AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Koyna Dam : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार, पायथा वीजगृहातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु

अवघ्या महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून 2100 कयुसेक पाणी विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यानं धराणातील पाण्याची आवक वाढली

Koyna Dam : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार, पायथा वीजगृहातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु
कोयना धरण
| Edited By: | Updated on: Jul 22, 2021 | 4:41 PM
Share

सातारा: अवघ्या महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून 2100 कयुसेक पाणी विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यानं धराणातील पाण्याची आवक वाढली. परिणामी प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. धरणात 1.45 611 कयुसेक पाण्याची आवक सुरु झाली आहे. कोयना धरणात चोवीस तासात 10 ते 12 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. कोयना धरणाचा पाणीसाठा 70.51 टीएमसी झाला आहे.

2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु

कोयना धरणातील पाणीसाठा नियमनासाठी धरणाच्या पायथा वीजगृहातून 2100 कयुसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात सुरु करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनानं कोयना नदी काठांच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पाणलोट क्षेत्रात उच्चांकी पाऊस

भारतीय हवामान विभागानं सातारा जिल्ह्याला रेड अ‌ॅलर्ट दिला होता. त्यानुसार सातारा जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पाऊस होत आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर व वलवण येथे 400 मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती आहे. सातारा, कराड, पाटण ढगाळ वातावरण असून रिमझिम पावसाच्या सरी सुरु आहेत. तर, कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे.

कोयना पाणलोट क्षेत्रात पाउस

आज सकाळपर्यंतच्या हवामान विभागाच्या माहितीनुसार कोयनानगर 299 मिमी , नवजा 385 मिमी आणि महाबळेश्वर 404 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

साताऱ्यातील कैलास स्मशानभूमी पाण्याखाली

साताऱ्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे वेण्णा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कृष्णा आणि वेण्णा नदीच्यासंगमावरील साताऱ्यातील ठिकाण संगम माहुली येथे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिणामी साताऱ्यातील संगममाहुली येथील कैलास स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे मृत कोरोनाबधितांवर अंत्यसंस्कार करण्याची समस्या निर्माण झाली आहे. अंत्यसंस्काराचे 14 अग्निकुंड पाण्याखाली गेले असून मृत कोरोना अंत्यसंस्कार करण्याची समस्या निर्माण झाली आहे.

चिपळूणला जाणाऱ्या NDRF टीम अडकल्या

पुणेवरून चिपळूणकडे मदती साठी जाणाऱ्या NDRF टीम कोयनेत अडकल्या असल्याची माहिती आहे. नवजा मार्गावर दरड व झाड पडल्याने टीम अडकून पडली आहे. कराड चिपळूण महामार्ग वाहतूक खोळंबल्या मुळे नवजा मार्गे टीम जात होती. एनडीएरआफच्या मदतीसाठी कोयना धरण व्यवस्थापन कडून जेसीबी व यंत्रणा पाठवण्यात आली आहे.

इतर बातम्या:

Monsoon Alert : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना रेड ॲलर्ट, कोकणात 2 ते 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार

रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात पूर परिस्थिती, सतर्क राहून बचाव कार्य करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Satara Rain Update water released from Koyna Dam into river administration alerts villagers

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.