Crop Insurance: पीकविम्याच्या 4 लाख पूर्वसूचना ठरल्या अपात्र, चूक शेतकऱ्यांची की विमा कंपन्याची..!

खरीप हंगामातील पीकविमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर सर्वात जास्त चर्चा झाली ती विमा अदा करुनही भरपाई कशी मिळाली नाही. त्याअनुशंगाने शेतकऱ्यांनी विमा कंपनी आणि प्रशासनालाच दोषी ठरवले होते. मात्र, ज्या शेतकऱ्यांना पीकविमा मिळालेला नाही अशांना पूर्वसूचना दाखल करण्याचा अधिकार होता. त्यानुसार राज्यातील 42 लाख 28 हजार 935 शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दाखल केल्या होत्या.

Crop Insurance: पीकविम्याच्या 4 लाख पूर्वसूचना ठरल्या अपात्र, चूक शेतकऱ्यांची की विमा कंपन्याची..!
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 10:13 AM

मुंबई : खरीप हंगामातील (Crop Insurance Scheme) पीकविमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर सर्वात जास्त चर्चा झाली ती विमा अदा करुनही भरपाई कशी मिळाली नाही. त्याअनुशंगाने शेतकऱ्यांनी (Insurance Company) विमा कंपनी आणि प्रशासनालाच दोषी ठरवले होते. मात्र, ज्या (Farmer) शेतकऱ्यांना पीकविमा मिळालेला नाही अशांना पूर्वसूचना दाखल करण्याचा अधिकार होता. त्यानुसार राज्यातील 42 लाख 28 हजार 935 शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दाखल केल्या होत्या. यापैकी तब्बल 4 लाख पूर्वसूचना ह्या अपात्र ठरविण्यात आल्या आहेत. तर 38 लाख 26 हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी ह्या ग्राह्य धरण्यात आलेल्या आहेत. राज्यातील तब्बल 4 शेतकऱ्यांना त्यांच्याच चुकीमुळे विमा रक्कम ही मिळाली नसल्याचे समोर आले आहे. कारण अनेक शेतकऱ्यांनी एकापेक्षा जास्त ठिकाणी पूर्वसूचना दाखल केल्या होत्या तर 40 हजार 720 शेतकऱ्यांनी तर विमा हप्ता न भरताच भरपाईचा दावा केला होता. आता पूर्वसूचनांचे चित्र स्पष्ट झाले असून जे शेतकरी पात्र आहेत त्यांना लवकरच विमा रक्कम अदा केली जाणार आहे.

काय आहे कृषी विभागाचे म्हणणे?

आतापर्यंत केवळ इफ्को टोकियो विमा कंपनी वगळता सर्व कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रक्कम ही जमा केली आहे. असे असतानाही शेतकरी पूर्वसूचना दाखल करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना तपासण्यात आणि त्यांचे समाधान करण्यातच अधिकचा वेळ खर्ची होत आहे. दाखल झालेल्या सर्वच तक्रारी ह्या मदतीसाठी पात्र ठरत नाहीत. शेतकऱ्यांनी दाखल केलेली पूर्वसूचना 100 टक्के नियमात असेल तरच रक्कम अदा केली जाते. पूर्वसूचनांचे 100 सर्व्हेक्षण करण्यात आले असून 35 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना 2 हजार 100 कोटी वितरीत केल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

विमा मंजूर असूनही शेतकऱ्यांना मिळालेली नाही रक्कम

शेतकऱ्यांनी अदा केलेल्या सर्वच पूर्वसूचना ह्या चुकीच्या पध्दतीच्या आहेत असे नाही. कारण मंजूर असूनही 162 कोटी वितरीत करण्याचे राहिलेले आहे. यामध्ये इफ्को टोकियो ही सर्वात पिछाडीवर असलेली कंपनी आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना ह्या पात्र ठरलेल्या आहेत त्यांना देखील लवकरच विमा रक्कम मिळणार असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. पात्र पूर्वसूचनेनुसार 2 हजार 359 कोटी रुपये हे विमा कंपनींना अदा करावे लागणार होते. त्यामुळे पूर्वसूचना दाखल करुन अनेक शेतकऱ्यांना फायदाही झालेला आहे. आता केवळ 162 कोटी रुपये वितरीत होणे बाकी आहे.

संबंधित बातम्या :

Onion Rate : कांद्यामुळे नव्हे तर केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, वाढीव दरावर निर्णय काय?

Summer Soybean: महाबीजच्या जनजागृतीने सोयाबीन क्षेत्र वाढले आता शेतकऱ्यांची परीक्षा..!

E-Pik Pahani : घटत्या नोंदणीमुळे निर्णयात बदल, शेतकरी घेणार का वाढीव मुदतीचा फायदा?

Non Stop LIVE Update
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....