शेती मालाचे बाजारभाव : सोयाबीनच्या दरात घसरण, उडीद भाव वधारले

येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती ही मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची आहे. कारण याच बाजार समितीमधून सोयाबीनचे दर हे काढले जातात. येथील सोयाबीनच्या दराचे अनुकरण राज्यभर केले जाते. सध्या बाजार समितीमध्ये नविन सोयाबीन आणि उडीदाची आवक सुरु झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष हे रोज नव्याने निघणाऱ्या दराकडे असते.

शेती मालाचे बाजारभाव : सोयाबीनच्या दरात घसरण, उडीद भाव वधारले
सोयाबीनचे संग्रहीत छायाचित्र

लातुर : लातुर येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार (Latur Market) समिती ही मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची आहे. कारण याच बाजार समितीमधून सोयाबीनचे दर हे काढले जातात. येथील सोयाबीनच्या दराचे अनुकरण राज्यभर केले जाते. सध्या बाजार समितीमध्ये नविन सोयाबीन आणि उडीदाची आवक सुरु झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष हे रोज नव्याने निघणाऱ्या दराकडे असते. शनिवारी मात्र, मुख्य पिक असलेल्या सोयाबीनमध्ये काही प्रमाणात घट झाली तर उडदाने उचल खाल्याचे पाहवयास मिळाले आहे.

खरीप हंगामातील सोयाबीन हे मुख्य पिक आहे तर या मुख्य पिकाची बाजारपेठ ही लातुरची उच्चतम कृषी बाजार समिती आहे. सध्या खरिपातील उडदाची काढणी ही अंतिम टप्प्यात आहे तर सोयाबीनचीही (Soyabean) आवक ही सुरु झाली आहे. मात्र, शनिवारी सोयाबीनच्या दरात घट झाल्याचे चित्र होते. 8910 रुपये क्विंटलवर गेलेले सोयाबीन थेट 8375 येऊन ठेपले आहे. एक दिवसाच्या फरकाने 535 रुपये फरक पडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे ढग आहेत. तर उडदाने शेतकऱ्याला दिलासा दिला आहे.

दोन दिवसापुर्वी 7000 रुपये क्विंटल प्रमाणे विकला जाणारा उडीदाला शनिवारी मात्र, 7200 रुपये असा दर मिळाला आहे. मोसमामध्ये येथीप कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 50 ते 60 हजार क्विंटल सोयाबीनची आवक असते. यंदा पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले आहे. त्यामुळे वेळोवेळी दरात कमी-जास्तपणा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शनिवारी सोयाबीनची 100000 कट्टांची आवक झाली होती. काढणी होईल त्याप्रमाणात सोयाबीनची आवक ही होणार आहे. उडदाचे मात्र, 200 रुपयांनी दर वाढलेले आहेत. खरीपातील या दोन शेतीमालाची आवक ही गेल्या काही दिवसांपासू सुरु झालेली आहे.

मराठवाड्यातील मुख्य बाजारपेठ

लातुर ही मराठवाड्यातील मुख्य बाजारपेठ आहे. बाजारपेठेत केवळ जिल्ह्यातूनच नाही तर परराज्यातूनही पिकाची आवक असते. बीड, उस्मानाबाद, बार्शी, आक्कलकोट तसेच कर्नाटक राज्यातून सोयाबीनची आवक होत असते. येथे मोठ्या प्रमाणात तेल कंपन्या असल्याने सोयाबीनला मागणीही आहे.

इतर शेतीमालाचे शनिवारचे दर

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. शनिवारी लाल तूर- 6725 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6550 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6600 रुपये क्विंटल, जानकी चना 5300 रुपये क्विंटल, विजय चणा 5550, चना मिल 5250, सोयाबीन 8375, चमकी मूग 6725, मिल मूग 6000 तर उडीदाचा दर 7271 एवढा राहिला होता.

आगामी काळात दर अस्थिर राहणार

चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला सरासरी एवढा भाव राहिल मात्र, पावसामुळे सोयाबीनचा दर्जा हा ढासाळलेला आहे. त्यामुळे बाजारात दाखल होणारे सोयाबीन डागाळलेले असणार त्यामुळे मालाप्रमाणे दर राहतील. (Latur: Market price of agricultural produce: Soyabean prices fall, urad prices rise)

इतर बातम्या :

Breaking : आधी भाजपात गेले, नंतर संन्यास घेतो म्हणाले आणि आता थेट ममता दिदीच्याच पक्षात, भाजपला झटका

मुख्यमंत्र्यांसोबत तासभर चर्चा, पण आतली चर्चा बाहेर का सांगू?; संजय राऊतांचा सवाल

अकोल्यात काळ्या बाजारात विक्रीला जाणारा तब्बल 600 क्विंटल गहू पोलिसांकडून जप्त, रेशन माफियांमध्ये खळबळ

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI