सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात तरी शेतकरी संभ्रमात, दर वाढूनही काय समस्या ?

नाही म्हणलं तरी खरिपातील सोयाबीनचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. आतापर्यंत दरातील चढउतारामुळे सोयाबीनची साठवणूक की विक्री यामुळे शेतकऱ्यांची द्वीधा मनस्थिती होत होती. आता हंगामातील सर्वाधिक दर मिळूनही वाशिम जिल्ह्यातील शेतकरी हे संभ्रमातच आहेत. कारण जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील सोयाबीनच्या दरात मोठी तफावत आढळून येत आहे.

सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात तरी शेतकरी संभ्रमात, दर वाढूनही काय समस्या ?
सोयाबीनचे दर स्थिर असले तरी आवक मात्र सुरुच आहे.
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 10:52 AM

वाशिम : नाही म्हणलं तरी  (Kharif Season) खरिपातील सोयाबीनचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. आतापर्यंत दरातील चढउतारामुळे सोयाबीनची साठवणूक की विक्री यामुळे शेतकऱ्यांची द्वीधा मनस्थिती होत होती. आता हंगामातील सर्वाधिक दर मिळूनही (Washim District) वाशिम जिल्ह्यातील शेतकरी हे संभ्रमातच आहेत. कारण जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील (Soybean Rate) सोयाबीनच्या दरात मोठी तफावत आढळून येत आहे. सोयाबीनची विक्री करावी कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे. जिल्ह्याच्या ठिकाणच्या बाजार समितीमध्येच दर कमी असल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे. सध्या सोयाबीन हंगाम अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱी साठवणूकीतले सोयाबीन विक्रीसाठी काढत आहेत. मात्र, बाजार समित्यांमधील दरात मोठी तफावत आढळून येत असल्याने सोयाबीनची विक्री करावी की साठणूक हा प्रश्न कायम आहे. जिल्ह्यातील कारंजा, मंगरुळपीर, मानोरा आणि रिसोडच्या बाजार समितीत सोयाबीनला सरासरी 6650 रुपये प्रती क्विंटल दर मिळत असताना, वाशिमच्या बाजार समितीत मात्र 300 ते 400 रुपये कमी दराने सोयाबीनची खरेदी होत आहे.

हंगामाच्या अंतिम टप्प्यात सर्वाधिक दर

सोयाबीनचा संपूर्ण हंगाम हा दरातील चढ-उतारामुळे कायम चर्चेत राहिला होता. कारण सोयाबीन हेच खरीप हंगमातील मुख्य पीक आहे शिवाय उत्पादनात मोठी घट झाल्याने विक्रमी दर मिळणार अशी आशा शेतकऱ्यांना होती. पण 6 हजार 500 पेक्षा अधिकचा दर मिळालेला नाही. असे असतानाही शेतकऱ्यांनी वाढीव दर मिळाला तरच विक्री अन्यथा साठवणूक हा निर्णय घेतल्याने मोठा फायदा झाला आहे. आता केवळ साठवणूकीतले सोयाबीन शेतकऱ्यांकडे असून प्रति क्विंटल 6 हजार 500 पर्यंत सरासरीचा दर आहे. त्यामुळे आवकही वाढत आहे. आता सलग दोन दिवस बाजार समित्यांना सुट्टी राहणार असल्याने सोमवारी पुन्हा आवक वाढेल असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

बाजार समित्यांच्या दरामध्ये तफावत, नेमके कारण काय?

वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मंगरुळपीर, मानोरा आणि रिसोडच्या बाजार समितीत सोयाबीनला सरासरी 6650 रुपये प्रती क्विंटल दर मिळत असताना, वाशिमच्या बाजार समितीत मात्र 300 ते 400 रुपये कमी दराने सोयाबीनची खरेदी होत आहे.त्यामुळे शेतकरी संभ्रमात पडले आहेत. असे असले यामागे वेगवेगळी कारणे आहेत. सोयाबीनचा दर्जा, वाहतूकीचा खर्च आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कडता पध्दत यामुळे दरात तफावत ही असतेच. परंतू ही तफावत 300 पेक्षा असेल तर ते मात्र, चुकीचे असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांना अपेक्षा 7 हजार रुपये दराची

यंदा संपूर्ण हंगामात सोयाबीनला सरासरीप्रमाणे दर मिळालेला आहे. आता हंगाम संपत असताना सोयाबीनला किमान 7 हजारापर्यंतचा दर मिळावा ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. पण या वाढीव दराच्या अपेक्षेमध्ये न राहता शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने विक्री केलेलेच फायद्याचे राहणार आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अजूनही मागणी वाढलेली नाही शिवाय सर्वाधिक उत्पादन घेतले जाणाऱ्या ब्राझीलमध्ये सोयाबीन काढणीला वेग आला आहे. त्यामुळे दर घटण्याचाच अधिकचा धोका असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Crop Insurance: पीकविम्याच्या 4 लाख पूर्वसूचना ठरल्या अपात्र, चूक शेतकऱ्यांची की विमा कंपन्याची..!

Summer Soybean: महाबीजच्या जनजागृतीने सोयाबीन क्षेत्र वाढले आता शेतकऱ्यांची परीक्षा..!

E-Pik Pahani : घटत्या नोंदणीमुळे निर्णयात बदल, शेतकरी घेणार का वाढीव मुदतीचा फायदा?

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.