यंदा पेरणी दुबार, पंचनामेही दुबार अन् पाऊस सरासरी पार

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे हे लातूर, उस्मानाबाद आणि हिंगोली जिल्ह्यातील पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. पण त्यानंतरही पाऊस हा सुरुच असल्याने अतिरक्त भागातील नुकसानीचे पंचनामे हे पुन्हा करण्याची नामुष्की ही प्रशासनावर ओढावणार आहे.

यंदा पेरणी दुबार, पंचनामेही दुबार अन् पाऊस सरासरी पार
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 27, 2021 | 3:41 PM

राजेंद्र खराडे : लातूर : निसर्गाच्या लहरीपणाचा (natural crisis) परिणाम शेती व्यवसयावर कसा होतो याची प्रचिती यंदाच्या खरीपात हंगाम शेतकऱ्यांना आली आहे. हंगामाच्या सुरवातीला पावसाने ओढ दिल्याने खानदेशात तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. पिकाची मशागत (Marathwada) आणि पाण्याचे योग्य नियोजन करुन प्रतिकूल परस्थितीमध्येही शेतकऱ्यांनी मशागतीवर हजारो रुपये खर्च करुन पीके बहरात आणली खरी मात्र, पीके ऐन जोमात असतानाच पावसाचा हाहाकर सुरु झाला तो अद्यापही कायम आहे.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे हे लातूर, उस्मानाबाद आणि हिंगोली जिल्ह्यातील पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. पण त्यानंतरही पाऊस हा सुरुच असल्याने अतिरक्त भागातील नुकसानीचे पंचनामे हे पुन्हा करण्याची नामुष्की ही प्रशासनावर ओढावणार आहे. त्यामुळे यंदा पेरणी दुबार अन् पंचनामे दुबार तर पाऊस हा सरासरी पार अशी अवस्था झाली आहे.

उत्पादनाच्या दृष्टीने मराठवाड्यासह विदर्भातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामच महत्वाचा आहे. मराठवाड्यात नगदी पिक असलेल्या सोयाबीनवर शेतकऱ्यांची मदार असते. यंदा मात्र, खरीपातील पिके ही पाण्यात आहेत. ऐन काढणीच्या प्रसंगी सुरु झालेला पाऊस आजही बरसत असल्याने मुख्य पिक हे पाणी साचलेल्या वावरातच आहे.

शेतात साचलेल्या पाण्यामुळे सोयाबीनला कोंब फुटत असल्याचे चित्र परभणी, हिंगोली आणि उस्माबाद जिल्ह्यात समोर आले आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे हे लातूर, उस्माबाद आणि हिंगोली जिल्ह्याचतील पूर्ण झाल्याचा अहवाल विभागीय कार्यालयाकडे सपूर्द करण्यात आला आहे.

मात्र, त्यानंतरही गेल्या चार दिवसांपासून मराठवाड्यातील हिंगोली, परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टी झालेली आहेय त्यामुळे पुन्हा झालेल्या नुकसानीचे काय हा प्रश्न शेतकऱ्यांतह सर्वसामान्य नागरिकाला पडलेला आहे. याबाबत कृषी अधिकारी यांना विचारणा केली असता या भागातील शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्यातर नुकसान झालेल्या अतिरीक्त भागातील पंचनामे हे करावेच लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

एवढेच नाही तर परभणी जिल्ह्यात तर पावसामुळे पंचनामेही करण्यास अडचण निर्माण झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे तर नुकसान झालेच आहे शिवाय कृषी अधिकाऱ्यांना पुन्हा चिखलात पायपीट करावी लागणार हे नक्की..

पंचनाम्याची कशी असते प्रक्रीया

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची तक्रार सर्वप्रथम शेतकऱ्यांना द्यावी लागते. नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी विभागातील कृषी सहायक, मंडळ अधिकारी हे शेतकऱ्यांच्या बांधावर येतात. शेतकऱ्याच्या पिकाच्या नोंदीनुसार पंचनामे केले जातात. तर प्रत्येक एकरावरची पाहणी न करता नुकसान झालेल्या पिकाचे निकष हे त्या गटाकरीता लागू केले जातात.

अशा प्रकारे ठरली जाते मदतीची रक्कम

पिकाच्या नोंदणीनुसार जर 33 टक्के पेक्षा अधिकचे नुकसान झाले असले तर त्या पिकाची नुकसानभरपाई ही शेतकरी हे पात्र होतात. कोरडवाहू आणि बागायत या करीता वेगवेगळे निकष लावण्यात आले आहेत. कोरडवाहू क्षेत्रावरील नुकसान असेल तर हेक्टरी 9 हजार रुपये हे दिले जातात. ही रक्कम केंद्र सरकार देऊ करते तर यामध्ये राज्य सरकारही मदत करते. बागायत क्षेत्रासाठी 18 हजार रुपये हेक्टरी मदत असे निकष लावण्यात आले आहेत. नैसर्गिक आपत्ती विभागाकडे पीक नुकसानीचे अहवाल हे पाठविले जातात. पण हे सर्व नुकसान जर 33 टक्के पेक्षा अधिकचे असेल तरच मदत शेतकऱ्यांने मिळणार आहे.

झालेला पाऊस आणि नुकसानीची आकडेवारी

पावसाचा सर्वाधिक फटका हा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसलेला आहे. तब्बल 14 लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान हे झाले आहे. राज्यात सोयाबीनची पेरणी ही 53 लाख हेक्टरावर झालेली होती. मराठवाड्यात पावसाची वार्षिक सरासरी ही 671. 6 मिलीमीट आहे. आतापर्यंत 894. 8 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. चार दिवसापासून परभणी जिल्ह्यात पावसाचे थैमान आहे तर उस्मानाबादमध्ये तर पुरसदृश स्थिती निर्माण झालेली आहे. मराठवाड्यातील हिंगोली, उस्माबाद आणि लातूर जिल्ह्यातील पीकाचे पंचनामे हे पूर्ण झाले असल्याचे सांगितले जात आहे. (Kharif season loss, sowing twice and panchnama twice, farmers financially damaged due to rains)

संबंधित बातम्या :

अलमल्ली धरणाची ऊंची न वाढविता ‘या’ पर्यांयाची अंमलबजावणी करा : राजू शेट्टी

शेतकऱ्यांच्या हीतासाठी साखर आयुक्तालयाची शक्कल, मानांकनातून समोर येणार कारखान्याचा कारभार

आज ‘भारत बंद’ ; शेतकरी संघटनांना राजकीय पक्षांचाही पाठिंबा, या सेवांवर होणार परिणाम

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.