हणून सचिन सुर्यवंशी आणि वैभव सुर्यवंशी यांनी कमी क्षेत्रातच स्ट्रॉबेरीची लागवड केली. सचिन सुर्यवंशी यांनी 12 गुंठ्यात तर वैभव यांनी 17 गुंठ्यांत प्रयोग केला. दोघांचे मिळून पाऊन एकराचे क्षेत्र होते पण कष्ट आणि योग्य नियोजन यापेक्षा कित्येक पटीने अधिकचे. लागवडीपासून काढणीपर्यंत योग्य नियोजन केल्यानेच त्या दोघांना आतापर्यंत 6 लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. शिवाय अजून काढणी सुरुच असून भविष्यात 2 लाखाचे उत्पन्न मिळेल असा आशावाद या दोघांनाही आहे.

कष्टाला योग्य नियोजनाची जोड…

लागवड करतानाच अपेक्षित उत्पादन घेण्याचा निर्धार या दोघांनी केला होता. शिवाय बांधावरुनच नियोजन नाही मल्चिंगपेपर अंथरण्यापासून ते आता तोडणी पर्यंत सर्व बाबींची काळजी घेतल्यानेच हे शक्य झाले आहे. कष्टापेक्षा नियोजन हेच महत्वाचे असल्याचे सचिन सुर्यवंशी यांनी सांगितले आहे तर हा सुरवातीचा टप्पा आहे. अजूनही स्ट्रॉबेरीला मागणी असून उर्वरीत काळात 2 लाखाचे उत्पन्न पदरी पडेल असा आशावाद या दोघांनाही आहे.

नवनवीन प्रयोगच शेतकऱ्यांना तारतील

पारंपरिक शेतीमधून उत्पादन तर सोडाच पण झालेला खर्चही निघणे मुश्किल आहे. दरवर्षी खरीप हंगामात सोयाबीन आणि रब्बीत ज्वारी यापेक्षा उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी हे वेगळा प्रयोगच करीत नाहीत. शिवाय निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. स्ट्रॉबेरी कमी क्षेत्रावर पण योग्य नियोजनाने लागवड केल्यास उत्पन्न हमखास असल्याचे सचिन सुर्यवंशी यांनी सांगतिले आहे. लागवडीपासून ते बाजारपेठेची माहिती घेऊनच हा प्रयोग करण्याचा सल्लाही त्यांनी इतरांना दिला आहे.

संबंधित बातम्या :

Maize Crop: मका पिकामध्ये देखील लष्करी अळीचा प्रादुर्भाव, उत्पादनात घट अन् जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न

Cotton Market: एवढंच राहिलं होत, एकीकडे उत्पादनात घट तर दुसरीकडे व्यापाऱ्यांकडून लूट

शेतकरी हताश : 50 पैशाला मेथीची जुडी विकण्यापेक्षा शेतकऱ्यांने निवडला हा मार्ग, ना वाहतूकीचा खर्च, ना ग्राहकांची मनधरणी