AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Market : निसर्गाच्या लहरीपणामुळे मिरची उत्पादनात घट, ग्राहकांना वाढीव दराचा ‘ठसका’

कांदा, मिरची, भाजीपाला ही हंगामी पिके शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर टाकतात. यंदा मात्र, निसर्गाच्या अवकृपेमुळे मुख्य पिकांना तर फटका बसलाच आहे पण हंगामी पिकांचेही उत्पादन घटले आहे. मुख्य पिकांमध्ये झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी एक ना अनेक प्रयत्न केले मात्र, अखेरच्या टप्प्यात झालेल्या अतिवृष्टी आणि किडीच्या प्रादुर्भावामुळे मिरचीचे यंदा पाच पटीने उत्पादन घटले आहे.

Nagpur Market : निसर्गाच्या लहरीपणामुळे मिरची उत्पादनात घट, ग्राहकांना वाढीव दराचा 'ठसका'
नागपूरातील कळमना येथील बाजार समितीमध्ये मिरचीची आवक सुरु झाली आहे
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Feb 05, 2022 | 12:32 PM
Share

नागपूर : कांदा, मिरची, भाजीपाला ही हंगामी पिके शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर टाकतात. यंदा मात्र, निसर्गाच्या अवकृपेमुळे मुख्य पिकांना तर फटका बसलाच आहे पण (Seasonal Crop) हंगामी पिकांचेही उत्पादन घटले आहे. मुख्य पिकांमध्ये झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी एक ना अनेक प्रयत्न केले मात्र, अखेरच्या टप्प्यात झालेल्या अतिवृष्टी आणि किडीच्या प्रादुर्भावामुळे (Chilly) मिरचीचे यंदा पाच पटीने उत्पादन घटले आहे. याचा परिणाम सध्या बाजारपेठेत दिसून येत आहे. येथील (Nagpur Market) कळमना बाजार समितीमध्ये हंगामात 20 ते 25 हजार पोत्यांची मिरचीची आवक होत असते. यंदा मात्र, बाजारात मिरचीचा ठसका कमी प्रमाणात असला तरी तो ग्राहकांना अधिक बसणार आहे. कारण पाचपटीने उत्पन्न घटल्याने हंगामाच्या सुरवातीलाच मिरचीचे दर हे 200 रुपये किलोवर पोहचले आहेत. शिवाय अशीच आवक घटत गेली तर दरात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत.

अतिवृष्टीने उत्पादन घटलं अन् कीड-रोगराईने सर्वकाही हिसकावलं

निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम यंदा शेती व्यवसयावरच दिसून येऊ लागला आहे. खरीप हंगामापासून अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि गारपिट यामुळे एकही पीक पूर्ण क्षमतेने शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले नाही. वर्षभर झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी कांदा, मिरची या हंगामी पिकांचा आधार घेतला पण या पिकांचीही सुटका झाली नाही. नागपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे मिरचीवर परिणाम झाला होता. ऐन बहरात असतानाच झालेल्या पावसामुळे वाढ खुंटली तर मिरची लागवडीवरही त्याचा परिणाम झाला. असे असतानाही शेतकऱ्यांनी जोपासणा केली मात्र, पुन्हा कीड-रोगराईमुळे थेट उत्पादनावरच परिणाम झाला आहे. त्यामुळे आवक घटली असून आता दरात वाढ होत आहे.

काय आहे बाजार समितीमधील चित्र?

येथील कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिरचीची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. मिरचीची तोडणी झाली आहे, वाळलेल्या मिरचीला अधिक दर मिळतो त्यामुळे अजूनही ऊन देण्याचेच काम सुरु आहे. असे असले तरी प्रतिकूल परस्थितीमुळे आवक घटणार हे निश्चित मानले जात आहे. कारण दरवर्षी कळमना येथील बाजार समितीमध्ये हंगामाच्या सुरवातीलाच 20 ते 25 हजार पोत्यांची आवक होत असते, पण यंदा केवळ 5 हजार पोत्यांची आवक होत आहे. घटलेल्या आवकचा थेट परिणाम आता मिरची दरावर होणार आहे. ठोक बाजारापेक्षा किरकोळ बाजारात अधिकचा ठसका उठणार असल्याचे बोलले जात आहे.

हंगामाच्या सुरवातीलाच मिरची 200 रुपये किलो

आवक घटली की शेतीमालाच्या दरात वाढ हे बाजारपेठेचे सुत्रच आहे. पण हंगामाच्या सुरवातीलाच मिरची आवक ही पाच पटीने घटलेली आहे. असे असतानाच 200 रुपये किलोवर दर गेले आहेत. आता भविष्यात अजून आवक घटली तर दरात वाढ निश्चित मानली जात आहे. शिवाय ठोक बाजार आणि किरकोळ बाजारातील चित्र हे वेगळे राहणार आहे. ठोक बाजाराच्या तुलनेत यंदा किरकोळ बाजारात दुपटीनेच दर राहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ग्राहकांना मिरची चांगलीच झोंबणार अशीच सध्याची स्थिती आहे.

संबंधित बातम्या :

राज्यातील कृषी शिक्षण धोरणामध्येच होणार बदल, कशामुळे ओढावली नामुष्की? वाचा सविस्तर!

Nagpur: शासकीय केंद्रावरही नाही तुरीला दराची हमी, शेतकऱ्यांचा कल खुल्या बाजारपेठेकडेच

टरबूज-खरबूजची लागवड करताना ‘अशी’ करा वाणांची निवड, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.