आंब्याच्या बागेतील रिकाम्या जागेत करा हळदीचे लागवड अन् मिळवा लाखोंचे उत्पन्न

| Updated on: Sep 20, 2021 | 2:50 PM

उत्तर प्रदेशतील लखनौ येथील अनेक शेतकऱ्यांनी एक अजब प्रकार करून तब्बल लाखोंची कमाई केली आहे. येथील मध्य उप-उष्णकटिबंधीय फलोत्पादन संस्थेतील शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत आंब्याच्या बागांमध्ये हळदीच्या लागवडीला चालना दिली जात आहे. त्यानुसारच या शेतकऱ्यांनी आंबेच्या बागेत आंतरपिक म्हणून हाळदीची लागवड केली होती. यामधून भरघोस कमाई झालेली आहे.

आंब्याच्या बागेतील रिकाम्या जागेत करा हळदीचे लागवड अन् मिळवा लाखोंचे उत्पन्न
संंग्रहीत छायाचित्र
Follow us on

मुबंई : आंतरपिकातून उत्पन्न कमी मिळते असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे. त्यामुळेच एकाच वेळी एकच पिक घेण्यावर शेतकऱ्यांचा कायम भर राहिलेला आहे. मात्र, उत्तर प्रदेशतील लखनौ येथील अनेक शेतकऱ्यांनी एक अजब प्रकार करून तब्बल लाखोंची कमाई केली आहे. येथील मध्य उप-उष्णकटिबंधीय फलोत्पादन संस्थेतील शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत आंब्याच्या बागांमध्ये हळदीच्या लागवडीला चालना दिली जात आहे. त्यानुसारच या शेतकऱ्यांनी आंबेच्या बागेत आंतरपिक म्हणून हाळदीची लागवड केली होती. यामधून भरघोस कमाई झालेली आहे.

आता ऊसाच्या क्षेत्रात कांदा हे आंतरपिक, उडीदामध्ये तुर हे आंतरपिक हे आपण ऐकले असेल पण, आंब्याच्या बागेत हळदीची लागवड हे ऐकायला विचित्र वाटले असेल ना, पण ते खरे आहे. आंब्याच्या बागेतील रिकाम्या जागेत हळद लागवड करून शेतकरी लाखो रुपये कमवू शकतात आणि त्याला सरकारही प्रोत्साहन देत आहे. हळदीची मागणी नेहमीच बाजारात असते, त्यामुळे दर नेहमी हे चढेच राहतात.उत्तर प्रदेशातील लखनौ येथील मध्य उप-उष्णकटिबंधीय फलोत्पादन संस्थेतील शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत आंब्याच्या बागांमध्ये हळदीच्या लागवडीला चालना दिली जात आहे.

अनेक शेतकऱ्यांनी हा प्रयोग म्हणून स्वीकारला आहे आणि यातून चांगला नफा कमावला जात आहे. लखनौमधील मलिहाबाद स्टेटस आंब्याच्या मळ्यात 20 शेतकऱ्यांनी हळदीच्या वाणाची बीजे नरेंद्र देव हळद दिली होती. शेतकऱ्यांनी ते लावले आणि एकरी 40-45 क्विंटल उत्पादन मिळाले. या लागवडीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उघड्या जनावरांमुळे आंब्याचेही नुकसान होत नाही. नीलगाई आणि माकडंही त्यापासून दूर राहतात.

हळद रोगापासून संरक्षण करते

सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सबट्रॉपिकल हॉर्टिकल्चरच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, हळद सोनेरी केशर म्हणूनही ओळखली जाते. नरेंद्र देव हळदी-2 मध्ये 5 टक्के कर्क्युमिन असते, जे शरीरातून मुक्त मूलकण काढून अनेक आजारांपासून संरक्षण करते. कोरोनाची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी दिवसाला किमान एक किंवा दोन वेळा हळदीचे दूध घेण्याचा सल्ला भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात दिलाही होता.

50 हून अधिक शेतकऱ्यांनी सुरु केले आंतरपिकातून उत्पन्न

सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सब-ट्रॉपिकल हॉर्टिकल्चरचे संचालक डॉ. शैलेंद्र राजन सांगितले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी ही संस्था सतत काम करत आहे. अशा परिस्थितीत आंब्याच्या बागांमध्ये हळदीची लागवड शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकते. आतापर्यंत 50 हून अधिक शेतकऱ्यांनी शेत म्हणून स्वीकारले आहे आणि इतर जिल्ह्यातील शेतकरीही ते सुरू करणार आहेत. उत्पादन सुधारता यावे म्हणून आम्ही शेतकऱ्यांना सुधारित बियाण्या देत असल्याचेही त्यांनी सांगितले. (Mango orchard sapled turmeric, farmers earn lakhs)

इतर बातम्या :

‘देवेंद्र फडणवीस दबंग नेते, शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात!’, भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी : सोयबीनच्या दरात झपाट्याने घसरण, शेतकऱ्यांचे लक्ष लातुरच्या बाजारकडे

IPL 2021 : मुंबईला पोलार्डची एक चूक नडली, म्हणूनच चेन्नईने विजयाची साखर खाल्ली!