Latur Division : ज्वारी क्षेत्रात घट, हरभऱ्यात दुपटीने वाढ, मुख्य पिकाकडेच का होतेय दुर्लक्ष?

| Updated on: Feb 19, 2022 | 2:00 PM

राज्यात ज्वारीच्या क्षेत्रात घट होणार हे अपेक्षित होते. यंदा सरासरीपेक्षा झालेला अधिक पाऊस आणि पीक पध्दतीमध्ये शेतकऱ्यांनी बदल केला होता. पण मराठवाडा आणि सोलापूर जिल्हा हे ज्वारीचे मुख्य कोठार मानले जाते असे असतानाही मराठवाड्यातील लातूर विभागातही या मुख्य पिकाच्या क्षेत्रात घट झाली आहे. तब्बल 18 टक्के घट झाली असून हरभरा या कडधान्याच्या पिकामध्ये दुपटीने वाढ झाली

Latur Division : ज्वारी क्षेत्रात घट, हरभऱ्यात दुपटीने वाढ, मुख्य पिकाकडेच का होतेय दुर्लक्ष?
लातूर विभागात मुख्य पिक असलेल्या ज्वारी क्षेत्रात मोठी घट झाली असून शेतकऱ्यांनी कडधान्यावर भर दिला आहे.
Follow us on

लातूर : राज्यात ज्वारीच्या क्षेत्रात घट होणार हे अपेक्षित होते. यंदा सरासरीपेक्षा झालेला अधिक पाऊस आणि पीक पध्दतीमध्ये शेतकऱ्यांनी बदल केला होता. पण (Marathwada) मराठवाडा आणि सोलापूर जिल्हा हे (Jowar Crop) ज्वारीचे मुख्य कोठार मानले जाते असे असतानाही मराठवाड्यातील (Latur Division) लातूर विभागातही या मुख्य पिकाच्या क्षेत्रात घट झाली आहे. तब्बल 18 टक्के घट झाली असून हरभरा या कडधान्याच्या पिकामध्ये दुपटीने वाढ झाली असल्याचा अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे. लातूर विभागात रब्बीच्या सरासरी क्षेत्रापेक्षा 144 टक्के पेरणी झाली आहे. यामध्ये हरभरा पिकालाच शेतकऱ्यांनी अधिकची पसंती दिली आहे. तर गव्हाचे पीक सरासरीप्रमाणेच घेण्यात आले आहे. आता हंगाम मध्यावर आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेल्या बदलाचा फायदा होणार की तोटा हे स्पष्ट होणार आहे.

अशी आहे लातूर विभागातील स्थिती

लातूर विभागातील 5 जिल्ह्यांमध्ये रब्बीचे सरासरी क्षेत्र हे 10 लाख 86 हजार 610 हेक्टर एवढे आहे. असे असताना पोषक वातावरणामुळे 15 लाख 61 हजार हेक्टरावर रब्बीचा पेरा झाला आहे. लातूर विभागातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी आणि हिंगोली या पाचही जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर पेरा झाला आहे पण शेतकऱ्यांनी ज्वारी पिकाला बाजूला सारुन हरभरा, करडई, गहू या पिकांवरच भर दिला आहे. लातूर विभागात ज्वारीचे सरासरी क्षेत्र हे 3 लाख 65 हजार हेक्टर असताना प्रत्यक्षात पेरणी ही 2 लाख 99 हजार हेक्टरावर झालेली आहे. दरवर्षी दुपटीने वाढणारे क्षेत्र यंदा मात्र, 18 टक्क्यांनी घटलेले आहे.

हरभऱ्याचा सर्वाधिक पेरा, उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांचा प्रयोग

हरभरा हे रब्बी हंगामातील पीक असले तरी ज्वारी नंतर गहू आणि त्यानंतर हरभऱ्याचे उत्पादन घेतले जात होते. मात्र, वातावरणातील बदल पावसामुळे उशिरा झालेल्या पेरण्या आणि कृषी विभागाने उत्पादन वाढीसाठी केलेली जनजागृती यामुळे थेट पीक पध्दतीमध्येच बदल झाला आहे. शेतकऱ्यांनी हा बदल तर केला आहे. शिवाय हरभऱ्याची आवकही सुरु झाली असून शेतकऱ्यांनी केलेला बदल फायद्याचा ठरणार का? हे दर आणि उत्पादनावरच अवलंबून आहे.

ज्वारी क्षेत्र घटण्याची काय आहेत कारणे?

एकतर ज्वारी हे कमी पाण्यावर घेतले जाणारे पीक आहे. रब्बी हंगामात एक किंवा दोन पाणी मिळाले तरी ज्वारीचे पीक पदरात पडते. मात्र, गेल्या दोन वर्षापासून सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस होत आहे. त्यामुळे ज्वारीच्या तुलनेत पाणी जास्त आणि उत्पादनही जास्त अशाच पिकांची शेतकऱ्यांनी निवड केलेली आहे. यामध्ये कडधान्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. शिवाय ज्वारी काढणे हे कष्टाचे काम आहे. यासाठी मजूरही मिळत नाहीत.

संबंधित बातम्या :

Drone Farming : शेती व्यवसयाचे बदलते चित्र, पंतप्रधान मोदींच्या हस्ते 100 ‘किसान ड्रोन’ला हिरवा झेंडा

शेतकऱ्यांना मिळणार हमीभाव केंद्राचा ‘आधार’, हरभऱ्याचा दरही फायनल अन् नोंदणीलाही सुरवात

सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात तरी शेतकरी संभ्रमात, दर वाढूनही काय समस्या ?