Rabi Season: उत्पादन घटूनही खर्चात वाढ, मुख्य पिकालाचे रोगाने घेरले

यंदा पावसामुळे पेरण्या लांबल्या असल्या तरी सध्या ज्वारी पीक सध्या पोटऱ्यात आले आहे. असे असताना या पिकावर चिकटा आणि मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पीक ऐन बहरात असतानाच या रोगामुळे उत्पादनावर परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका सुरूच आहे. त्यामुळे औषध फवारणीचा खर्च तर वाढला आहेच पण वाढ झाल्याने फवारणी करणेही मुश्किल झाले आहे.

Rabi Season: उत्पादन घटूनही खर्चात वाढ, मुख्य पिकालाचे रोगाने घेरले
रब्बी हंगामात मुख्य कोठार असलेल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्वारीचे क्षेत्र हे घटले आहे
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 2:40 PM

उस्मानाबाद : यंदा (Rabbi Season) रब्बी हंगामातील पीक पध्दतीमध्ये बदल झाला असला तरी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आजही ज्वारी हेच मुख्य पीक आहे. मराठवाड्यातील ज्वारी ही स्वादिष्ट आणि कडब्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न मिटतो त्यामुळे उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यात याचा पेरा मोठ्या प्रमाणात होतो. यंदा पावसामुळे पेरण्या लांबल्या असल्या तरी सध्या (Sorghum Crop) ज्वारी पीक सध्या पोटऱ्यात आले आहे. असे असताना या पिकावर चिकटा आणि मावा (Pest Outbreak) रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पीक ऐन बहरात असतानाच या रोगामुळे उत्पादनावर परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका सुरूच आहे. त्यामुळे औषध फवारणीचा खर्च तर वाढला आहेच पण वाढ झाल्याने फवारणी करणेही मुश्किल झाले आहे. पेरणी झाली की काढणी पर्यत केवळ दोन पाणी दिले की उत्पादनात वाढ असे भरवश्याचे पीक असलेल्या ज्वारीला यंदा प्रथमच फवारणी करावी लागत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

उत्पादनावर परिणाम अन् चाऱ्याचाही प्रश्न

रब्बी हंगामातील पेरणीनंतर निसर्गाची अवकृपा सुरु झाली होती. आता कुठे वातावरण निवळले असून पिकांची वाढ होत आहे. ज्वारीला कणसे लागली आहेत. अशा अवस्थेत आता चिकटा आणि मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कडब्याचेही नुकसान होत आहे तर उत्पादनावरही याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे मुख्य पीक असलेल्या ज्वारीतूनही अपेक्षित उत्पादन मिळते की नाही अशी अवस्था झाली आहे. अधिकचा खर्च करुनही शेतकरी हे चिंतेमध्ये आहेत.

नेमके कोणत्या अवस्थेत आहे पीक

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये यंदा ज्वारीचा पेरा घटला असला तरी 2 लाख 50 हजार हेक्टरावर पेरणी झाली आहे. पहिल्या टप्प्यात पेरणी झालेल्या ज्वारी सध्या हुरड्याच्या अवस्थेत आहे तर काही भागातील ज्वारी ही पोटऱ्यात आहे. अशा अवस्थेत चिकटा आणि मावा रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने ज्वारीचे दाणे हे बारीक होणार आहेत. चिकट्यामुळे कडब्याची नासाडी होणार आहे. शिवाय ज्वारीची वाढ झाल्याने आता फवारणी करणेही शक्य नाही. त्यामुळे खर्चात वाढ करण्यापेक्षा मिळेल ते उत्पादन घेण्याच्या तयारीत शेतकरी आहेत.

यंदा प्रथमच रोगाचा प्रादुर्भाव

वातावरणातील बदलाचा परिणाम यंदा सर्वच पिकांवर जाणवत आहे. रब्बी हंगामातील ज्वारीवर कोणत्याही किड-रोगराईचा प्रादुर्भाव होत नसतो. केवळ चिकट्यामुळे ताटाचे थोड्याबहूत प्रमाणात नुकसान होते. यंदा मात्र, ज्वारीवर देखील मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यंदा प्रथमच असे घडत असून उत्पादनावरील खर्च वाढत असल्याचे शेतकरी गणेश शेटे यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Latur Market : दीड महिन्यानंतर सोयाबीन उत्पादकांना दिलासा, काय आहे बाजारपेठेतले चित्र?

Nagpur Market : निसर्गाच्या लहरीपणामुळे मिरची उत्पादनात घट, ग्राहकांना वाढीव दराचा ‘ठसका’

लघू सिंचन प्रकल्पातील पाणी मुरतंय कुठं? ना शेती क्षेत्र ओलिताखाली ना प्रकल्पातून पाण्याची वहीवाट

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.