AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lichi Fruit : हवाई मार्गाने ‘लिची’चा गोडवा मुंबई मार्केटमध्ये, आवक सुरु होताच बाजारपेठेचे बदलले चित्र

यंदा लिचीचे उशिराने आगमन झाले आहे. बदलत्या वातावरणामुळे मोठ्या व्यापाऱ्यांनी लिची बाजारात आणलीच नव्हती. शुक्रवारपर्यंत मोठ्या प्रमाणात आवक सुरु होणार आहे. मात्र, दरम्यानच्या काळात कलकत्ता येथून आवक झालेल्या लिचीच्या एका पेटीसाठी 2 हजार 500 रुपये मोजावे लागत होते. आता कलकत्तासह इतर भागातूनहू लिचीची आवक होण्यास सुरवात झाली आहे.

Lichi Fruit : हवाई मार्गाने 'लिची'चा गोडवा मुंबई मार्केटमध्ये, आवक सुरु होताच बाजारपेठेचे बदलले चित्र
'लिची' फळ नवी मुंबई मार्केटमध्ये दाखल झाले असून आगमन होताच दर वाढले आहेत.
| Edited By: | Updated on: May 19, 2022 | 9:38 AM
Share

नवी मुंबई : आंब्याप्रमाणेच (Lichi Fruit) लिची फळाचे बाजारपेठेत आगमन हा चर्चेचा विषय ठरला आहे. (Navi Mumbai) नवी मुंबई बाजारपेठेत उशिरा पण दणक्यात आगमन झाले आहे. कलकत्ता येथून हवाई मार्गाने आवक झाली आहे तर पहिल्या टप्प्यात (Lichi Rate) विक्रमी दर मिळत आहे. लिचीच्या आगमनाने येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सजली असून यंदा उशिराने आवक सुरु झाल्याने दर वाढळे असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. शिवाय आणखीन काही दिवस असेच चित्र राहणार आहे. पहिल्या फेरी नवी मुंबई मार्केटमध्ये कलकत्ता येथून आवक होण्यास सुरवात झाली आहे.

मुझफ्फरपूर येथूनही आवक सुरु

केवळ कलकत्ता येथूनच नाही तर बिहार मधील मुझफ्फरपूर येथूनही मुंबईमध्ये लिची ची आवक होण्यास सुरवात झाली आहे. चवीसाठी आणि गोडव्यासाठी रॉयल लिची बाजारात दाखल होताच ग्राहकांच्या यावर उड्या पडतात. कलकत्ता येथील लिचीला पहिला मान मिळाला असला तरी मुझफ्फरपूर येथून बुधवारी लिची दाखल झाली आहे. दररोज चार टन लिची मुंबईला पाठवण्यासाठी तयार आहे. आता दररोज अशा प्रकारे आवक सुरु राहिल्यास दर कमी होतील अशी आशा आहे.

वाढत्या मागणीमुळे दर गगणाला

यंदा लिचीचे उशिराने आगमन झाले आहे. बदलत्या वातावरणामुळे मोठ्या व्यापाऱ्यांनी लिची बाजारात आणलीच नव्हती. शुक्रवारपर्यंत मोठ्या प्रमाणात आवक सुरु होणार आहे. मात्र, दरम्यानच्या काळात कलकत्ता येथून आवक झालेल्या लिचीच्या एका पेटीसाठी 2 हजार 500 रुपये मोजावे लागत होते. आता कलकत्तासह इतर भागातूनहू लिचीची आवक होण्यास सुरवात झाली आहे. मुझफ्फरपूर येथून दररोज 4 टन लिची मुंबईला पाठवण्यासाठी तयार आहे. एअर कार्गोद्वारे चार ते पाच तासांत त्याची डिलिव्हरी केली जाते.

लिचीच्या आगमनामुळे सजली बाजारपेठ

कलकत्ता येथील लिचीने आवकचा श्रीगणेशा झाला आहे. त्यामुळे विक्रमी दरही मिळाला आहे. बाजारपेठेत रॉयल लिची, कर्नाटकातील लिची दाखल झाल्याने चित्र बदलले आहे. शिवाय ग्राहकांना चवीसाठी आणि गोडव्यासाठी प्रसिध्द असलेल्या लिचीची चव चाखायला मिळाली आहे. यावेळी लिची गेल्या अनेक वर्षांपासून चांगली आहे.लिचीला पावसाची गरज आहे. पाऊस फळात लालसरपणासह गोडवा आणेल.

नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी.
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.