किसान क्रेडिट कार्डवर मिळणाऱ्या कर्जावर किती व्याज लागतं, शेतकरी त्यांचा पैसा कसा वाचवू शकतात?, जाणून घ्या

नुकतंच केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या 2.5 कोटी शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे.

किसान क्रेडिट कार्डवर मिळणाऱ्या कर्जावर किती व्याज लागतं, शेतकरी त्यांचा पैसा कसा वाचवू शकतात?, जाणून घ्या
किसान क्रेडिट कार्ड
Follow us
| Updated on: Jan 02, 2021 | 3:42 PM

नवी दिल्ली : किसान क्रेडिट कार्डचा (Kisan Credit Card) मुख्य उद्देश हा शेतकऱ्यांना (Interest Rate On Kisan Credit Card Loan) कमी व्याजावर कर्ज उपलब्ध करुन देणं आहे. असंघटित क्षेत्रातून जास्त व्याजदरावर कर्ज घेण्यापासून भारतीय शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी हे लाँच करण्यात आले होते. गरज पडल्यास शेतकरी बँकेतून कर्ज घेऊ शकतात. त्याशिवाय, पीक विमा आणि सिक्योरिटी मुक्त विमा देखील उपयोगकर्त्यांना मिळू शकेल. कमी व्याजदरावर कर्ज मिळवण्यासाठी देशातील कोट्यावधी शेतकरी या कार्डचा वापर करत आहेत (Interest Rate On Kisan Credit Card Loan).

किती कर्ज मिळतं?

नुकतंच केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या 2.5 कोटी शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना KCC च्या माध्यमातून खत, बियाणांसाठी कर्ज सहज उपलब्ध होतं. यावर लागणारं व्याजही गतिशील असतं. म्हणजे, जर कर्ज घेणारे शेतकरी वेळेवर कर्ज परत करतात त्यांच्याकडून कमी व्याज घेतलं जातं. शेतकरी किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही 1.60 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज विना गॅरंटी घेऊ शकतात. या कार्डवर शेतकरी तीन लाख रुपयांपर्यंतचं कर्ज घेऊ शकतात.

व्याज दर किती आकारला जातो?

या कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाच वर्षांसाठी तीन लाख रुपयांपर्यंतचं शॉर्ट टर्म कर्ज घेतलं जाऊ शकतं. या कार्डचं वैशिष्ट्य म्हणजे या कार्डवर घेतलेलं कर्ज स्वस्त व्याज दरावर उपलब्ध होतं. पिकासाठी घेतलं जाणारं कर्जावर सात टक्के व्याज आकारलं जातं. पण, कर्ज फेडताना शेतकऱ्यांना सरकार तीन टक्क्यांची सब्सिडीही देते. त्यामुळे स्वस्त व्याजदराचा फायदा शेतकऱ्यांना तेव्हाच होईल जेव्हा ते वेळेवर कर्ज फेडतील (Interest Rate On Kisan Credit Card Loan).

जर कर्जाची परतफेड निश्चित कालावधीनंतर करण्यात आली तर शेतकऱ्यांना सात टक्के व्याज द्यावंच लागेल. अशा जर शेतकऱ्यांना त्यांचे पैसे वाचवायचे असेल तर किसान क्रेडिट कार्डवर घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड करणे आवश्यक असेल. राष्ट्रीय पीक विमा योजनेत केसीसीसाठी पात्र असलेल्या पिकांना कव्हर करते.

Interest Rate On Kisan Credit Card Loan

संबंधित बातम्या :

हरियाणा सरकारची मोठी घोषणा; ‘या’ नव्या योजनेमुळे शेतकऱ्यांना होणार फायदा

PM-kisan Scheme : 6 दिवसांत 6.23 लाख शेतकऱ्यांना लाभ, जाणून घ्या पुढचा हप्ता कधी मिळणार

कोट्यवधी शेतकरी अर्ज करुनही PM Kisan Scheme पासून वंचित, आता काय करायचं?

Non Stop LIVE Update
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.