AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

P.M.KISAN : पीएम किसान योजनेच्या नियमावलीत बदल, आता ‘ही’ प्रक्रिया पूर्ण केली तरच 11 वा हप्ता खात्यावर

पी.एम किसान योजनेचा 10 हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. शेतकऱ्यांना शेती कामात मदत मिळावी व्हावी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. देशभरातील 11 कोटीहून अधिक शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, अनेकांनी बोगस कागदपत्रे जमा करुन योजनेचा लाभ घेतला होता.

P.M.KISAN : पीएम किसान योजनेच्या नियमावलीत बदल, आता 'ही' प्रक्रिया पूर्ण केली तरच 11 वा हप्ता खात्यावर
संग्रहीत छायाचित्र
| Updated on: Feb 06, 2022 | 4:30 AM
Share

मुंबई : (PM Kisan Yojna)पी.एम किसान योजनेचा 10 हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. शेतकऱ्यांना शेती कामात मदत मिळावी व्हावी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. देशभरातील 11 कोटीहून अधिक शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, अनेकांनी बोगस कागदपत्रे जमा करुन योजनेचा लाभ घेतला होता. ही बाब (Central Government) केंद्र सरकारच्या निदर्शनास आली असून आता यावर निर्बंध यावेत म्हणून नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यामुळे (Farmer) शेतकऱ्यांनी आता ‘ई-केवायसी’ ची पूर्तता केली तरच 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. याबाबत पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 31 मार्चपूर्वीच ई-केवायसी पूर्ण करावी लागणार आहे.

31 मार्चची डेडलाईन

देशभरात 11 कोटीहून अधिक शेतकरी हे योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, आतापर्यंत राज्य सरकार आणि कृषी विभागाकडून आलेल्या यादी नुसारच पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. त्यामुळे अपात्र शेतकऱ्यांना निधी मिळू नये यासाठी आता ई-केवायसी ची अट घालण्यात आली आहे. 1 जानेवारी रोजा या योजनेतील 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. पण आता केवायसी हे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे 11 वा हप्त्याचा लाभ घ्यावयाचा असल्यास शेतकऱ्यांना 31 मार्च पूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या असून आता याकरिता केवळ दोन महिन्याचा कालावधी राहिलेला आहे.

कसे करावे ‘ई-केवायसी’?

eKYC – म्हणजे electronic know your custumer एखाद्या व्यक्तीची ओळख इलेक्ट्रॉनिकली पडताळून पाहणे म्हणजेच ई केवायसी आता eKYC करायची असेल तर www.pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावे लागणार आहे. त्यानंतर पी. एम. किसान योजनेची अधिकृत वेबसाईट तुमच्या स्क्रीनवर दिसेल.वेबसाइट ओपन झाल्यावर सगळ्यात अगोदर तुम्हाला लाल अक्षरांमध्ये एक सूचना दिसेल ती अशी की eKYC is mandatory for PMKISAN Registered farmers, pls click ekyc option in former corner for aadhar based OTP authentication and for biometric authentication contact nearest CSC centres याचा अर्थ तुम्ही तर पी एम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला केवायसी करणे बंधनकारक असणार आहे.

*आता केवायसी करण्यासाठी दोन पर्याय आहेत एक म्हणजे तुमचा फोन नंबर आधार कार्ड से लिंक असेल तर तुम्ही आधार बेस्ट केवायसी करू शकता त्यासाठी फार्मर कॉर्नर मध्येही केवायसी ला क्लिक करायचे आहे मोबाईल नंबर आधार कार्ड सिलिंग नसेल तर सीएससी केंद्रावर जाऊन कागद पत्र देऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे

*आधारकार्ड वापरून eKYC कसे करायचे? फार्मर कॉर्नर वरती eKYC ला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आधार केवायसी नावाचे एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल त्यामध्ये सुरुवातीला आधार कार्ड क्रमांक त्यानंतर समोरच्या बॉक्समधील अक्षरे आणि अंक आहेत तशी टाकायची आहेत. त्यानंतर search या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये सुरुवातीला आधार नंबर दिसेल त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक आहे तोच येथे टाकायचा आहे…त्यानंतर Get Otp यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर मोबाईलवर OTP नंबर येईल तो OTP येथे submit करायचा आहे. त्यानंतर submit for Auth यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर EKYC is successful submitted असा sms दिसेल. याचाच अर्थ ekyc submitted यशस्वी झाला आहे. यादरम्यान invalid असा पर्याय समोर येत असेल तर काही दिवसांनी ekyc करायचे किंवा CSC केंद्रावर जाऊन कागदपत्रे जमा करून ekyc करून घ्यावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Drone Farming : कृषी संस्थांसह कृषी पदवीधारकांनाही अनुदानावर मिळणार ‘ड्रोन’, शेती व्यवसयात बदल अन् हाताला कामही

Sugarcane Harvesting : गळीत हंगाम जोमात तरीही फडातला ऊस ‘कोमात’, तोडणी रखडल्याने काय होते नुकसान?

Rabi Season: उत्पादन घटूनही खर्चात वाढ, मुख्य पिकालाचे रोगाने घेरले

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.