143 लाख टन साखर गोदामात पडून, पोत्यामागं दररोज 1 रुपया व्याज; साखर कारखानदारी संकटात

साखर कारखानदारी वाचवण्यासाठी 4 हजार कोटी रुपयांची मदत करावी,अशी मागणी साखर संघाने केली आहे. Maharashtra sugar mill industry

143 लाख टन साखर गोदामात पडून, पोत्यामागं दररोज 1 रुपया व्याज; साखर कारखानदारी संकटात
साखर कारखाना
Follow us
| Updated on: May 25, 2021 | 3:26 PM

कोल्हापूर: कोरोनामुळे सलग दोन हंगामात देशांतर्गत बाजारपेठेत साखरेची मागणी कमी झालीय. परिणामी राज्यात सुमारे 143 लाख टन साखर शिल्लक आहे. साखर विकल्याशिवाय कारखान्याचे अर्थकारण चालवायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे. साखरेचा दर कमी, कारखान्यांवरील कर्जाचे वाढते प्रमाण यामुळे कारखानदारी अडचणीत आली आहे. (Maharashtra sugar mill facing problems due demand of sugar down during corona time need government efforts to save industry)

शिल्लक साखरेचं काय करायचं?

कोरोनाचा फटका सर्वच उद्योगांना बसलाय.यामध्ये साखर कारखानदारी अधिकच भरडली गेलीय.उद्योग धंदे ठप्प आहेत. शिवाय उन्हाळ्यात शीतपेये आणि मिठाई व्यवसाय बंद असल्याने साखरेची मागणी घटलीय. एकाबाजूला मालाचा उठाव थांबलेला असताना दुसरीकडे साखर उत्पादन वाढलं आहे. त्यामुळे या शिल्लक साखरेचे काय करायचे?, असा प्रश्न कारखानदारी पुढे निर्माण झाला आहे.

यंदा 303 लाख टन साखरेचे उत्पादन

या वर्षीच्या गळीत हंगामात देशपातळीवर 303 लाख टन साखरेचे उत्पादन झाले. तर, गेल्यावर्षीची 107 टन साखर अजूनही गोडाऊनमध्ये शिल्लक आहे. त्यामुळे देशभरात 410 टन साखर अजूनही विक्रीसाठी शिल्लक आहे. महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर 143 लाख टन साखर शिल्लक आहे. या साखरेच्या विक्रीचे नियोजन काटेकोरपणे करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.कारण साखरेच्या एका पोत्यामागे कारखानदारांना दररोज एक रुपया व्याज भरावे लागत आहे. शिल्लक साखरेची विक्री जर लवकर झाली नाही तर साखर उद्योगावर याचा मोठा परिणाम होणार असल्याचं शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंग घाटगे यांनी सांगितलं आहे.

साखरेची किंमत 37 रुपये करा

साखर कारखानदारीला वाचवण्यासाठी साखरेची किंमत 37 रुपये किलो करण्याची गरज आहे. कारखानदारी वाचवण्यासाठी 4 हजार कोटी रुपयांची मदत करावी,अशी मागणी साखर संघाने केली आहे.काही दिवसांपूर्वी देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी देखील याबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर हालचाली करून शिल्लक साखरेच्या विक्रीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या:

कोरोना संकटात ना शेतकरी थांबला ना कारखाने, यंदाच्या गाळप हंगामात ऊसाचं विक्रमी गाळप

आधी कोटींच्या घोटाळ्यामुळे राज्यभर चर्चा, आता देणी थकल्यामुळे गंगापूर साखर कारखाना विक्रीला

(Maharashtra sugar mill facing problems due demand of sugar down during corona time need government efforts to save industry)

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.