दुष्काळाचा सामना करण्यासाठी अगोदर करा हे उपाय, शेतकर्‍यांसाठी महत्त्वाचे काय?

Maharashtra Dry Drought Farming: राज्य सरकारने अगोदर 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर ट्रिगर 2 मध्ये 43 तालुक्यांचा समावेश केला आहे. पाणीबाणी सुरू असताना शेतकऱ्यांनी दुष्काळाचा सामना करण्यासाठी या उपाय योजना करणे आवश्यक आहे.

दुष्काळाचा सामना करण्यासाठी अगोदर करा हे उपाय, शेतकर्‍यांसाठी महत्त्वाचे काय?
दुष्काळी उपाय योजना
| Updated on: Oct 09, 2026 | 1:45 PM

Maharashtra Dry Drought Farming: महाराष्ट्र भीषण दुष्काळाचा सामना करत आहे. राज्य सरकारने सर्वात अगोदर 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर ट्रिगर 2 मध्ये 43 तालुक्यांचा समावेश केला आहे. 60 दिवसाच्या पावसाच्या खंडाने खरीप हातचा गेला आहे. काही भागात निम्मं उत्पन्न हाती गवसेल तर काही ठिकाणी जमाखर्च शून्य असेल. पाणीबाणी सुरू असताना शेतकऱ्यांनी दुष्काळाचा सामना करण्यासाठी या उपाय योजना करणे आवश्यक आहे.

16 ऑक्टोबरपासून राज्यात पाणीबाणी

Loading...

राज्य सरकारने 16 ऑक्टोबरपासून कमीत कमी 10 टक्क्यांची पाणी कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. जलसंपदा विभागाने सध्या उपलब्ध साठ्याचे ऑगस्ट 2027 पर्यंत नियोजन केले आहे. त्यानुसार आपत्कालीन धोरण आखण्यात आले आहे. पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्यात येणार आहे. तर शेतीसाठी पाण्याचे आवर्तन देण्याची शक्यता फारच कमी आहे. जर परतीच्या पावसाने पाठ फिरवली तर रब्बीच्या हंगामात कमी पाणी लागणाऱ्या पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असेल.

कमी पाणी लागणार्‍या पिकांची निवड

तुमच्या शेतात पाण्याचे स्त्रोत, पाण्याची उपलब्धता यानुसार कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची रब्बी हंगामात लागवड करणे योग्य ठरेल. कमी कालावधीचे आणि कमी पाणी लागणारे पीक घेतल्यास शेतकऱ्यांच्या गाठीशी काही तरी असेल. शेतातील आर्द्रता किती आहे आणि ती टिकवण्यासाठी काय उपाय योजना करता येतील याची चाचपणी झाल्यावर पिकांची लागवड करणे फायद्याचे ठरेल.

पीकं नुकसानीचे पंचनामे करण्यावर भर द्या

अनेक गावात नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत. ज्या गावात अद्याप पंचनामे सुरू झाले नाहीत. त्या गावातील पाटील, सरपंच, सदस्य आणि सर्वच शेतकऱ्यांनी पंचनामे करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधावा. त्यांनी दाद दिली नाही तर जिल्हाधिकारी, महसूल खाते आणि महसूल मंत्र्यांकडं थेट तक्रार करावी. येत्या 12 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. केंद्रीय पथक राज्यात पाहणी दौऱ्यावर आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांनी पंचनामे करण्यावर भर द्यावा

चारा छावणी आणि टँकर व्यवस्थेविषयी करा मागणी

तुमच्या गावातील जनावरांची संख्या, पाणी आणि चाऱ्याची सोय लक्षात घेऊन गावकरी चारा छावणीची आणि पाणी व्यवस्था करण्याची मागणी करू शकता. चार ते पाच गावांचे गावकरी मिळून यासाठी सरकारकडे मागणी करू शकता. सरकार लवकरच दुष्काळी उपाय योजना सुरू करणार आहे. त्यापूर्वीच गावकऱ्यांनी त्यांच्या समस्या आणि मागणी सरकार दरबारी मांडणे योग्य ठरेल. गावाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. सरकार सुद्धा पिण्याचे पाणी, जनावारांसाठी चारा आणि पाण्याची सोय करून देण्यावर भर देत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us