AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोयना धरणाच्या सहा दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरु होणार, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी अशी ओळख असलेल्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचं प्रमाण वाढल्यानं धरणातील पाणी साठा शंभर टीएमसीच्या वर गेला आहे. धरणातील पाण्याची आवक वाढत असल्यानं धरणाचे सहा वक्री दरवाजे एक फुटाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोयना धरणाच्या सहा दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरु होणार, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
कोयना धरण
| Edited By: | Updated on: Sep 12, 2021 | 12:13 PM
Share

सातारा: महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी अशी ओळख असलेल्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचं प्रमाण वाढल्यानं धरणातील पाणी साठा शंभर टीएमसीच्या वर गेला आहे. धरणातील पाण्याची आवक वाढत असल्यानं धरणाचे सहा वक्री दरवाजे एक फुटाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज दुपारी 2 वाजता कोयना धरणातून नदीपात्रात एकूण 10000 क्युसेक पाणी विसर्ग सुरू करणेत येणार आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग वाढणार

कोयना धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. कोयना धरणात पाणीसाठा 103.19 टीएमसी झाला आहे. धरणामधील पाण्याची आवक वाढल्यास विसर्गामध्ये वाढ होणार असल्याने कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सुरुवातीला पायथा वीजृगृहातून पाणी सोडण्याचा निर्णय

कोयना धरणातील पाणी साठा 100 टीमएमसीच्या वर गेल्यानंतर नंतर धरण व्यवस्थापनानं कोयना पायथा वीजगृहातुन पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता. कोयना धरण पूर्ण भरण्याकडे वाटचाल सुरु असून कोयना धरण पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरु करुन 1050 कयुसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता धरणाचे सहा वक्री दरवाजे एक फुटांन उचलून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कोयना धरणात होणारी पाण्याची आवक वाढल्यानं धरण व्यवस्थापनानं धरणाचे 6 वक्री दरवाजे एक फुटानं उचलून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना धरण व्यवस्थापानानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोयना धरणातून दुपारी 2 वाजता पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्यानं नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

कराड सांगलीकरांची चिंता वाढणार?

कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्यानंतर कोयना नदीकाठच्या गावांसह कराड आणि सांगलीत देखील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यात असल्यानं तेथील नागरिकांनी देखील सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

राज्यातील पावसाची स्थिती कशी?

12 सप्टेंबरला पावसाची स्थिती कशी? हवामान विभागानं रविवारी रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे, कोल्हापूरला ऑरेंज अ‌ॅलर्ट तर, पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, वाशिम, गोंदिया, गडचिरोलीला यलो अ‌ॅलर्ट दिला आहे.

13 सप्टेंबरला पावसाची स्थिती कशी?

हवामान विभागानं सोमवारसाठी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तर, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, अमरावती, आणि गोंदिया जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट दिला आहे.

14 सप्टेंबरला पावसाची स्थिती कशी?

हवामान विभागानं मंगळवारी पालघर, ठाणे, रायगड,पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, परभणी, हिंगोली नंदूरबार, जळगाव, धुळे, औरंगाबाद, जालना, भंडारा गोंदिया यलो अ‌ॅलर्ट दिला आहे.

15 सप्टेंबरला पावसाची स्थिती कशी?

हवामान विभागानं पालघर पुणे जिल्ह्याला ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, ठाणे, सातारा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि चंद्रूपर जिल्ह्यांना यलो अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

इतर बातम्या:

कोयना धरणातून विसर्ग वाढवला, सांगलीत कृष्णेचं पाणी वाढलं, नदीकाठी धाकधूक कायम

Sangli Flood : कोल्हापूर, सांगलीत यंत्रणा सज्ज, शिरगावला पाण्याचा वेढा, 1200 लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरु – जयंत पाटील

Koyna Dam : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार, पायथा वीजगृहातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु

हेही पाहा

Koyna Dam Management Said Water will released from six doors of dam today at 2 pm issue alert to peoples

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.