AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकरी हताश : 50 पैशाला मेथीची जुडी विकण्यापेक्षा शेतकऱ्यांने निवडला हा मार्ग, ना वाहतूकीचा खर्च, ना ग्राहकांची मनधरणी

तालुक्यातील पाटोदा येथील साहेबराव बोराडे यांनी देखील कमी जागेत मेथी या पालेभाजीची लागवड केली. 20 गुंठेच पण योग्य व्यवस्थापन करुन यामधून चार पैसे मिळतील असा त्यांना आशावाद. मध्यंतरीच्या नैसर्गिक संकटावरही त्यांनी वेगवेगळी औषध फवारणी करुन मात केली मात्र, बाजारपेठेतील घटत्या दरामुळे ते हताश झाले. तीन महिने मेहनत..पाण्यासारखा पैसा खर्ची करुन आता मेथीच्या जुडीला 50 पैशाप्रमाणेही दर मिळत नाही.

शेतकरी हताश : 50 पैशाला मेथीची जुडी विकण्यापेक्षा शेतकऱ्यांने निवडला हा मार्ग, ना वाहतूकीचा खर्च, ना ग्राहकांची मनधरणी
येवला तालुक्यातील शेतकऱ्याने मेथीला कवडीमोल दर मिळत असल्याने रोटरने मोडणी केली.
| Edited By: | Updated on: Feb 06, 2022 | 9:41 AM
Share

लासलगाव : ‘बुडत्याला काडीचा आधार’ म्हणतात ना त्याप्रमाणे मुख्य पिकांचे नुकसान झाले तरी शेतकऱ्यांनी चार पैसे पदरी पडतील म्हणून (Vegetable) भाजीपाल्याचा आधार घेण्याचा निर्धार केला. त्यानुसार येवला तालुक्यातील पाटोदा येथील साहेबराव बोराडे यांनी देखील कमी जागेत मेथी या पालेभाजीची लागवड केली. 20 गुंठेच पण (Perfect Management) योग्य व्यवस्थापन करुन यामधून चार पैसे मिळतील असा त्यांना आशावाद. मध्यंतरीच्या नैसर्गिक संकटावरही त्यांनी वेगवेगळी औषध फवारणी करुन मात केली मात्र, (Market) बाजारपेठेतील घटत्या दरामुळे ते हताश झाले. तीन महिने मेहनत..पाण्यासारखा पैसा खर्ची करुन आता मेथीच्या जुडीला 50 पैशाप्रमाणेही दर मिळत नाही. भाजीपाला हे हंगामी पीक आहे. किमान दर मिळाला तरी कुटूंब उदरनिर्वाहसाठी त्याचा उपयोग होईल मात्र, यंदा सर्वकाही नुकसानीचेच होत असल्याने बाजारपेठेत मिळत असलेल्या दरात वाहतूक खर्चही निघत नसल्याने त्यांनी उभ्या मेथीवर रोटर फिरवणेच पसंत केले आहे. क्षेत्र कमी असले तरी त्यामागचे कष्ट आणि शेतकऱ्याच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत.

…म्हणून फिरवला रोटर

लागवडीपासून ते काढणी दरम्यानच्या तीन महिन्यामध्ये मशागत, औषध फवारणी, तोडणी यासारखी कामे करुन मेथी वाहतूकीचा खर्चही निघेना असा दर. बाजारात कोणी 50 पैसेप्रमाणेही जुडी घ्यायला तयार नाही. त्यामुळे बाजारातील दिवसभराची मेहनत आणि वाहतूकीचा खर्च करण्यापेक्षा यावर रोटर फिरवून दुसरे पीक साधेल या हिशोबाने 20 गुंठ्यातील उभ्या मेथीवर साहेबराव यांनी रोटर फिरवला आहे.

शेतकऱ्यांचा हंगामी पिकावर भर

मुख्य पिकांमधून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी भाजीपाल्यावर भर दिला होता. मात्र, नैसर्गिक संकटाने या हंगामी पिकांचीही पाठ सोडलेली नाही. मध्यंतरी वातावरणातील बदल आणि अवकाळी पावसाचा परिणाम भाजीपाल्यावरही झाला होता. शेतकऱ्यांनी पावसाने उघडीप देताच औषध फवारणी करुन भाजीपाला जोपासला. कमी क्षेत्रात उत्पादन असल्याने योग्य ते नियोजन करता आल्याचे शेतकरी साहेबराव बोराडे यांनी सांगितले मात्र, बाजारपेठेचे सुत्र आपल्या हाती नाही. त्यामुळे नैसर्गिक संकटावर मात करु शकलो पण बाजारपेठेतील दरामुळे हताश झाल्याचे त्यांनी ‘tv9 मराठी’ शी बोलताना सांगितले. मुख्य पिकांमध्ये तर नुकसान झालेच होते पण हंगामीमधूनही पदरी निराशाच आहे.

बाजारपेठेवरच सर्वकाही अवलंबून

उत्पादन काय घ्यायचे याचे नियोजन शेतकरी करु शकतो. शिवाय वेगवेगळ्या उपययोजना राबवून नैसर्गिक संकटावर मातही करता येते. या दरम्यान नुकसान झाले तरी उत्पादनात घट होते. पण बाजारपेठेतील चित्र बदलणे हे शक्य नाही. व्यापारी आणि मध्यस्तींचा शेतकऱ्यांच्या मालावर वर्चस्व आहे. त्यामुळे तीन महिने अविरत मेहनतीचा काय उपयोग झाला. उलट मेहनत आणि आता मोडणीसाठी रोटरचा खर्च हा अंगलट असल्याचे साहेबराव यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

P.M.KISAN : पीएम किसान योजनेच्या नियमावलीत बदल, आता ‘ही’ प्रक्रिया पूर्ण केली तरच 11 वा हप्ता खात्यावर

रब्बी हंगामानंतर उन्हाळी मूग लागवड ठरते फायदेशीर, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

Drone Farming : कृषी संस्थांसह कृषी पदवीधारकांनाही अनुदानावर मिळणार ‘ड्रोन’, शेती व्यवसयात बदल अन् हाताला कामही

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.